Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227966
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

आतली बातमी -- अगोदर खर्गे साहेबाना वाटलं कि आलोक वर्मा हे "लवचिक" नाहीत. म्हणून त्यांना विरोध झाला. मग हरयाणातील जमीन घोटाळा ( कोण ते ओळखा) मध्ये त्यांनी "सोयीस्कर" भूमिका घेतली. अशी भूमिका घेतल्यावर "नावडती"ची "आवडती" झाली. म्हणून मग शेवटचे १५ कामाचे दिवस असतानासुद्धा त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निकराचा प्रयत्न चालू होता. आणि अलोक वर्मानी पहिल्या ३६ तासातच आवडत्या माणसांना परत आणण्याचे आदेश देऊन आपली निष्ठा दाखवून दिली. परंतु श्री मोदी १ आणि श्री खर्गे १ अशा बरोबरीतील सामना असताना न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी तिसऱ्या पंचासारखे सर्व पुरावे पाहून श्री आलोक वर्मा ना आउट दिलंय. त्यामुळे आता खर्गे आणि काँग्रेसी लोक नोबॉल होता, बॅड लाईटच होता असले भंपक आरोप करत आहेत? कोणीही न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी असा निर्णय का दिला हे बोलत नाहीत. हरयाणातील जमिनीच्या घोटाळ्यातील घाण बाहेर आली तर काय हि खरी भीती आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला परशुराम वाघमोरे (वय २६) याच्या टूथब्रशवरील डीएनएचे नमुने हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १८ जणांविरोधात तब्बल ९ हजार २३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gauri-lankesh-murder-case-dna…

काय तर म्हणे अलोक वर्मा राफेलमधील तथाकथित घोटाळ्यांची चौकशी करणार होते म्हणून त्यांना त्रास देतात. या लोकांना हे पण माहित नाही की ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. एवढ्या कमी वेळात कसली चौकशी करणार होते?
मग ३१ जानेवरीपर्यंत कामावर ठेवायला काय हरकत होती? मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. वर्मा ह्यांनी त्यांचे मोबाईल्स टॅप केले होते. ज्या दिवशी अस्थाना ह्यांना अटक होणार होती त्याच्या आदल्या रात्री मध्यरात्री वर्मा ह्यांचे ऑफिस सील केले गेले. शिवाय गुजरात्मध्ये संदेसरा कुटुंबियांशी जवळीक करून पैसे खाल्ल्यचाही आरोप अस्थाना ह्यांच्यावर आहे. आता अस्थाना कोणत्या स्थानी जाउन विराजमान होतात ते बघुया.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, ही बातमी वाचा. ही पण आता बोला. मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. मोदी आणि त्यांचे चेले तसलेच आहेत हो, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका. वर्मांनी त्यांचे फोन टॅप केले असं कोण म्हणतंय? आणि त्यातून काय निष्पन्न झालं?

विद्यार्थ्यांचे म्हणणे काय ? काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुलेंनी अथक मेहनत घेतली. तर पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. https://www.loksatta.com/pune-news/savitribai-phule-pune-university-con…

मोदींविरुद्ध प्रतिज्ञापत्र देणाऱ्या माजी पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नीच्या गाडीला डम्परने उडवले. पत्नी व मुलगा जखमी.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कठिण आहे. आता 'अपघात हे रोजचेच असतात. त्यात विशेष ते काय?" अशी भक्त-संप्रदायी प्रतिक्रिया येईल. असो. "Moreover, there was no number plate on the dumper nor were any vehicle registration or identification papers available." https://newscentral24x7.com/ishrat-jahan-fake-encounter-case-cop-accuse…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हा अपघात भाजप ला अडकवन्या साठी काँग्रेसने केले नसेल कशावरुन ? वर्षानूवर्षे काँग्रेस च्या आशिर्वादा मुळे माजलेल्या भ्रष्ट्र बाबू शाहीने सुद्धा अपघात घडवन्या साठी मदत केली असेल आणि शिवाय काँग्रेस ला असे योगायोग घडविन्याची सवय आहे जसे कांग्रेस च्या काळात काही वर्षा पूर्वी इसरो चे चार शास्रध्न्य अचानक मरण पावले होते .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

News central सोडून इतर कोणत्याही न्यूज़ पेपर , न्यूज़ चैनल वाल्यानी या बातमी ला महत्व दिले नाही अगदी बरखा आणि राजदीप सरदेसाई ने सुद्धा . मोदींच्या नावाने शंक वाजवत बसणाऱ्या एका ही न्यूज़ चैनल ने ही बातमी दाखवली नाही . ब्लैक कैट ला तर भाजप कावीळ झाली आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक बातमी मध्ये भाजपला दोषी धरण्याची सवय लागली आहे . पण माई , तुझी देखील भाजप विरोधाची हातचलाखी वाखणन्याजोगी आहे = )

In reply to by ट्रम्प

चॅनेलवर दाखवले नाही की म्हणायचे , बातमीला महत्व नाही, चॅनेल्सवरदाखवले की म्हणायचे , ते विकले गेले आहेत , म्हणून मोदीविरोधात लिहीत असतात , कुठे शिकवतात ही मारीचकला ? नागपुरात ?

https://youtu.be/h39RogYBCFc कॉंग्रेस व मोगा मिंया च्या लाडक्या पाकिस्तानची करामात !! भारतावर अतिरेकी हल्ला करायच्या तयारीत आहेत !! तरी बर श्री मोदी मुळे भारताची तयारी उत्तम आहे आता ! गेल्या मुंबई हल्ल्या सारख झोपलेल सरकार आता नाही !! ज्या सॅटेलाईट मुळे हा धोका लक्षात आलेला आहे तो आताच्या सरकारच्या पाठींब्यामुळे त्वरेने केलेल्या सॅटेलाईट मुळे लक्षात आलेला आहे !! आता मोगा मिंया ह्यावर सुद्धा पचकल्या शिवाय रहाणार नाही वर Intolerence म्हणुन नाचायला मोकळा !!

