मिपा संपादकीय - काशीस जावे नित्य वदावे...
In reply to संपादकीय by सखाराम_गटणे™
यासाठी त्यांनी .....हेराफेरी केली. ताळेबंदात चुकीचे आकडे दाखवले.मॅडॉफ आणी स्टॅन्फर्ड सोडून ह्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल काय? ह्या दोघांचे जे काय झाले ते अगदी अलिकडे झालेले आहे व एकंदरीत त्यांच्या उलाढालीची रक्कम, जी कोसळाकोसळी चाललेली आहे, त्याच्या एक अगदी छोटा हिस्सा बनेल. म्हणून त्यांना सोडून देऊ.
In reply to उदाहरणे by प्रदीप
In reply to अनेक by अवलिया
In reply to बेकायदेशीर? by प्रदीप
- वर्षाला ४० हजार कमावणार्या कुटुंबाला ४०० हजाराचे घर विकत घेण्यासाठी कर्ज देणे...
- कर्जाची क्रिएटिव्ह (खरे तर क्रिमिनल) मांडणी करून पहिली दोन वर्षे अगदी कमी दरात आणि थोड्या रकमेवर व्याज भरण्यास परवानगी देणे.
- हे असे कर्ज १००००१% बुडित खात्यात जाणार आहे हे माहित असूनही कंपनीमध्ये सगळ्यांनी कॅश फ्लो चांगला आहे आणि बिझिनेस मॉडेल जिनिअस प्रॉडक्ट आहे असे म्हणणे....
- रेग्युलेटर्सनी माना डोलविणे आणि
- रेटिंग एजन्सीजनी "अअअ" असे शिफारस देणे...
- या कॅश फ्लोवर आधारित हुंड्या (सिक्युरिटीज) जगभरातील इन्व्हेस्टरांना विकून मूळ कर्जदात्यांनी आपले हात रिकामे करून घेणे. वगैरे वगैरे!
- त्यात पुन्हा एकदा सिक्युरायटाझेशन केले की ही कर्जे ऑफ बॅलन्सशीट ... त्यातून अर्निंग्ज्स पर शेअरच्या आकड्यांची भलतीच सुधारणा...
In reply to हेराफेरी by एकलव्य
हे गणित चुकीच्या मार्गाला घेऊन जाणार आहे हे स्पष्ट होते. ते चुकीचे आहे हे समजण्याची अक्कल वