गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल.
समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी!
१९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो.
पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो!
डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील? नंतर जुने इकडचे तिकडचे संदर्भ जे व्हाट्सअप्प वर फिरत असतात ते आठवले-चायनीज हे पदार्थ आहेत (जे चायनात पण असे बनवत नाहीत आणि फक्त इंडिया मधेच असे असतात) आणि विकणारे इथलेच कुठले तरी आसामी बांधव आहेत.मग ते आसाम मध्ये का नाही राहत असा निरुपयोगी प्रश्न पडला आणि गाडीचा गियर नकळत उचलला.
एकदम मेंढरं सुटावी तशी माझ्यासकट गाडी त्या झुंडीतून जाऊ लागली आणि एकदम टर टर ssss ट ssss टर अशी सुसाट एक गाडी पुढून निघून गेली. त्यावर तीन मावळे ट्रॅफिक रुल्स धाब्यावर बसवून स्वार आणि हेल्मेट पण नाही!(पुण्यात आणि हेल्मेट? ते काय असतं? काय बोलता राव) भगवा कुर्ता पांढरा पायजमा कानात बाळी हातात ब्रेसलेट कपाळाला चंद्रकोर! असे प्रसन्न चेहरे.. शिवाय डोक्याचे खालून भादरलेले वर डोंगर म्हणून ठेवलेले केस(स्टाईल असते ती!)
पुन्हा चौथीच्या धड्यात महाराजांच्या स्वप्नरंजनाचा भाग आठवला. हेच ते आधुनिक मावळे आता जयंतीच्या निमित्ताने महाराजांचा इतिहास जागवत आहेत आणि काळानुरूप हा बदल झालाय असं सहज वाटून गेलं.
आधुनिक काळात घोडे वापरणं तसं योग्य व्हायचं नाही कारण तेवढी बडदास्त ठेवायची तर या मावळ्यांकडे तेवढी दौलत नाही आणि शिवाय PETA वाले प्राण्यांचा अमानुष छळ म्हणून केस वगैरे करतील! नकोच ते.शिवाय गाडीला झेंडा होताच-क्षत्रिय कुलावतंस! अशा रयतेच्या राजाला कूळ भूषणाला अभिमानाने सगळीकडे झेंड्याच्या रूपाने मिरवणारे मावळे पाहिलं की वाटतं-हो गरज आहे सर्वांना सांगण्याची की,होता असाही एक राजा जो कित्तेक शतकानंतर ही आठवला जातो.
गाडी निघाली आणि पुन्हा दुसरा चौक आणि पुन्हा तोच माहोल.
त्यात भर फक्त साऊंड सिस्टीम च्या रॅक ची! दन दन वाजत होतं, गाणी होती का नव्हती नीट ऐकू येत नव्हतं पण तुताऱ्या आणि ढोल एकदम शंभर बाजूने वाजत होते त्यामुळे माहोल अगदी सळसळत होता.
काही मंडळींना आज सरकारी सुट्टी असल्याने ती भाजी किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात गुंग! तसं एवढ्या कोलाहलात कुणाला काही त्रास वगैरे होत नव्हता म्हणा. आता पूजा साहित्य आणि त्या बरोबरीने फेटे झेंडे भगवामय पाहायला छान वाटत होतं आणि एकदम साऊंड सिस्टीम ला कंठ फुटला!
पोवाडे वाजू लागले..झालं एकदाचं जयंती साठी म्हणून आवश्यक जे आहे ते आलेलं आहे आणि वातावरणात तजेला आहे. अर्धाकृती पुतळ्याला हार घालून झाला..सुवासिक अगरबत्ती ,पेढे, गुलाल आणि एकमेकांच्या गळाभेटी..
गाडी अजून पुढे सरकली आणि काही मावळे टर ट ssss र करत सुसाट झेंडे घेऊन निघाले..नेमकं कुठे जाणार ते दरवर्षी वाटतं ते याही वर्षी वाटलं आणि मध्ये दाटीवाटीने बसलेला मावळा त्वेषाने ओरडू लागला- शिवाजी महाराज की.. बाकीचे जय म्हणे पर्यंत त्याने तोंडातून काहीतरी रस्त्यावर ओतलं-अगदी लालेलाल एकदम रक्तासारखं आणि पुन्हा ऊर्जेने ओरडला-शिवाजी महाराज की.. पुन्हा जय झालं. अजून पुढच्या महिन्यात अजून एकदा शिवजयंती आहे याचा विचार करत पुन्हा..
गाडी निघाली..
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
27378
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
यथार्थ वर्णन..
मी शिवजयंती या गोंडस नावाखाली
ही गुंडगिरी आहे...
In reply to मी शिवजयंती या गोंडस नावाखाली by बाप्पू
लिहीत राहा छान लिहिताय
आणखीन काही सुचवायचे असेल तर
लेखन आणि लेखनशैली दोन्ही आवडले.
होय
In reply to लेखन आणि लेखनशैली दोन्ही आवडले. by टर्मीनेटर
पीनेवालोंको पीनेका....
मुजोर राजा गरिबांचे पण हाल
मवाली या शब्दाची उत्पत्ती
हे जरासे अनफेअर नाही ना ?
In reply to मवाली या शब्दाची उत्पत्ती by विजुभाऊ
मवाली
In reply to मवाली या शब्दाची उत्पत्ती by विजुभाऊ
दुर्दैवाने सत्य आहे हे
सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल
तिकडे वर
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
शिवजयंतीचे प्रणेते टिळक अशा
In reply to तिकडे वर by अभ्या..
राजकीय पुढाऱ्याना त्यांच्या
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
टिळकांचा आत्मा तडफडण्याचं कारण नाही
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
उत्तम लेख!
हेपण
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
खखोदेजा
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
माहित नाही..
In reply to खखोदेजा by आनन्दा
गॅस वेल्डिंगचे सिलिंडर
In reply to माहित नाही.. by समीरसूर
डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा
In reply to माहित नाही.. by समीरसूर
.
In reply to डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा by ओम शतानन्द
ढोल-ताशे हा एक फक्त उपद्रवी आणि निरर्थक प्रकार आहे
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
आदर्श शिवजयंती
असलं काही होत नाही हो...
In reply to आदर्श शिवजयंती by वकील साहेब
महाराष्ट्राची सांस्कृतिक
In reply to असलं काही होत नाही हो... by समीरसूर
शिवजयंती
In reply to आदर्श शिवजयंती by वकील साहेब
वार्षिक उपक्रम
दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है)उत्तम कल्पना!
In reply to वार्षिक उपक्रम by मनिम्याऊ
अशाच भरीव (?) कामासाठी खास
स्तुत्य उपक्रम आहे.
In reply to अशाच भरीव (?) कामासाठी खास by मराठी_माणूस
हे उपहासाने म्हणत असाल तर
In reply to स्तुत्य उपक्रम आहे. by आनन्दा
.
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच
In reply to . by शब्दानुज
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन.पण हे लॉजिक गणेशोत्सवाला लावता येत नाही, ओंगळवाणे प्रदर्शन तिथेही असते. सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागणे जरी थोडे बाजूला ठेवलं तरी ते करताहेत त्या एन्जॉय मध्ये काय समाधान त्यांना मिळते हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित समाजातील काही जणांच्या एन्जॉयच्या कल्पना वेगळ्याही असू शकतात. आपण जसे काव्य शास्त्र विनोद वाचन संगीत अशा गोष्टीत मन रमवतो तसे त्यांचे नसेलही. मोठ्ठा कानफाडु आवाज, चित्रविचित्र कपडे, अविर्भाव, हेअरस्टाइल हे कदाचित स्टॅंडर्ड वर्तनापेक्षा वेगळे वाटत असेल तरी एक मोठ्ठा वर्ग त्याला फॉलो करतो असे दिसून येईल. अशा गोष्टींचा प्रभाव असणे, तिकडे तरुण पिढी (सगळीच नसली तरी काही) खेचली जाणे ह्यात चूक कुणाची हे शोधणे रोचक असणार.सहमत..
In reply to . by शब्दानुज
तरुण हे या देशाची शक्ती आहे
ज्योत घेऊन पळण्यात काय शहाणपण
निव्वळ फार्स!
In reply to ज्योत घेऊन पळण्यात काय शहाणपण by विजुभाऊ
.
In reply to निव्वळ फार्स! by समीरसूर
??
In reply to ज्योत घेऊन पळण्यात काय शहाणपण by विजुभाऊ
NH-4 वरती वाहत्या रस्त्यात
In reply to ?? by स्वलिखित
अर्ध शतक तर झालेच आहे , शतक
In reply to NH-4 वरती वाहत्या रस्त्यात by आनन्दा
तुमची तशी इच्छा असेल तर
In reply to अर्ध शतक तर झालेच आहे , शतक by स्वलिखित
विरोधाभास
In reply to NH-4 वरती वाहत्या रस्त्यात by आनन्दा
हा माझ्या समान मतांचा
In reply to विरोधाभास by स्वलिखित
आणि व्हॉट अबाउटरी बद्दल म्हणत
In reply to हा माझ्या समान मतांचा by आनन्दा
सहमत!
शिवाजी जन्माला यावा तो दुसर्या घरात
Anek prarisad avadale.
प्रतिसाद दिला त्या सर्वान्चे आभार