In reply to by डँबिस००७

कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, मोदी सरकारला युद्धांचा अनुभव नाही

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, -- काँग्रेस ?? मोग्या लेका किती फेकतोस !

In reply to by प्रसाद_१९८२

पूर्वीच्या लढाया काँग्रेसने केल्या नाहीत ? मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ? -- असे मोदीनी केंव्हा म्हटले ? सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्याने केला व त्या मागे श्री मोदींचा भक्कम सपोर्ट होता.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत, पण एकही युद्ध निर्णायक जिंकता आलेल नाही ! म्हणुन पाकिस्तान दर पाच वर्षांनी युद्ध करण्यासाठी यैत होता. युद्ध म्हणजे जनतेला लुटायची पर्वणी, त्यात कॉंग्रेसचा हात कोणीही धरु शकत नाही ! प्रत्येक खरेदीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट सरकारने भ्रष्टाचार केला !

रिपब्लिकन पार्टी ही रेसिस्टांची (आणि अलीकडे रेपिस्टांची) पार्टी बनत चालली आहे*, असं कुणी** म्हटलं की काही सुशिक्षित रिपब्लिकन (ही जमातही आता दुर्मीळ होत चालली आहे म्हणा!) दुखावले जातात. डिनायल (उदा. ट्रम्पतात्यांवर थेट निक्सनच्या काळापासून रेसिझमचे आरोप आणि पुरावे असताना - "छे, छे, तो तर न्यू यॉर्क शहरातला आहे. तो कसा रेसिस्ट असेल!" सारखे पोकळ युक्तिवाद), लंगड्या सबबी, काणाडोळा, समस्येचे गांभीर्य आणि वारंवारिता आहे त्याहून फारच कमी आहे असा दावा करणं, व्हाटअबाऊटरी, 'ट्रम्प-जिंकला-म्हणून-हे-कांगावे आहेत' अशी स्वत:च स्वत:ची समजूत करून घेणं इत्यादी नेहमीचे डिफेन्सिव्ह उपाय मग चोखाळले जातात. त्यांच्यासाठी हा, त्यांच्याच पक्षाच्या सिनेटरचा (टिम स्कॉट) हा घरचा अहेर:
Three months ago, a white supremacist killed two black people in a parking lot in Kentucky. We are only 18 months from Charlottesville, where white nationalists killed a white woman with a car and severely beat multiple black people. Almost four years ago, a white supremacist murdered nine African Americans in a church in Charleston, S.C....These are just a sliver of the havoc that white nationalists and white supremacists have strewn across our nation for hundreds of years.
Some in our party wonder why Republicans are constantly accused of racism — it is because of our silence when things like this are said. Immigration is the perfect example, in which somehow our affection for the rule of law has become conflated with a perceived racism against brown and black people.
ह्या लेखाची पार्श्वभूमी ही आयोवा राज्यातले काँग्रेसमन स्टीव्ह किंग यांच्या वक्तव्यांची आहे. आयोवा हे प्रायमरीमधलं (पक्षांतर्गत निवडणुका) सर्वात पहिलं राज्य असल्यामुळे तिथल्या जय-पराजयाचा पुढील राज्यांतील निवडणुकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे, २०१६ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये सगळे उमेदवार स्टीव्ह किंगच्या रेसिस्ट वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी झगडत होते. त्यात कोण यशस्वी ठरलं, हे वेगळं सांगायला नकोच! मेक्सिकन सीमेवर भिंत बांधणं, गौरेतर इमिग्रंट्सना शिव्याशाप देणं, चुकीच्या गोष्टी/आकडे/बातम्या दडपून देणं, जन्माद्वारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वाच्या ('बर्थराईट सिटिझनशिप') घटनादत्त हक्काला विरोध# आणि एकंदरीत श्वेतवर्णीय हाच सर्वोच्च वंश अशी भूमिका ("श्वेतवर्णीय वेस्टर्न सिव्हिलायझेशन सोडलं तर, जगातल्या इतर कुठल्याही संस्कृतीने/वंशाने मानवी विकासात भर घातलेली नाही" असा अज्ञानी, द्वेषमूलक दावा ह्या किंगआजोबांनी केला होता!) ही श्री. स्टीव्ह किंग यांची विचारअपत्यं. (ट्रम्पतात्यांनी ती बेमालूम आपलीशी करून घेतली. ट्रम्पतात्यांचे भक्त मात्र, हे ओरिगिनल विचार आमच्या दूरदृष्टीच्या तात्यांचेच असं मानतात, हा भाग अलाहिदा! :)))
Mr. King’s influence over national politics derives from his representation of the reddest district in the first presidential nominating state. Nearly all the 2016 Republican presidential contenders sought his blessing at a forum he hosted in Des Moines in January 2015, Mr. Trump included.
*अर्थात, इथे सगळेच रिपब्लिकन्स रेसिस्ट असतात असं म्हणायचं नाही. तसं ज्यांना वाटत असेल, त्यांना वाढदिवसाच्या आणि अभ्यास वाढवण्याच्या शुभेच्छा! Most of the racists are Republicans, but most of the Republicans are not...इ.इ. वानगीदाखल, टेक्ससमधली ही बातमी पहा: Texas Republicans reject vote to oust GOP leader because he is Muslim. ** असले राजकारणी weasel words सराईतपणे वापरणं, हा आपण राजकारणी नसल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पतात्यांचा आवडता छंद आहे :) # एरवी अमेरिकन राज्यघटना ही पवित्र असून, ती अजिबात बदलू नये - जशी आहे तशीच राहू द्यावी असा आग्रह धरणारे तथाकथित "कॉन्स्टिट्युशनली प्युरिस्ट" कन्झर्व्हेटिव्ह मात्र याबाबतीत कमालीची लवचीकता दाखवतात! ;);)

