Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227978
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मिपाकरांचा जीव थंडावला , हे बरे झाले , भाजपात दुसरी फळी , तिसरी फळी यांच्यावरून चिंतातुर होते, आता चांगली फणसाच्या झाडाची फळी घावली !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

चिंतातुर तुमच्यासारखे "बाहेरचेच" होते. भाजपाला चिंता नव्हतीच. त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे. बाकी दिसायला दिसतं ते निवडणुकीची/ सत्ताकारणाचा अपरिहार्यता (पोलिटिकल कंपल्शन). कारण "राज"कारण स्वच्छ असू शकतं. "सत्ता"कारण नाही त्यावरून विरोधक ठणाणा करत असतात. त्यांना बोंबलू द्यायचं. हा का ना का

In reply to by सुबोध खरे

आम्हाला नाय हो चिंता, पण मायबोलीवर कुणीतरी बोलत होते , राणे हे फळी की शेवटचा खिळा ? म्हणून तुम्हाला सांगितले ,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्येची काळजी करन्याबिगर, तुमच्या मालकीन-मालकाच्या कबाटातून लईच दलालांची हाडं धडा धाडा भायेर पडू लागलीत तीकडं बगा की. का तिकडं बगीतलं की काळजात लईच धडधड व्हतीया म्हनून दुसर्याच्या घरात डोकाऊ लागलाय? =)) =)) =))

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आम्हाला नाय हो चिंता, मग कशाला प्रत्येक धाग्यावर पचपच करताय? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून

MT: भाजप रोडरोमियोसारखा मागे लागलाय: संजय राऊत http://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/shiv-sena-mp-sanjay-… महाराष्ट्रातील तथाकथित हिंदूवादी पक्ष सेना आणि भाजप पुन्हा एकदा कुत्र्यासारखे भांडायला लागले आहेत आणि यामध्ये मरण त्यांना मते देणाऱ्याचें होत आहे . बिहार आणि ओरिसा राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील सेनेला मोठेपणा दिला असता तर भाजप चे नेते भिकेला लागले असते का ? पण नाही अमितशाह ला शतप्रतिशत भाजप च वेड लागलय आणि त्या वेडा मध्ये पाच वर्ष सेने बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून सेनेच्या शेपटा वर पाय द्यायला सुरवात केली , मग सेना भूंकनारच ना ? बिहार मध्ये कस भांडण लवकर मिटवून एकत्र निवडणूकिला सामोर जाण्याची तयारी केली , मग महाराष्ट्रात त्यांना काय रोग आला होता ? या दोघाच्या भांडाणा मुळे कॉ व रा कॉ चा फायदा नाही झाला म्हणजे मिळवली !!!

In reply to by ट्रम्प

सेना-भाजपवाले दिवसा नळावर भांडल्यासारखे भांडतात व रात्री एकत्र प्यायला बसतात.. असे ह्यांचे मत. आपापल्या कार्यकर्त्याना बरेच तापवायचे व नंतर निवडणूकीच्या आधी 'थंड' करायचे. गेले २५ वर्षे हेच चालू आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-leader-sanjay-raut-… मी आधीच म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा कॉपीराईट घेतल्यासारखे हे वागणे आहे.काय भाषा. संदर्भ : https://www.misalpav.com/comment/985992#comment-९८५९९२ अर्थात जिथे दोन भांडणाऱ्यांत पहिले कानाखाली कोणी वाजवली ह्यावर मर्दूमुकी ठरते(मग पहिला काडीपैलवान असला आणि पुढे त्याने दुसर्याकडून मरेस्तोवर मार का खाल्ला असेना) तिथे दोघातला कोणता पक्ष लोकांवर प्रभाव पाडतो हे सांगणे तितकेसे कठीण नसावे.

