✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वक्तृत्वाचे कथन..

प
प्राजु यांनी
Wed, 03/25/2009 - 22:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19367 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

माझे शाळेतले दिवस

संदीप चित्रे
Wed, 03/25/2009 - 23:55 नवीन
आठवले प्राजु... वक्तृत्व, नाट्य, नाट्यवाचन, क्रिकेट आणि टेबल टेनिस सगळ्यांमुळे शाळेचे दिवस सुखी झाले होते :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

ए, छान

रेवती
गुरुवार, 03/26/2009 - 00:05 नवीन
ए, छान लिहिलयस.:) सभाधीटपणा आधीपासूनच आहे तुझ्यात. ऐनवेळी भाषणाचा विषय बदलला तर मोठे लोकही गडबडून जात असतील. इथे तर तुझा तूच विषय बदललास व भाषणही छान केलेस त्याचे कौतुक वाटले. मला नाही बुवा असं काही जमलं. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
गुरुवार, 03/26/2009 - 00:15 नवीन
प्राजु अजुन एक फार मोठा किस्सा विसरली आहेस, तो ही सांग. मिपाकर हसुन हसुन फुटतील. ;) लेख मस्तच. :)
  • Log in or register to post comments

श्शू!!!!!

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 00:33 नवीन
चूप!! अळीमिळी गुपचिळी... :$ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

काय प्राजु ताई

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/26/2009 - 15:50 नवीन
काय आहे ती अळीमिळी गुपचिळी सांगा ना आम्हाला पण हा ;) :? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

असेच

शितल
गुरुवार, 03/26/2009 - 00:20 नवीन
आमच्या वर्गात एका मुलाने छ. शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केले होते, आणी बोलता बोलता तो छ.शिवाजी महारांजाच्या आईचे नाव "जिजाबाई" आहे हे बोलायचा सोडुन "जनाबाई" म्हणाला होता.
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 00:25 नवीन
ओ प्राजुतै... मस्त लिहिलंय हो. अवांतर: परत शाळेत जावंसं वाटायला लागलंय. आता आपण सगळे मिळून एक शाळा सुरू करू. खर्‍या शाळेत काही कोणी घेणार नाही आपल्याला. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

चतुरंग
गुरुवार, 03/26/2009 - 00:35 नवीन
सगळे मिळून शाळा सुरु करुयात! 'मिसळपाव माध्यमिक आणि हुच्चमाध्यमिक विद्यालय' :D माझा एक मामा त्याच्या दोन मुलांपैकी एका व्रात्य मुलाला शाळेतून आल्यावर रोज विचारायचा 'काय रे झाली का शाळा!' (ह्यातला श्लेष जाणत्यांच्या लक्षात यावा! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आणि हो

विनायक पाचलग
गुरुवार, 03/26/2009 - 09:17 नवीन
आधुनिक शाळेची लेटेस्ट अपडेट माझ्याकडुन मोफत When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१ हेच

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/26/2009 - 13:55 नवीन
+१ हेच म्हणतो. शाळा काढा. (आणि आमच्यासारख्यांसाठी हुच्चप्राथमिक शाळा काढा, सामान्य लोकांच्या प्राथमिक शाळेत आम्ही जात नाही) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/26/2009 - 00:58 नवीन
हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एकदम सहमत..

शिप्रा
गुरुवार, 03/26/2009 - 08:48 नवीन
एकदम सहमत..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिन दा शी सहमत

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/26/2009 - 15:54 नवीन
पण काय ओ बिपिन दा आपल्या शाळेचा युनिफार्म कोणत्या रंगाचा कसा असेल अवांतर घाश्या या शाळेत सर्व विद्यार्थी हुशार असणार बरं सर्व लेखक मंडळी आहेत ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अरे वा मस्तच!

चतुरंग
गुरुवार, 03/26/2009 - 00:30 नवीन
लहानपणातल्या आठवणींचा खजिना आवडला! आयत्या वेळी भाषणाचा विषय बदलण्याची वकिली चलाखी सुद्धा आवडली! :) (किंचित अवांतर - वक्तृत्वात तुझा नंबर पहिला असणार ह्याबद्दल माझी खात्री कट्ट्याच्यावेळीच पटली होती, मला खरी काळजी वाटते ती जगदीशची!! (ह.घे. बयो.);)) चतुरंग
  • Log in or register to post comments

काळजी का वाटली?