चौकीदार उवाच :  काँग्रेसचे अनेक मोठे जामिनावर बाहेर आहेत. – काँग्रेस विरोधात जन्मलेले पक्ष आज काँग्रेससमोर शरणागती पत्करत आहेत. – चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे. – चोर देशात असो किंवी विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही. – आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही काम चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. – सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे. – शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे. – आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. – स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत – शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले. – आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले. – आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. – काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे. – युवा शक्ती भारताची मुख्य ताकत. – देशाचा प्रत्येक पैसा राष्ट्र निर्माणासाठी वापरला जात आहे. – १० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. – सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपाने सिद्ध केले आहे. – दलालाना बाहेर काढता येते हे भाजपाने दाखवून दिले. – देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे. – सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. – आपल्या आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलले. – २००४ ते २०१४ ही दहावर्ष देशाने भ्रष्टाचार, घोटाळयामध्ये गेली. – सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचे चित्र वेगळे असते. – २००४ च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता. – देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे – मला आज जास्त वेळ बोलायचे आहे. – भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे. – दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशालस्वरुप झाले आहे. – देशातील १६ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

पटेलांच्या भारतात सामील होऊ नका , अशी संस्थानिकांना पत्रे कुणी लिहिली होती म्हणे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही. अरविंद पांगारिया, अरविंद सुब्रमण्यम्,सुरजीत भल्ला ,उर्जित पटेल ही सर्व परदेशस्थित आर्थिक क्षेत्रातील तज्ञ मंडळी. कालावधी पूर्ण न करता हे सर्व लोक सोडून गेले. आणी आता आलोक वर्मा. 'आम्हालाच सर्व कळते कारण आम्ही निवडून आलो आहोत' हा माज भाजपा-सेना युतीला १९९५-९९ ह्या काळात होता. चांगले काम तेव्हा झाले असूनही १९९९ च्या निवडणूकीत माज मतदारांनी उतरवला व पुन्हा काँग्रेसला निवडून आणले. ईतिहास सर्वानी लक्षात ठेवायला हवा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार. श्री मोदी आणि श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे विचार पक्षीय दृष्टिकोनातून असतील त्यामुळे एकांगी/ पक्षपाती असतील हे गृहीत धरले तरी एक निष्पक्ष न्यायाधीश जर तातडीने त्यांना हटवा यावर शिक्का मोर्तब करतो याचा अर्थच "पाणी मुरते आहे" हे स्पष्ट आहे. काँग्रेसने जेवढी जहरी टीका केली त्यामधेय हा एक मुद्दा खुबीने टाळला आहे यातच सर्व काही आले.

In reply to by सुबोध खरे

आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली? वर्मा ह्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नाहीत ( https://www.livelaw.in/top-stories/no-evidence-of-corruption-against-al… ) आलोक वर्मा काही महत्वाच्या केसेस हाताळत होते. १) पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी भास्कर खुल्बे केस. (ह्यांचे नाव बंगाल मधील कोळसा घोटाळ्यात आले होते) २)रजेवर जाण्याआधी राफेल घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी यशवंत सिन्हा/प्रशांत भूषण ह्यांनी केली होती. ३)पंतप्रधान कार्यालयातील दुसरे अधिकारी- हसमुख आढिया केस. सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी हसमुख आढिया ह्यांनी नीरव मोदीला व मेहुल चोक्सीला मदत केल्याची तक्रार केली होती. ४) स्टर्लिंग बायोटेक- संदेसरा कुटुंबीय. राकेश अस्थाना ह्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. अस्थाना ह्यांच्या मुलीचे लग्न संदेसरा ह्यांच्या फार्म हाउसवर झाले होते. https://www.indiatoday.in/india/story/cases-that-were-on-alok-verma-s-t… आता वर्मा ह्यांना ३१ जानेवारी पर्यंतही वेळ का दिला नाही ते लक्षात आले असेल ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई साहेब, आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली? अजुन तुम्ही लक्षात घेत नाहीत की सिबीआय च्या मुख्य अधिकार्याला नेमणुकीसाठी तिन लोकांची कमिटी नेमलेली आहे. त्यात मलिक्कर्जुन खरगे एक न्याय मुर्ती व पंत प्रधान सामिल आहेत. अस असताना सुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न कसे काय पडतात ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार. **(( - एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही. )) ** तुम्ही फारच नाईव्ह आहात ! सुडाच राज कारण काँग्रेस कस खेळत हे बघायला उघड्या डोळ्याने ईतिहास बघायला हवा !! ईतक्या लोकांनी पुरावा दिला, कोर्टात साबित झाल तरीही, मिडीया व काँग्रेस अजुनही इसरत जहान व सोहराबुद्दीन ह्या फेक एन काँऊंटर म्हणुन प्रसिद्ध आहेत. हलकट लोक आहेत हे. नेताजींना व लाल बहादुर शास्त्रींना संपवुन वर अहिंसेचा खेळ खेळत आहेत.