सर्वाना आरक्षण आले ते बरे झाले , म्हणजे आता परदेशात जाऊन बक्कळ पैसा मिळवून , वर आम्हाला आरक्षण न दिल्याने आम्ही देश सोडला , किंवा पूल पडला तो आरक्षित माणसांमुळे पडला, असले फेसबुक्की , व्हॅटसप मेसेजेस बंद होतील, तसेही यावर्षीच्या आंदोलनानंतर असे मेसेजेस आलमोस्ट बंदच झाले आहेत. –-------------------–------------------ सवर्णांमध्ये कोणा-कोणाला मिळेल आरक्षण – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्याहून कमी – ज्याची ५ एकर किंवा त्याहून कमी शेत जमीन – ज्याचे १ हजार चौ.फुटापेक्षा कमी जागेवर घर – राजपूत, भूमिहार, बनिया, जाट गुर्जर यांना या श्रेणीत आरक्षण मिळेल. – शिक्षण (सरकारी किंवा खासगी), सावर्जनिक रोजगारात याचा फायदा मिळेल. – यासाठी संविधानातील अनुच्छेद १५ आणि १६ मध्ये दुरूस्ती केली जाईल. – ज्यांना अजून आरक्षणाचा फायदा मिळाती नाही, अशा आर्थिक मागास घटकातील गरिबांना आरक्षण दिले जाईल. –----------------------------- सरकारचे अभिनंदन

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कागलकर तुम्ही फेबु, व्हॉट्सअँप वर पडीक असता मग रुग्ण कधी तपासता ? तुम्हाला मिपावर तहहयात आरक्षण कसे काय मिळते ते पण सांगा एकदा सगळ्यांना.

देशात नव्याने सुरु झालेल्या Iconic ट्रेन १८ वर रेल्वे ट्रॅकवरच्या माणसाने दगड भिरकावला ! त्यामुळे ट्रायल वर वेगाने जाणार्या ह्या ट्रेनची एक ग्लास फुटली ! आत प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत झालेली नाही ! कसल्या मानसिकतेचे प्रदर्शन हे दगड फेके करतात ? काय आसुरी आनंद मिळतो त्यांना ? काही वर्षांपुर्वी मुंबईत लोकल वर झालेल्या दगड फेकीत एका स्रीला आपला डोळा गमवावा लागला होता!! तो अपराधी मिळाला वा नाही हे समजल नाही !!

In reply to by सुबोध खरे

चालणार्या रेल्वेवर विरुद्ध दिशेने येणारा दगड हा खुप फोर्स ने लागत असतो, अगदी छोट खडाही असा रेल्वेवर लागला तर काचेची खिडकीच काय, अल्युमिनियमची भींत ही तडकवु शकतो. हे रेल्वे च्या ट्रॅकवर दगड फेक करणार्या लोकांच्या डोक्यात येत नसते, त्यांच्या मते ते गंम्मत करत असतात पण कोणा एकाद्याच्या जिवाशी खेळ होतो. अश्या लोकांना जर पकडायच असेल तर रेल्वेच्या आजु बाजुला कॅमेरे लावावे लागतील पण हे अशक्य आहे. लोकांनीच हे काम करायला पाहीजे, आपल्या मोबाईल मध्यल्या कॅमेर्याने फोटो घेऊन पोलिसांना द्यावे व पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा.

एखाद्या दुर्दैवी अपघातात आपल्या कॅमेर्यात लाईव्ह गोष्टी कैद करणारे महाभाग अश्या गोष्टी आपल्या जवाबदारी खाली येतात हे विसरतात.

पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा. आणि याला सार्वत्रिक प्रसिद्धी द्यावी पण आपल्याकडे असे झाले तर मेणबत्त्या घेऊन हलकट मानव अधिकार वाले मोर्चा काढतील आणि त्या पोलिसांवर चौकशीचा ससेमिरा लागेल.

In reply to by सुबोध खरे

उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची? भारतात अनेक वेळा पोलिस निर्दयपणे मारतात, संशयित म्हणून अनेक महिने डांबून ठेवतात, एन्काउण्टरच्या नावाखाली पैसे उकळतात.. ही वस्तुस्थिती आहे ना ? मध्यमवर्गाला ह्याची सहसा ह्याची झळ पोचत नाही पण गरीब वर्गातील अनेकांना हा नुभव येतो. 'विजय' चोर, जो अर्थमंत्र्यांना पळण्याआधी एक दिवस भेटतो , ३० बॅगा भरून इंग्लंडला पळतो, बाकीचे 'नीरव' चोर/संदेसरा चोर... ह्या चोरांना भारतात आणून 'पोलिसी खाक्या' कधी दाखवला जाणार ? की मग आता इंटरपोलच्या नावाने रिसीट फाडायची?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब सामान्य माणसांना आणि असामान्य माणसांना कायदे वेगळे असतात. तुमच्या ह्यांना "घोटाळा" करून कुरसुंदीहून ३० बॅगा घेऊन परदेशात पळून जात येईल का? मल्ल्या साहेबाना मदत करणारे कोण कोण आहेत ते पाहून घ्या हो. He was elected to the Rajya Sabha as independent member twice from his home state of Karnataka, first in 2002 with the support of the Janata Dal (Secular) and Indian National Congress and then in 2010 with the support of the Janata Dal (Secular) and BJP [37]. तेंव्हा त्यांना बाहेर जाण्यास कुणी कुणी मदत केली असेल ते समजून घ्या असे करणारे लोक हाताच्या बोटावर मोजता येतील असे असतात. आणि त्यांना सहजासहजी कोणी हात लावू शकत नाही. श्री मोदी यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षा जास्त संपत्ती जप्त करून केवळ विरोधी पक्षाचा नव्हे तर स्वपक्षातील लोकांचा रोष ओढवून घेतलेला आहे. राजकारण हे असंच आहे. श्री राहुल गांधी अमेरिकेत परकीय चलनाच्या घोटाळ्यात अडकले( मादक द्रव्याच्या लफड्यात असे गुप्तचर विभागाचा अहवाल सांगत असे) असताना श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले "वजन" खर्च करून त्यांना सोडवले होते हा इतिहास आहेच ना? ज्या दहशतवाद्याला ए के ४७ आणि हातबॉम्ब सकट पकडले असता दुसऱ्या दिवशी तो जामिनावर सुटतो आणि पुढच्याच शुक्रवारी फारुख अब्दुल्लांबरोबर नमाज पढताना दिसतो हे माझ्या वर्गमित्राने स्वतः पाहीलेले उदाहरण आहे. सुरक्षा दलांनी एक्सीलरेटरवर पाय द्यायचा आणि राजकारण्यांनी ब्रेक मारायचा अशी नैराश्य आणणारी स्थिती कायमच दिसत आली आहे. अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो. पण कोणीही उठावे आणि रेल्वेवर दगडफेक करावी हे कसे चालेल. असे सरसकटीकरण होऊ दिले जाणे राजकारणी लोकांना कसे चालेल? बाकी मानव अधिकार वाल्यांबद्दल न बोलणेच चांगले. याकूब मेमनला मानवाधिकार असतात पण मेजर गोगोई यांनी केवळ दहशतवाद्याला जीपला पुढे बांधले म्हणून त्यांची चौकशी झाली हि आपल्याकडे शोकांतिका आहे. त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले. https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to…

In reply to by सुबोध खरे

घोटाळे केले , हा एक गुन्हा , तो काँग्रेस काळात झाला , मग पळून जाणे , हा दुसरा ( स्वतंत्र) गुन्हा , तेंव्हा सरकारात कोण होते , त्यांच्यावरही जबाबदारी येणारच ना ? की सगळ्याला नेहरू गांधी काँग्रेस जबाबदार ? 5 वर्षे बाजपेयीं व 5 वर्षे मोदी येऊनही काँग्रेस काळात सर्वाना न्याय सारखा नव्हता , याचे तुणतुणे कशाला ? आणि कर्जापेक्षा जास्त वसुली कुठल्या प्रकरणात केली म्हणे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

साक्षात इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो. मग फक्त आमच्या बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा म्हणे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा हो ना बिचारे काँग्रेस वाले त्यांचा २ G, कोळसा, कॉमन वेल्थ इ. कशाकशाशी संबंध नाही. हे प्रेसवाले उगाच त्यांना बदनाम करत आहेत. पण ते प्रेस वाले तर काँग्रेसचेच खाते पिते आहेत ना? बघा ना घरचं खाऊन परक्याची चाकरी करायची म्हणजे? नाक्यावर ऐकलेला एक संवाद

In reply to by सुबोध खरे

राहुल गांधी , डॉलर ( ड्रग ? ) हेही प्रकरण सांगोवांगीच दिसते आहे .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हे प्रकरण २००१ साली आम्हीही ऐकले होते रे ब्लॅक-कॅट्या. तेव्हा दोन प्रश्न पडले होते जे अजूनही अनुत्तरीत आहेत. १) वाजपेयीनी अमेरिकन अध्य़क्षांना फोन केला होता असे ऐकले होते. खरे तर अशी अनायासे काँग्रेसच्या बदनामीची संधी चालून आली असताना भाजपाने ही संधी सोडली कशी? २) अमेरिकन कस्टम खाते ज्यात सरकारी हस्तक्षेप सहसा नसतो, त्यांनी असे सहजासहजी सोडून दिले? हे ही विश्वास ठेवायला कठिण वाटते.

