Skip to main content

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

वाचने 9339
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

साधी सोपी सरळ कविता आवडली लिहित रहा, पैजारबुवा,

सुरेख. शिरीष पै ह्यांची ' हृदय अर्पण करतात..' कविता आठवली. अगदी अशीच नसली तरी थोडीफार तशाच पद्धतीने भावना व्यक्त करणारी.

अश्या सुंदर कविता वाचून माझे हात शिवशिवू लागतात माफीनामा आधीच जाहीर करावासा वाटतो आतली मळमळ जणू बाहेर काढून टाकतात घडत असते , घडत आले आहे आणि घडत जाईल पण ते मांडण्याची ताकद यावी लागते प्रेरणादायी कविता, ती आपसूकच प्रदान करत असतात

छान

काही माणसं, खरंच, कविता बनून येतात आणि निघून जातात अचानक् ! मागं रेंगाळत रहातात आठवणी धूंसर, पुसट शब्द अस्पष्ट . . . तुमची कविता खूप आवडली.