In reply to by डँबिस००७

सोहराबुद्दीन्/ईशरत जहान एन्काउंटर खोटे नव्हते? त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

इसरत जहान केस : Was tortured, told to sign on Ishrat affidavit, claims former bureaucrat RVS Mani, former under secretary (Internal Security) in MHA, has claimed that he was used as a rubber stamp by government. Evidence in Ishrat case was engineered: Ex-bureaucrat RVS Mani alleged he was tortured by the SIT chief https://timesofindia.indiatimes.com/india/Was-tortured-told-to-sign-on-…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ईसरत जहान व तिचे तिन पाकीस्तानी साथीदार हे पर्यटनासाठी भारतात सशस्त्र फिरत होते ह्यावर फक्त सोनिया गांधी, दिग्विजय सिंग सारख्यांचा विश्वास बसला असेल !!

In reply to by डँबिस००७

सशत्र फिरत होते ? मुंबई(ठाणे) येथून ते अहमदाबादला गेले. ह्या प्रवासा दरम्यान गाडी थांबवता आली असती. मुंबई पोलिसाना कळवून त्याना आहे तेथेच अटक करण्यात आली असती. पण ५५० किमी प्रवास करू दिला व मारण्यात आले. ह्याचे कारण "मोदीना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा" ही बातमी द्यायची असे ठरले होते. हरेन पंड्या ह्यांचा मारेकरी शेवटपर्यंत मिळाला नाही. अनेक 'पाकिस्तानी' संशयिताना पकडण्यात आले व नंतर सोडून देण्यात आले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब तुमचा भाजप द्वेष सरळ दिसू लागला आहे. काहीही करून भाजप वर चिखलफेक करण्याची हि वृत्ती नैराश्य आणि चिडचिड यातून येते आहे असे दिसते आहे. डेव्हिड हेडली कोल यांनी मुंबईत न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबात इशरत जहाँ हि लष्कर ए तय्यबाची हस्तक होती हे स्पष्टपणे समोर आले आहे. With 26/11 co-conspirator David Headley confirming in his deposition before a Mumbai court that Ishrat Jahan was indeed a lashkar-e-Tayyeba operative तिची हत्या घडली कि घडवली हा मुद्दा वेगळा पण तिला क्लीन चिट देणारे कॉंर्ग्रेसी यांचे पितळ उघडे पडले आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर भरलेले खोटे खटले उघडे पडल्यामुळे त्यांना सोडावे लागले हि वस्तुस्थिती असून आजही तुम्ही त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत? अशी विधाने करता आहात हि लाजिरवाणी बाब आहे. The Congress-led Government of the day knew well that Ishrat Jahan was a terrorist. And yet, repeatedly and systematically, it sought to hide this fact from the public so that it could paint a political adversary in bad light. In the process, it also politicised what should have been a non-partisan security issue and polarised relations between communities. This only shows that, when it comes to politicking, the Congress's dirty tricks department has no problem in deifying a terrorist even if that’s what it takes to humiliate a political rival. the malicious political propaganda that had been unleashed by her apologists must end. In 2004, Ishrat Jahan, a 19-year-old college student suspected of conspiring to assassinate Mr Narendra Modi, then Chief Minister of Gujarat, was killed along with three associates by Gujarat Police in an armed encounter. Whether this encounter was staged is still being decided in a court of law. However, what has become clear is that Ishrat Jahan was no saint or martyr. She was an active member of a anti-India terrorist group and was planning to take down a sitting head of Government. This is not to suggest that she didn't deserve her day in court (assuming she was killed in a ‘fake encounter') or that it must not spark a larger debate on state-sanctioned extra-judicial killings that's for another day. The crucial issue now is the manner in which Ishrat Jahan's terror credentials were covered up or brushed aside with the sole intention of tarnishing the image of Mr Modi and his Government in Gujarat. https://www.dailypioneer.com/2016/columnists/reality-of-ishrat-jahan.ht… TerroristDavid Coleman Headley told a Mumbai court today that Indian investigators who met him in the US after he was arrested in 2009 did not pressure him to state that Ishrat Jahan, a college student killed by Gujarat's top cops, was a terrorist. https://www.ndtv.com/india-news/was-not-tutored-to-say-ishrat-jehan-was… असो आपल्या समतोलपणाचं पितळ उघड पडलंय. सांभाळून घ्या.

In reply to by सुबोध खरे

पुन्हा पुन्हा वैयक्तिक दोषारोप का ? हेडलीला निकम ह्यांनी काय प्रश्न विचारले होते ? त्याने त्याप्रमाणे उत्तर दिले. गुजरात फाईल्स हे पुस्तक कृपया वाचा. गुजरात मधील भाजपा नेत्यांचे व पोलिस अधिकार्यांचे पितळ उघडे पडले आहे. "ईशरत जहान अतिरेकी नव्हती. पण तिला संपवण्याचा आदेश वरून आला" असे खुद्द तिला ठार मारणार्या वंजारा ह्यांनी कबुली दिली आहे. (वंजारा/अमित शहा/सिंघल्/अमीन ह्या सर्व मंडळींचे पितळ उघडे पडले आहे. पुस्तक प्रसिद्ध होऊन १ वर्ष होऊन गेले. पण ह्या सर्व मंडळीनी त्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. कारण ह्या लोकांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले गेले आहे.) अमित शहा व मोदी ज्या मानसी सोनी ह्या तरूणीवर पाळत ठेऊन होते त्याबद्दल काय म्हणणे आहे? https://www.youtube.com/watch?v=KQg5JhA3LJI

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आपण गुजरात फाईल्स हे पुस्तक कोर्टात पुरावा म्हणून सादर करा की आपल्याला कोणी आडवलय.