In reply to by सुबोध खरे

मूळ 2001 की 3 ची एकही बातमी नाही, हा त्याला बोलला , तो ह्याला , मग त्याने पेपरात लिहिले , ते वाचून तुम्ही लिहिले , असेच ते आहे ,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

२००१ चे हि दुवे आहेत पण ते तुम्हीच जरा खणून काढा (नुसती पचपच करण्यापेक्षा) . तुम्हाला सोयीचे काही होईल असे करण्याची माझी मुळीच तयारी नाही. सुब्रमण्यम स्वामी हे एक खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खोटे बोलत आहेत म्हणून खटला करण्याची गांधी कुटुम्बाची हिम्मत होत नाही यावरून काय ते समजून घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

(उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची) ==)) आजकाल ती फ्याशन झाली आहे. विषय कोणता ही असो पुरोगामी, मानव अधिकार, पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का === तरी प्रतिसादकर्ते System मधे काम केले ले आहेत.असो...

In reply to by विशुमित

त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले. https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to-... हा दुवा वाचला का? काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही? का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे. दहशतवादापासून आपल्या सैनिकांना वाचवणार्या सैनिकी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचं लफडं लावलं आणि ज्याला जीपला पुढे बांधलं त्याला १० लाख रुपये दिले. गटाराचे झाकण नसल्याने त्यात वाहून गेलेल्या माणसाच्या कुटुंबाला २ लाख मिळतात. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून २ लाख मिळतात. रेल्वे अपघातात गेलेल्या तरुण माणसाच्या विधवेला ५ लाख रुपये मिळतात. मग हा गोमाजी कोण लागून गेला हो? का काश्मीरच्या मधल्या माणसांचे मानवाधिकार इतर भारतातील माणसांपेक्षा जास्त आहेत. बाकी "पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का" हे सर्व वड्याचे तेल वांग्यावर नात्याने या प्रतिसादात आणले तेंव्हा तुमचा पूर्वग्रह लगेच दिसून येतोच आहे. तेंव्हा चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

https://www.indiatoday.in/india/story/farooq-ahmad-dar-tied-to-army-jee… पोलीस म्हणतात की तो फक्त वोटिंगला घराबाहेर आला होता, जर अतिरेकी होता , तर त्याच्यावर कारवाई कधी झाली होती का ? की नुसते जीपला बांधून सोडून द्यायचे , हीच कारवाई ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कसाबला सर्व पुरावे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले तुकाराम ओंबळे यांनी बंदुकीसकट पकडला तरी दहशतवादी जाहीर करून फाशी द्यायला पूर्ण चार वर्षे लागली फुकटच्या फुसकुल्या सोडू नका. दहशतवादी पकडणे आणि त्याला कोर्टात उभे करून शिक्षा देणे हि गोष्ट मिपावर दर वेळेस हाकलले तरी लोचटासारख्या नवीन नवीन आय डी घेऊन येण्या इतके सोपे वाटले का? काश्मीर पोलिसांची निष्ठा कुठे पाणी भरते आहे ते एकदा श्रीनगरच्या पुढे चार दिवस प्रवासी म्हणून राहून या म्हणजे मग कळेल. आणि जीपला बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळणार असतील तर मी दर महिन्याला जीपला उलट टांगून घ्यायला तयार आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सर्वात महत्वाचे म्हणजे , हे प्रकरण झाले 2017 ला , तेंव्हा खुद्द काश्मिरात भाजपा व केंद्रात मोदी सरकार होते, जर तो अतिरेकी असता तर मोदी सरकारने त्याला आत टाकला असता , पण कदाचित तो अतिरेकी नसेल म्हणून त्याच्या मनसतापाची भरपाई म्हणून मोदी सरकारनेच त्याला दहा लाख दिले ( अजून 5 द्यायला हवे होते , म्हणजे एकाला तरी 15 लाख मिळाले असते ! ) त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ? ==अरर्रा खतरनाक.

In reply to by सुबोध खरे

रेल्वेवर दगड मारणारा पोरासाठी किती मेन्बत्यावाले येतात ते आपण बघूच! === उगाच आपली अजेंडायुक्त मळमळ जिथे तिथे काढत बसायची.

In reply to by सुबोध खरे

)काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही? का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे.)) ==)) मनाला येईल ते काही ही फेकता तुम्ही. कोणी किंमत दिली सैनिकाना. जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले.