संदीप चित्रे
गुरुवार, 03/26/2009 - 19:15 नवीन
वक्तृत्व 'ऐकायला' हक्काचा श्रोता मिळाला म्हणून प्राजु खूष आणि...... देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत, एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून द्यायला, म्हणून जगदीश खूष ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अच्छा, आत्ता तुझ्या

चतुरंग
गुरुवार, 03/26/2009 - 21:44 नवीन
कायम सुखी असण्याचं रहस्य समजलं रे संदीप!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मस्त

चकली
गुरुवार, 03/26/2009 - 00:31 नवीन
मस्त लिहिलाय किस्सा .. शाळेच्या दिवसांची आठवण झाली. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त!

शाल्मली
गुरुवार, 03/26/2009 - 00:34 नवीन
प्राजु, किस्से मस्तच! भाषणाचा विषय तूच बदलल्यामुळे तुझ्यासाठी तर ती उत्स्फूर्त पाठांतर स्पर्धाच झाली असेल ना! मी पण शाळेत असताना अशा स्पर्धांमधे असायचे.. पण मला भाषण स्पर्धेपेक्षा संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा जास्त आवडायच्या. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

मस्तच किस्से

धनंजय
गुरुवार, 03/26/2009 - 00:41 नवीन
दहाव्या वर्षी "हुंडाबळी समस्ये"वर भाषण - भीषण प्रकार... मस्तच.
  • Log in or register to post comments

असेच!

चित्रा
गुरुवार, 03/26/2009 - 02:19 नवीन
एकदम हुंडाबळी? ! छान लिहीले आहे. आठवणी आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

हेच..

स्वाती दिनेश
गुरुवार, 03/26/2009 - 12:13 नवीन
एकदम हुंडाबळी? ! छान लिहीले आहे. आठवणी आवडल्या. चित्रासारखेच म्हणते, प्राजु.. शाळेतल्या आठवणींनी खूप मागे नेलस ग बायो सकाळी सकाळी... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

छानच..

योगी९००
गुरुवार, 03/26/2009 - 01:02 नवीन
प्राजू, आता कोल्हापुरला परत जा...छ. संभाजी रा़जांना निवडणूक प्रसारासाठी कोणीतरी हवेच आहे. एकदा सुरुवात कर..पुर्ण महाराष्ट्रात तुला आमंत्रणे येतील. आमच्या शाळेत असेच दोन किस्से झाले होते. १) वक्तृत्व स्पर्धेत छ. शिवरायाचे गुरू म्हणून एकाने दादोजी कोंडदेव ऐवजी दादा कोंडके सांगितले होते. २) एकाने वर्गात पहिल्या महायुद्धाची कारणे यामध्ये ऑस्ट्रीयाचा युवराज आर्च् ड्युक फर्डिनांड याऐवजी फर्नांडिस असे सांगितले होते. (त्याच्या दुर्दैवाने इतिहासाच्या शिक्षिकेचे आडनाव पण फर्नांडिस होते. बाई त्याला खुप बोलल्या होत्या. त्यांना वाटले की त्याने मुद्दाम सांगितले.) खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

हा हा हा!!!

चतुरंग
गुरुवार, 03/26/2009 - 01:15 नवीन
आर्च ड्यूक फर्नांडिस!! जबरा!!! =)) =)) =)) लई बोलणी पडली असणार!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 01:17 नवीन
त्याला नंतर कधी ड्यूकचा सोडा बघितला असेल तरी धडकी भरत असेल!!!! ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अवांतर

श्रावण मोडक
गुरुवार, 03/26/2009 - 01:25 नवीन
फर्डिनांडचा फर्नांडिस होण्याची एक 'स्थिती' ध्यानी घेतली तर ड्यूकच्या सोड्याची भीती वाटण्याची शक्यता कमी... तो हवासा वाटत असावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हे मात्र झकास लिहिले आहे..

योगी९००
गुरुवार, 03/26/2009 - 02:06 नवीन
फर्डिनांडचा फर्नांडिस होण्याची एक 'स्थिती' ध्यानी घेतली तर ड्यूकच्या सोड्याची भीती वाटण्याची शक्यता कमी... तो हवासा वाटत असावा. झकास... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

समाधि

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/26/2009 - 13:58 नवीन
माझ्या दादाने, चिंचवडला कोणाची समाधी आहे? याचे उत्तर 'मोरया गोसावी' ऐवजी 'राजा गोसावी' असे दिले होते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

अगायायाया

आनंदयात्री
गुरुवार, 03/26/2009 - 14:47 नवीन
फु ट लो !!! =)) =)) =)) =)) राजा गोसावी !! !! (मला एकदम लाखाची गोष्ट मधला खांद्यावर टाईपराईटर घेउन चालणारा राजा गोसावी समोर आला ) बाकी प्राजुताईने एक नंबर किस्सा सांगितला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हा हा ..