In reply to by सुबोध खरे

भाजपद्वेष तर भाजपद्वेष.अहो माईंनी आता निदान एक बाजू घेतली आहे एवढे पुरे नाही का? नाहीतर मेली सदानकदा "ह्यांच्या" खांद्यावरून गोळ्या मारायची त्यांची सवय."ह्यांचा" खांदा आता निखळायला आला तरी! चला तर माई केरसुणी आणि लाटणे घ्या हाती जोरदार प्रहार करून फोडा ५६" छाती. बंदूक ठेवून ठेवून दुखतो "ह्यांचा" खांदा कुणी निंदा कुणी वंदा माझा खोट्याचा धंदा. झाली वैचारिक कावीळ दिसू लागली दुनिया पिवळी "ह्यांना" येई खोकला, निसटे माझी कवळी रिकामा वेळ हाताशी, नाही कसलेच टेन्शन "ह्यांचे" नाव दाखवून मीच घेते सगळे पेन्शन वापरून "ह्यांचे" नाव देते मी भाजपाला त्रास आमचे "हे" खरंच आहेत का नुसताच आभास. - कवी आपले हे नेहमीचेच आठवले नाहीत. ते वेगळे आहेत.

In reply to by तेजस आठवले

वैयक्तिक शेरेबाजी नको. मोदी सरकार बर्यपैकी काम करीत आहे असे आमचे मत आहे. अनेक केंद्रिय मंत्री, सुरेश प्रभु, नितिन गडकरी,धर्मेंद्र प्रधान.. सुषमा स्वराज.. ह्या मंडळींची कामे निश्चित कौतुकास्पद आहेत पण म्हणून मोदी/शहा ह्यांचा गुजरातमधील ईतिहास लपून कसा राहणार?

In reply to by डँबिस००७

चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते, नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कॉंग्रेस सारख्या गद्दार लोकात न जाता त्यांनी फौज तयार केली !! कॉंग्रेसच्या हलकट लोकांनी नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना युद्ध कैदी म्हणुन भारतीय कैदेत ठेवल , त्यापुढे जाउन कलकत्त्यात ९००० आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना त्यांच्या बॅरॅक मध्ये जिवंत जाळल ! जनतेचा रोष होउ नये म्हणुन तिथे जुट रीसर्च सेंटर उभ केल ! https://youtu.be/zf3fJU3FdW

In reply to by डँबिस००७

आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

इथं रागा आणि सोगा च्या केसेस हिरीरीने लढणारी काँग्रेसवाल्यांची फौज आहे. मग त्याच काँग्रेसमध्ये असणारे नेताजी सुभाषबाबू यांची केस लढवायला वेळ कॉन्रेसी लोकांना वेळ नव्हता? नेताजी कधीच रा स्व संघात नव्हते. रा स्व संघाने त्यांची केस का लढावी? इथे काँग्रेसच्या दुटप्पीपणा बद्दल चर्चा चालली आहे तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी रा स्व संघच दिसतोय का? उद्या विचाराल झाकीर नाईकांची केस रा स्व संघात एवढे वकील असून का लढत नाहीत> आजार हाताबाहेर जायच्या अगोदर इलाज करून घ्या

In reply to by सुबोध खरे

तुम्हाला कुणी कुणाची केस कधी लढली , हे ठाऊक आहे का ? https://hi.m.wikipedia.org/wiki/आजाद_हिन्द_फौज_पर_अभियोग http://zeenews.india.com/hindi/india/jawahar-lal-nehru-fought-for-save-… नई दिल्ली : दिल्ली के ऐतिहासिक लालकिले से आज भारत की पहली निर्वासित सरकार की स्थापना की 75वीं वर्षगांठ मनाई गई. इस सरकार की स्थापना नेताजी सुभाष चंद्र बोस ने की थी और वही इस सरकार के मुखिया थे. लेकिन जब सुभाष चंद्र बोस की मृत्यु हो गई और उनकी आजाद हिंद फौज के हजारों अफसर और सैनिक गिरफ्तार कर लिए गए तो देश के सामने चुनौती पैदा हो गई. अपने मित्र सुभाष की मृत्यु के बाद पंडित जवाहरलाल नेहरू ने इस काम को संभाला. उनके सामने सिर्फ यही चुनौती नहीं थी कि वे सुभाष के बलिदान और विरासत को संभालें. नेहरू को आजाद हिंद फौज (आइएनए) के उन हजारों सैनिकों को भी संभालना था, जो युद्ध में जर्मनी और जापान की हार के बाद ब्रिटिश सेना ने बंदी बना लिए थे. इनमें से बहुत से सैनिक दिल्ली के लाल किले में बंद थे. इन बंदियों में आइएनए के तीन प्रमुख कमांडर सहगल, ढिल्लन और शाहनवाज शामिल थे. इन तीनों को अंग्रेज सरकार ब्रिटेन के खिलाफ युद्ध छेड़ने के अपराध में फांसी की सजा सुना चुकी थी. देश आजादी की दहलीज पर खड़ा था. और आजाद हिंद फौज का एक हिंदू, एक मुस्लिम और एक सिख कमांडर मौत की दहलीज पर. हजारों आइएनए सैनिकों का भविष्य तो खैर अंधकार में था ही. तब नेहरू ने आइएनए डिफेंस कमेटी बनाई. इस कमेटी ने देश भर से आइएनए के सैनिकों की मदद के लिए चंदा इकट्ठा किया. इस कमेटी में देश के नामी वकील शामिल किए गए. इस समय तक देश में नारे लगने लगे: ‘‘चालीस करोड़ की ये आवाज, सहगल, ढिल्लन, शाहनवाज.’’