In reply to by सुबोध खरे

प्रतिसादाचा आशय बघता टंकन चूक आहे हे शेमड्या पोराला पण समजले असते. आपण तर हुशार आणि अभ्यासू आहात. === बाकी तुम्हाला शिक्के मरायची भारी हौस आहे. जणू आम्हाला सैन्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकीच नाही. === (संपादित)

In reply to by विशुमित

अवांतर: तुमच्या मुलाला प्रोत्साहीत करता की नाही आर्मीत जायला? याचं उत्तर मी मागेच मिपावर दिलं आहे. शोधून काढा हवं तर. जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले. किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

बाकी मुद्दे संपले कि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची सवय काही जात नाही. === लोग सब जाणते है! कोण काय कर्तय ते.

In reply to by सुबोध खरे

किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली. ==)) बघा मारला शिक्का! === संपादित

In reply to by विशुमित

] माझ्या मुलाने काय करावे हे सांगणारे/ विचारणारे तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात? एवढीच जळजळ होत असेल तर काढा शोधून. मिपावरच आहे ते

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच सोनिया गांधींनी मुलाचे काय करावे , याबाबत तुमची मते आम्ही ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

वा! काय असंबद्ध प्रतिसाद आहे? artificial intelligence is no match for natural stupidity

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भारतीय सैन्य ठिकानाची हेरगिरी करण्यात पूर्वी फक्त अल्पसंख्यक समाजाचे लोक सापडत होते परंतु गेले 10 / 15 वर्षात जेवणाच्या थाळीत भोक मारण्याची सवय हिंदू समाजात वाढल्या मुळे सैन्यविरोधात उलटसुलट प्रतिसाद देणाऱ्या मध्ये तीच वृत्ती आढळते , सैन्याकडून मोहिमा प्रतिकूल परिस्थितित राबवताना काही चुका होत असतील पण भाजप वरील राग सैन्यावर काढू नका .

In reply to by ट्रम्प

कोण राग काढतय सैन्या वर? उगाच असंबंध रेटून लिहायचे? धर्मांध लोकांनी भाजप प्रेमापायी दिसेल त्याला गप्प बसवण्याचे तन्त्र अवलंबले आहे. == तुमच्या घरात सैन्यामधे कोण कोण आहे ? माझ्या घरात आहे अणि पंचक्रोशीत नात्यातील 40एक फौज मधे आहेत. डॉक्टर साहेबां इतके Technical Knowledge नसेल कदचित पण मी सैन्य जीवन खुप जवळून अनुभवले आहे. संपादक मन्डळ अणि डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न का रुचला नाही हे याच्यत सर्व आले. === देश हा सिस्टम वर चालत असतो. त्यात चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. पण याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टींचा ट्रेंड सेट केला जावा.

In reply to by सुबोध खरे

सैन्याबद्दल माझी विचारसरणी काय आहे हे विचारणारे/ठरवणारे तुम्ही कोण दत्तोजी लागुन गेला आहात? === आमचे पोट एकदम व्यवस्थित आहे. काही जळजळ नाही.

In reply to by विशुमित

सैन्याबद्दल तुमचे उदात्त विचार सांगण्या साठी पंचक्रोशितिल नातेवाईकांची मदत घ्यावी लागते इथेच सर्व आले , शिवाय इतके जवळचे लोक सैन्यात असताना फारुख अब्दुल्ला , पी डी पी च्या लोकासारखे प्रश्न उपस्थित करता ? सैन्यात माझ्या घरातील कोणीही नाही आणि तरीपण एक सर्वसामान्य माणसा प्रमाणे सैन्याबद्दल मला अभिमान वाटतो . ब्लैक कैट नीं विषय काय मांडलाय ? त्यात आपण साथ द्यावी का ? ब्लैककैट च्या समर्थनार्थ सैन्याबद्दल प्रतिक्रिया देण्याअगोदर तुम्ही थोरल्या साहेबानां कसे विसरून गेलात ? एके काळी निधड्या छातीने सरंक्षण मंत्रिपद संभाळलय ना त्यांनी !!!