लिखाळ
गुरुवार, 03/26/2009 - 18:55 नवीन
हा हा .. राजा गोसावी लै भारी :) प्राजु, लेख आणि डर्विनचा किस्सा मस्त :) मजा आली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लेख आवडला.

अजय भागवत
गुरुवार, 03/26/2009 - 01:07 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

खुप छान !

चंद्रशेखर महामुनी
गुरुवार, 03/26/2009 - 01:16 नवीन
शाळेतले दिवस आठवले... प्राजु....
  • Log in or register to post comments

आणखी एक किस्सा..

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 01:23 नवीन
माझाच किस्सा हा.. शितलने वरती ज्या किस्स्याचा उल्लेख केला तोच हा. पाचवीत असतानाचाच हा किस्सा. स्पर्धेला विषय होता "माझा आवडता शास्त्रज्ञ.." आईने भाषण लिहून दिलं. मी झोक्कात पाठ केलं. माझा आवडता शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन.... डार्विनच्या उत्क्रांतीवादावर भाषण लिहिलं. माकडापासून माणूस बनला.... खूप छान भाषण ठोकलं मी. पहिला नंबर आला. खूप खुश होते. दोन दिवसांनी बक्षिस समारंभ होता. तिथे जाऊन बक्षिस घेऊन आले. नंतर घरी आल्यावर.. विचार करत बसले होते. बाबा म्हणाले ,"काय गं?? कसला विचार करती आहेस??" मी म्हणाले... "बाबा.... डार्विननं जेव्हा हा शोध लावला ना.. माकडापासून माणूस बनला..असा... त्यावेळी तो माणूस होता का माकड होता?" ................................................... बाबा मटकन खाली बसले. मग एकदम फुटल्यासारखे हसायला लागले. म्हणाले, "काल बक्षिस समारंभाच्या ठिकाणी हे नाही विचारलंस ते बरं केलंस.. नाही तर बक्षिस दिलं नसतं तुला..." मी मात्र पुन्हा तोच विचार करत बसले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा हा हा!!

चतुरंग
गुरुवार, 03/26/2009 - 01:27 नवीन
आपल्या सिद्धांताचं असलं विडंबन पाहून खुद्द डार्विनने सुद्धा हाय खाल्ली असती शेवटपर्यंत !! =)) =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आग्गाय्या

टारझन
Fri, 03/27/2009 - 19:30 नवीन
आग्गाय्यायाअ ... लेख वाचताना डार्विण शोधत होतो .. आणि सापडला .. बेकार यार .. हा असला विचार तर आमच्या डोकेरुपी खुराड्यात पण आला नव्हता =)) =)) प्राजू _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 01:28 नवीन
हे वाचून माझं माकड झालंय!!! =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मला तिने

शितल
गुरुवार, 03/26/2009 - 01:33 नवीन
मला तिने हा किस्सा सांगितल्यावर मी ही १० मि. खुप हसत होते. परत एकदा हा किस्सा वाचुन खुप हसु आले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एक प्रश्न

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/26/2009 - 01:35 नवीन
हा किस्सा मिपावर लिहिताना ... प्राजुताई मनाने माणसांमधेच होत्या ना ? ...का आपल्या पूर्वजांसमवेत ? ;-) जगदीश्वरा, आता तुलाच रे बाबा काळजी ! का तुझीच काळजी करायची वेळ आली आहे ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 01:42 नवीन
=)) जगदीश्वराची काळजी करू नका... ते ऑलरेडी शॉक मधे असतील... काही जाणवण्याच्या पलिकडे असतील ते... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बाप रे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/26/2009 - 10:10 नवीन
प्राजु, तू एक लंबर महान आहेस याबद्दल आता मला काहीही शंका नाही. आणि वरचे प्रतिसादकर्तेतर ... जाऊ देत ... =)) =)) = )) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चतुरंग,

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 18:59 नवीन
चतुरंग, बिपिनदा, शितल, आदिती... आणि श्रावणमोडक साहेब.. जे जे मला इथे जोरात हसले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या स्वप्नांत डार्विन येणार आहे हा प्राजक्ता देवींचा शाप आहे.... ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हरकत नाही!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 19:46 नवीन
हरकत नाही. पण तो डार्विन माणूस झाल्यानंतरचा असेल की माकडावस्थेतलाच असेल? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हाहाहा...