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

नेहरूंनी हे का केले नाही , गांधींनी हे का केले नाही , हे प्रश्न येऊ शकतात , तर कुणीतरी संघाने हे केले नाही , हेही विचारणारच, नेताजी संघाचे नव्हते , म्हनून त्यांची केस संघाने लढली नाही , हे बोलून तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले आहे ,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ? हि खाजवून खरूज कुणी काढली आहे? कोणत्याही धाग्याचा संदर्भ नाही. काही घेणे देणे नाही फक्त गरळ ओकायची. आपण शेण खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.

In reply to by सुबोध खरे

चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते, नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ? याचा आगापिछा चालू घडामोडीत काय आहे?

तसेही अहींसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणुन खोटे पसरवणारे नेहरुच होते. १५ ऑगस्टच्या पुर्वी आझाद सेनेच्या सेना पतींचा जय जय कार करणारे नेहरु . स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र लाल किल्यावरुन " माऊंटबॅटन की जय " चा नारा दिलेला सगळ्यांनी बघितलेले आहे.

In reply to by डँबिस००७

अडकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने फेसबुकच्या माध्यमांतून जवानांना जाळ्यात अडकवले होते. जैसलमेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. २०१६ मध्ये सोमवीर जाळ्यात अडकला. त्यांनतर सोमवीरच्या फ्रेंड लिस्टमधील इतर काही जवानही जाळ्यात आडकल्याचा संशय आहे. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अरे वा, माईसाहेबांसारखे तुम्हालासुद्धा 'हे' आहेत होय?! =)) तुमच्या प्रतिसादाच्या वरचा प्रतिसाद पाहता, ते मोगाखान आहेत असा अर्थ होतोय!!! =)) =)) =))

नँशनल हेराल्ड या बहुचर्चीत खटल्यावर आणि त्यातील इतर कायदेशीर बाबींविषयी उकल करणारा हर्षवर्धन दातार यांचा महत्वपुर्ण लेख! ( मी आजपर्यंत या केसचा विचार Locus standi या आधारावर करत होतो, पण मला यातून खूप कांही नव्याने समजले) १. नॅशनल हेराल्ड खटल्यातल्या आयकर कायद्याशी निगडित भागावर टिप्पणी करणारी ही पोस्ट. फौजदारी कायद्याशी निगडित भागावर काहीही होणार नाही याची मला तरी खात्री आहे कारण तिथे MENS REA म्हणजे गुन्हेगारी उद्देश सिद्ध करणे अवघड आहे. आयकर खटल्यावर सध्या बरीच सुंदोपसुंदी माध्यमांमध्ये सापडत आहे. २. ही पोस्ट दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे. खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे. ३. १९९८ मध्ये यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी GIFT TAX रद्द केला. पुढे २००४ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी याला आयकर कायद्यात अंतर्भूत केले. तेव्हाच्या तरतुदीनुसार एखादा मनुष्य किंवा एच यू एफ यांना 'नातेवाईक' नसलेल्या व्यक्तींकडून 'भेट' किंवा 'GIFT' मिळाल्यास त्यावर 'आयकर' द्यावा लागत असे. आजही तरतुदी तशाच आहेत पण आज अन्य प्रकारच्या व्यक्तीही (उदा. भागीदारी संस्था, LLP, कंपनी, ई.) यात समाविष्ट आहेत. ४. एखाद्या कंपनीने तिचे शेअर्स जारी करताना, दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य जर घेतले आणि ते सकल मूल्य, त्या शेअरच्या बाजारभावापेक्षा जास्त असेल तर फरकाच्या पैशांवर आयकर द्यावा लागतो. उदा. १० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ४० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर २० रु. वर कंपनीला कर द्यावा लागतो. पण तोच शेअर ५० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. याशिवाय ज्या व्यक्तीला हे शेअर्स दिले आहेत ती व्यक्ती जर आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. (हा मुद्दा नॅशनल हेराल्ड खटल्यात सगळ्यात महत्वाचा आहे) ५. पं. नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली/प्रभावाखाली १९३७ मध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, त्यात जवळपास ५००० भागधारक होते. आज ही कंपनी 'नॅशनल हेराल्ड' नावाचं इंग्रजी वृत्तपत्र चालवते. त्या ५००० भागधारकांमध्ये बरेचसे स्वातंत्र्यसैनिक होते ज्यात पुरुषोत्तम दास टंडन, कैलाशनाथ काटजू (न्या. काटजूंचे पिताश्री), गोविंद वल्लभ पंत, ई. लोक होते. २०१० मध्ये त्यात जवळपास १००० भागधारक उरले. पुढे कंपनीने काँग्रेस पक्षाकडून ९०.२१ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले होते, हे कर्ज २०१०-११ मध्ये काँग्रेस पक्षाने शेअर्समध्ये रूपांतर करून, शेअर्स 'यंग इंडियन' नावाच्या तिसऱ्या कंपनीला देण्याची सूचना केली. हा व्यवहार भागधारकांच्या सभेत मान्यही झाला, अन हे शेअर्स 'यंग इंडियन' ला जारी करण्यात आले आणि कर्ज वळते करण्यात आले. (या व्यवहारात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने कसलेही अधिमूल्य आकारले नसल्याची कागदोपत्री नोंद/पुरावा आहे.) ६. 'यंग इंडियन' एक नफा न कमावणारी कंपनी म्हणून कंपनी कायद्याच्या (१९५६) कलम २५ मध्ये नोंदणीकृत कंपनी आहे. तिला आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' म्हणून मान्यताही होती. या कंपनीचे ७६% भागधारक राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत, ऑस्कर फर्नांडिस १२% आणि मोतीलाल व्होरा १२% भागधारक आहेत. ७. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे भागधारक 'यंग इंडियन'. 'यंग इंडियन'चे भागधारक राहुल गांधी, सोनिया गांधी, ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे शेअर्स 'यंग इंडियन'ला जारी करताना फायदा झाला असे सरकारचे म्हणणे आहे अन त्या फायद्यावर 'यंग इंडियन'च्या भागधारकांनी कर बुडवला असा सरकारचा दावा आहे, अन त्यावर पुढचे राजकीय इमले चढवण्यात आले आहेत. ८. २०१७ मध्ये 'यंग इंडियन' कंपनीचे आयकर कायद्यांतली नोंदणी रद्द करण्यात आली. या कृतीला आयकर लवादासमोर आव्हान देण्यात आले. हा खटला आजही प्रलंबित आहे. जरी 'यंग इंडियन' कंपनी हा खटला हरली तरी नोंदणी रद्द करण्याची कारवाई पूर्वलक्षी प्रभावाने करता येऊ शकत नाही, असं कोर्ट सांगते. त्यामुळे २०१०-११ च्या व्यवहारांवर २०१७ मधल्या विवादास्पद हालचालीच्या भरवश्यावर करआकारणी करता येऊ शकत नाही. ९. ३१ डिसेम्बर २०१८ रोजी, सरकारने (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT) एक परिपत्रक काढले आणि असे घोषित केले की जर एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. 'भेट' किंवा 'GIFT' च्या तरतुदी शेअर्स विकत घेताना किंवा विकताना लागू होतील पण स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. त्याचा नॅशनल हेराल्ड खटल्यावर परिणाम होईल असे दिसल्यावर २ दिवसांत मागेही घेतले अन स्वतःचे हसे करून घेतले. याची कारणे सर्वोच्च न्यायालयात द्यावी लागतीलच. भक्तमंडळी याला 'काँग्रेसचा' घातपात/षडयंत्र वगैरे नावं देताना दिसतात पण याचे मूळ कारण असे आहे की वेगवेगळ्या स्टार्टअप उद्योगांना या तरतुदींचा वापर करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या अन त्याविरुद्ध वाणिज्य, उद्योग मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली होती. १०. दिल्ली उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे रिट याचिकेत दाखल करून घेण्यास नकार दिला आणि आयकर कायद्यातल्या अपील तरतुदींसाठी हे सर्व मुद्दे सुरक्षित असल्याचे सांगितले. याविरुद्ध खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे. ११. आता प्रश्न उरतो मनी लॉण्डरिंग आणि फौजदारी तक्रारींचा, आयकर बुडवल्याचा दावा जर टिकला नाही तर मनी लॉण्डरिंग खटला आपसूकच रद्द होईल. हा सगळा जुमला सुब्रमणियम स्वामींनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर विसंबून उभारण्यात आला आहे. १२. सर्वोच्च न्यायालयात यावर पुन्हा युक्तिवाद होतीलच पण ती एक रिट याचिका आहे आणि मूळ आयकर खटला खालच्या पातळीवर स्वतंत्रपणे लढवला जात आहेच. १३. ज्यांना राजकीय गरळ उधळण्याची हौस असेल त्यांना शुभेच्छा. #न्यायभारत #सीएच्यानजरेतून #NationalHerald भाग १२ (ही किंवा अन्य कोणतीही पोस्ट शेअर करा, कॉपी पेस्ट करा, विचारण्याची गरज नाही. स्वतःच्या नावावर पोस्ट केली तरी माझी काही हरकत नसेल.) © Harshvardhana Datar.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मस्त स्ट्रॅटेजी... "मी दगड मारतोय. पण तो दुसर्‍या कोणीतरी माझ्या हातात दिला आहे. मला काहीही विचारू नका. (थोडक्यात, मी दगड मारणार. पण, मला जबाबदार धरू नका.)" काय पण नैतिकता ! अवांतरः सद्याच्या सामाजिक माध्यमांसंबंधीच्या कायद्याप्रमाणे, मूळ लेखका इतकाच, तो मजकूर पुढे सरकवणाराही जबाबदार असतो.

In reply to by ट्रम्प

सुब्रमण्यम स्वामीनीं कोर्टा मार्फत कॉंग्रेस पक्षाने नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटी रु कसे transfer केले ? कॉंग्रेस पक्षाने ९० कोटी रु कुठुन आणले ? असे प्रश्न विचारलेत त्याचे कागदी पुरावे बँक स्टेटमेंट मागीतलेत ! सो गा व रागा हे मुख्य आरोपी आहेत. कोर्टाने त्यांना बेलवर बाहेर सोडलेल आहे . त्यांना सु स्वा च्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत !!

आता सगळ्या देणग्या चा हिशोब द्यावा लागतो हो , पूर्वी काय हापापा चा माल गपापा ! . चांगल आहे . उद्योगपति कडून पक्षा साठी घेतलेल्या देणग्याच्या अफ़रातफ़री चा प्रयोग नेहरू पासून चालू आहे म्हणजे !!!!

In reply to by ट्रम्प

राजकीय पक्षांच्या देणग्या मोदी सरकारने चौकशीमुक्त केल्या, सन 2018 नेहरूंचा मृत्यू 1964-65 सुमारास जाहला, https://www.thehindu.com/news/national/lok-sabha-passes-bill-to-exempt-…

In reply to by ट्रम्प

पूर्वी काय हापापा चा माल गपापा पूर्वीच नाही तर आता सुद्धा कॉंग्रेसचा अजेंडा तोच आहे !! "हापापा चा माल गपापा " नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटीच कर्ज दिल्याच खोटी कागद पत्र केली मग नॅशनल हॅरॉल्डची ५००० कोटीची मालमत्ता ह्यांच्या (म्हणजे सो गा व रा गा ) घश्यात गेली ! आता दोघेही बेल वर बाहेर आहेत !!

1995 च्या वेळी लखनऊ मधील गेस्टहावुस मध्ये बहनजी आणि त्यांच्या आमदारांची अखिलेश सरकार चा पाठिम्बा काढण्या विषयी मिटिंग चालू असताना अखिलेश च्या समर्थकानी बहनजी वर हल्ला केला , जातिवाचक शिविगाळ केल्या होत्या . तेव्हां पासून ते कट्टरवैरी झाले होते . आता 23 वर्षांनंतर त्याच बुवा भतीजा ला राजकीय अस्तित्व टिकवन्यासाठी पुन्हा एकत्र यावे लागले व त्यांनी सोइस्कर रित्या काँग्रेस ला बाजूला ठेवून जागा वाटप केले . स्व. नरसिंहराव यांच्या नंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतृत्व विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार (१९९९) यांच्याकडे होते. या पदावर असताना पवार यांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ३८ खासदार निवडून आणले होते. पण जेव्हा पंतप्रधानपदासाठी नाव सूचवायची वेळ आली तेव्हा स्वतः सोनिया गांधी पुढे सरसावल्या. अर्थात, त्यांचे  विदेशीपण पाहून इतरांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. खरे तर तेव्हा विरोधी पक्षनेता असलेल्या पवार यांचे नाव पुढे केले असते तर इतरांनी पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असता. नंतर पवार, स्व. पी. संगमा व तारिक अन्वर यांनीही सोनियांचे विदेशीपण हा मुद्दा काँग्रेसमध्ये उचलला. सोनियांच्या भक्तांनी तिघांची हकालपट्टी केली होती .https://hindi.timesnownews.com/amp/india/article/ncp-chief-sharad-pawar… म्हणजे सत्ते च्या सारिपाटावर एकमेकांचे जुने वैर विसरून एकत्र आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदींचे आभार मनावयास हवे . ऊदा : मोगा , ब्लैककैट , गोडसे , विशुमित , माई , व इतर . कृ ह घे.

In reply to by ट्रम्प

तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी आहेत?? हा फक्त वाद संवाद चालू आहे. प्रतेक्षात सगळे (मोदी समर्थक, विरोधक अणि निव्ट्रल) वेगळी विचारधारा असताना सुद्धा एकमेकांचा बर्यापैकी आदर ठेवून आहेत. उगाच मोदी प्रेमापायी मिपावर फुट पाडू नका. == उगाच नाही तिथे माझे नाव घायचा अती शहाणपणा करु नका, हा निर्वाणीचा इशारा!

In reply to by विशुमित

हेच म्हणते. वैयक्तिक टीका करायची सवय काही मंडळींना येथे आहे. मोदींवर्/भाजपवर टीका झाली की ही मंडळी थेट स्वातंत्र्य्पुर्व काळात जातात. नेहरू बोस ह्यांच्यावर पाळत ठेऊन होते, शास्त्रींचा खून झाला होता... असे मानणारे लोकही येथे आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जगतीक महायुद्ध १ व २ च्या बॅकग्राऊंड वर जिथे युद्धात अक्षरशः करोडो लोक मारले गेले व ज्या युद्धात भारताचे किमान २५ लाख लोक मृत्युमुखी पडले ( भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नव्हता, ब्रिटीशांनी भारताला युद्धात ढकलल होत, गांधींनी ब्रिटीशांना भारतीय सैनीक वापरायची परवानगी दिलेली होती ) ह्या युद्धात स्वतः फक्त ४.५ लाख ब्रिटीश मारले गेले. या युद्धापुर्वी करोडो ज्यु लोकांचा अमानुषपणे संहार करण्यात आलेला होता त्या पुढे गांधीजींच्या अहिंसा चळवळीमुळे भारताला ईंग्रजांनी स्वातंत्र्य दिले हे मानणारे लोक आहेत. https://www.youtube.com/watch?v=7cgRwDkP6vk नेहरुंनी सत्ता कशी बळकावली, सरदार पटेलांचा तसेच नेताजींचा काटा कसा काढला, आझाद हिंद सेनेच्या नावाचा कसा वापर करुन घेतला मग आझाद हिंद सेनेला कस बाजुला ढकलल, नेताजींना भुमिगत व्हाव लागल हे समजण्यासाठी ईतिहास उघडया डोळ्यानी शिकावा लागतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा, ईतिहास हा सहजा सहजी पुसला जात नाही, नेहरुंनी काय काय उपद्व्याप केले होते हे सर्वांनाच माहिती आहे. लाल बहादुर शास्त्रीजींच्या मृत्युबद्दल ही असच गुढ अजुन आहे . जे नेहरुंनी केल ते ईंदिरा गांधीनी केल नसेल हे कश्यावरुन ? कारण लाल बहादुर शास्त्रीजींच्या नंतर पंत प्रधान पदी वर्णी ही त्यांचीच लागलेली होती.

In reply to by डँबिस००७

भाजपाच्या कुजबुज आघाडीची मते येथे नकोत. नेहरूंनी उपद्य्व्याप केले, पटेलांचा काटा काढला ह्यावर ठाम विश्वास असेल तर मोदी/शहा किंवा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने पुरावे आणावेत व टी.व्ही.वर सरळ सांगून टाकावे. पण ते धैर्य व हिंमत त्यांच्यात नाही. म्हणून समाजमाध्यमांतून अफवा पसरवायच्या.