अहो माईसाहेब,
अमेरिकन कस्टम खाते ज्यात सरकारी हस्तक्षेप सहसा नसतो, त्यांनी असे सहजासहजी सोडून दिले? हे ही विश्वास ठेवायला कठिण वाटते.
तुमच्या ह्यांना जरा अभ्यास वाढवायला सांगा. राजीव गांधीने रोनाल्ड रेगनची बायको नॅन्सीला मध्ये घेऊन आदिल शहरयारला कसा सोडवला याची कथा सुरस व चमत्कारिक आहे. तूर्तास इथे अधिक माहिती वाचायला मिळेल : https://timesofindia.indiatimes.com/india/Sushmas-counterattack-Who-is-… आ.न., -गा.पै. जाताजाता : आदिल शहरयार हे महंमद युनुसचे दिवटे अपत्य व संजय गांधीचे सावत्र भावंड.

After Lok Sabha, Quota Bill passes Rajya Sabha test जाती-धर्माच्या वर उठून केवळ आर्थिक परिस्थितीवर आधारीत शिक्षण आणि नोकर्‍यांत १०% जागा राखीव ठेवण्याचे बिल राज्यसभेतही मंजूर झाले. आता केवळ राष्ट्रपतींची मंजूरी आणि नोटीफिकेशन या दोन औपचारिक पायर्‍या बाकी आहेत... त्या त्वरीत होतील यात संशय नाही. जाती-धर्माच्या वर उठून केलेल्या या कायद्याबद्दल सरकारचे आणि त्याला (स्वतःहून व नाईलाजाने) पाठिंबा देणार्‍या सर्व पक्षांचे अभिनंदन !!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अगोदरचे प्रयत्न यशस्वी झाले का ? तसेही तुमची पार्टी नरसिंह राव यांना आपले मानत नाही, हे त्यांचे पार्थिव काँग्रेसभवनात न येऊ देता फूटपाथवर अडवून तुमच्या लाडक्या नेत्यांनी सांगितले आहे. रावांची अनवधानाने स्तुती केलीत... आता तुमचे काही खरे नाही. =)) =)) =)) अवांतर : त्यांचे नाव (नारसिंहराब नव्हे) नरसिंह राव आहे हे विसरले, तरी सोईस्कर वाटले तेव्हा त्यांची आठवण आली... टिपिकल ! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या जमोप्याची जेथे मिळेल तेथे त्याची अशीच ठासली जावो !! ह्याला कोणीही कुठेही भाव देत नाही म्हणु न सर्व ठिकाणी पिंका टाकत असतो !! फ्रस्टेटेड माणुस आहे !!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राज्य सभेत हे विधेयक मंजुर होत असताना कपिल सिब्बल म्हणत होते की हीच वेळ का मिळाली वैगेरे. त्यावर अमर सिंग ह्याची प्रतिक्रीया खुपच बोलकी होती. अमर सिंग : हे सर्वात चांगले विधेयक मोदी सरकारने आणलेले आहे, ह्या विधेयकाच मी समर्थन करतो. राज्यसभेत बरेच लोक ह्या विधेयकाला नावे ठेवत होते. पण विरोध करायला कोणातही दम नाही !! रविशंकर : हे विधेयक आणायला हीच वेळ का मिळाली ? सिक्सर स्लॉग ओव्हर मध्येच मारतात. असे अनेक सिक्सर आता येणार आहेत,

‌आखिल भारतीय काँग्रेस महासमिति च्या महिला विभागाच्या चिटणीस म्हणून रागा नी नवीन इतिहास घडविला . अप्सरा रेड्डी या तामिलनाडु मधील तृतीयपंथी ची निवड ही लक्षणिय बाब आहे . गरजू , अडले नडलेल्याना रात्रदिवस न पाहता मदत करने ही राष्ट्रीय कुटुंबा ची खासियत वेळो वेळी दिसून आली आहे व अशा कित्तेक गरजू इच्छुक लोकांना रागाचे डैडी व काका ने राजकारणात आणले ( लोकसभेत ही !! ही !! करून हसणारी हिडिंबा ही त्यातलीच ) .त्या दोघानी राजकारणात प्रस्थापित केलेल्या अनेक लोकांच्या सुरस कथा बी बी सी वर उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे बी बी सी भाजप विरोधी बातम्या देण्यात एक्सपर्ट आहे . तीच परंपरा पुढे चालवत रागानी एका तृतीयपंथीला हात देवून संजय काका आणि डैडी च्या पुढे पावुल टाकले आहे . ‌ ‌या अप्सरे नी काही दिवस भाजपची वाट धरली होती परंतु कलागुणानां तेथे किंमत न मिळाल्या मुळे रागा ला त्यांनी हाक दिली व रागाने ही पटकन चिटणीस पदी नेमणुक करून औदार्य दाखवले .

In reply to by mrcoolguynice

कुणाल काम्राचा एक भारी कॉमेडी वीडियो आहे. नोट: भाषा आक्षेपार्ह आहे, याची कृपया नोंद घ्यावी. https://youtu.be/9NUXCAZs5VU

श्रीलंकेनंतर मलेशिआ पण पाकिस्तानी जेएफ- १७ पेक्षा भारतीय बनावटीच्या तेजसवर जास्त भरोसा ठेवायचा विचार करायला लागलीय. तिथे भरणाऱ्या २०१९ च्या संरक्षण विषयक प्रदर्शनात तेजस विमान ठेवण्यासाठी भारताला कळवण्यात आलय. खरतर तेजस विमान, पाक व चिनने संयुक्तरित्या बनविलेल्या विमानापेक्षा २५ कोटींनी महाग आहे तरीही मलेशिआची पसंती तेजसला असल्याचे दिसून येते आहे. खरतर तेजस अजूनही पूर्णपणे विकसीत झालेले नाहीये. तरीही या क्षेत्रातील तज्ञांच्या मते तेजस विमान जेएफ- १७ पेक्षा वजनाला हलके असून अद्ययावत डिजीटल नियंत्रण सुविधा, मायक्रोप्रोसेसरवर आधारीत उपकरणे यामुळे जास्त प्रभावी बनले आहे. विमानाच्या इंजिनाबद्दल तर सगळेच मान्य करतात की, तेजसला बसवलेले अमेरिकन बनावटीचे जीई४०४ इएन हे इंजिन नक्कीच पाकी विमानापेक्षा उत्कृष्ट आहे.

पंतप्रधान, सर्वोच्च न्यायाधिशांनी नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयातिल एक सद्य न्यायाधिश आणि विरोधी पक्षनेता, यांच्या सिलेक्शन पॅनेलने अलोक वर्मा यांना, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कामचुकारपणा (corruption and dereliction of duty) या कारणांनी सीबीआयच्या संचालकपदावरून बडतर्फ केले आहे. निवृत्तीच्या ३१ जानेवारी २०१९ पर्यंत, डायरेक्टर जनरल (फायर सर्विसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड्स) या पदावर त्यांची बदली केली आहे. काही दिवसांपूर्वी, त्यांना सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय तांत्रिक कारणांसाठी अवैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची त्या पदावर परत नेमणूक केली होती. तसे करताना न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय (policy decisions) घेण्यास प्रतिबंध केला होता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा निर्णय २ विरुद्ध १ अश्या बहुमताने घेण्यात आला आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात गमतीची (खरे तर दुर्दैवाची) गोष्ट अशी झाली आहे... लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेता या नात्याने पॅनेल सदस्य असलेल्या... श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मा यांच्या नियुक्त करण्याच्या वेळेस = विरोधी मत. आणि आता, श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मांना भ्रष्टाचाराच्या कारणाने काढून टाकण्याच्या वेळी = विरोधी मत. टीप्पणीची गरज नाही (No comments) !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपली कुठलीच भूमिका ठामपणे धरून ठेवता येत नाही अशी काँग्रेसींची स्थिती झाली आहे. म्हणून तर वैयक्तिक आणि अशिष्ट हल्ले चालू आहेत. मोदी स्त्रीच्या मागे लपतात हे म्हणणे काय किंवा पर्रीकरांच्या घरात राफेलची फाईल लपवून ठेवली आहे म्हणणे काय किंवा निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून ही महत्वाची बिले/ योजना सादर करण्यात येतात हा आरोप काय. सगळाच मूर्खपणा आहे. काय तर म्हणे अलोक वर्मा राफेलमधील तथाकथित घोटाळ्यांची चौकशी करणार होते म्हणून त्यांना त्रास देतात. या लोकांना हे पण माहित नाही की ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. एवढ्या कमी वेळात कसली चौकशी करणार होते?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असे यु टर्न तर मोदीजींनी भरपूर घेतले आहेत, आणि एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

म्हणून तर तुम्ही मोदींचा द्वेष करता ना? मग ते जसा यु टर्न घेतात तसाच यु टर्न तुमचे लाडके घेतात तेव्हा त्यांचा का द्वेष करत नाही? एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ? नाहीये ना? पण निदान हे मत का बदलले ते तरी सांगावे. तसेच आधी विरोध का होता हे पण सांगावे.