श्रावण मोडक
Fri, 03/27/2009 - 22:33 नवीन
मी कुठं जोरात हसलोय? उलट मला हसता येत नव्हतं त्यावेळी. पण तुझे शब्द खरे ठरोत. काल-परवाच 'ओरिजिन ऑफ स्पेशीज' वाचायला घेतलंय. अशात डार्विनबाबा (स्वप्नात का होईना) भेटला तर मस्तच. त्याच्याशी चर्चा करता येईल. पण डार्विनचा माकड करणाऱ्या त्या प्राजुचा इनोसन्स मस्त. आवडला. डोळ्यापुढं एक चिमुरडी आपल्या वडिलांसमोर उभी राहून विचारतेय आणि नंतर तिचे वडील हस-हस हसतात असे चित्र आले डोळ्यासमोर. साहेब? या शिवीबद्दल हिला काय शिक्षा द्यावी बरं? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

बोलती बंद

श्रावण मोडक
गुरुवार, 03/26/2009 - 01:49 नवीन
वेळ अशी आहे की, हसता येत नाहीये. कुणाला हा किस्सा सांगताही येत नाहीये. उद्या मात्र पहिलं काम हे करणार. आत्ता तोंडातल्यातोंडात खुसखसून बोलती बंद झालेली आहे. _/\_!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लहानपणातल

विसोबा खेचर
गुरुवार, 03/26/2009 - 01:52 नवीन
लहानपणातल्या आठवणींचा खजिना आवडला! आयत्या वेळी भाषणाचा विषय बदलण्याची वकिली चलाखी सुद्धा आवडली! रंगाशी सहमत! आमचा जग्गूभैय्या मात्र बिचारा भला माणूस हो! :) असो.. प्राजू, जियो! मस्त लिवलं आहेस... और भी आनेदो.. तात्या.
  • Log in or register to post comments

छान

मीनल
गुरुवार, 03/26/2009 - 06:27 नवीन
तू छान बोलते, लिहितेस. पण एवढच नाही. दुस-यांनाही उत्तेजन देतेस. छान नसतानाही त्यांच्या लेखनाच कौतुक करतेस. माझा तसा अनुभव आहे. आणि दुस-यांन कडून तुझ्या लेखनावर टिका झाल्यावर ते निटपणे ऐकून घेतेस. कधी कधी मान्य ही करतेस. सुधारणा करतेस. सतत नविन शिकून स्वत:ची प्रगती करण्याच्या तयारीत असतेस.प्रयत्नात असतेस. आजवर झालेल्या कौतुकाचा कैफ अजून तरी कधी जाणवला नाही. अशीच रहा विद्यार्थी दशेत.खूप खूप मोठी होशील. शुभेच्छा. मीनल.
  • Log in or register to post comments

+1

सहज
गुरुवार, 03/26/2009 - 07:18 नवीन
एकदम सहमत बाय द वे अशीच रहा विद्यार्थी दशेत.खूप खूप मोठी होशील याचा अर्थ अजुनही असे हुच्च किस्से /हशा होतील का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

धन्यवाद मीनल..

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 07:36 नवीन
मीनल हा तुझा मोठेपणा आहे. खूप खूप धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

सहमत आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/26/2009 - 08:31 नवीन
मिनलच्या प्रतिसादाशी सहमत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

वा!

प्रमोद देव
गुरुवार, 03/26/2009 - 09:16 नवीन
मस्त किस्से आहेत तुझे. तू जात्याच फर्डी वक्ती(फर्डा वक्ताचे स्त्रीलिंगी रूप... ;) ) आहेस हे तुला एकदाच भेटलो होतो तेव्हाच लक्षात आले होते. :) डार्विनचा किस्सा तर जबरी आहे. =)) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

मस्तच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/26/2009 - 12:20 नवीन
मस्तच लिहिलयस ग प्राजुतै ! एकदम भन्नाट. आमची प्रगती शाळेत भाषण म्हणणार्‍या मुलांना पहिल्या रांगेतुन वेडेवाकडे चेहरे करुन दाखवणे ह्यापुढे झालीच नाही ;) बाकी ते "हल्ल्ल" भारी बर का. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा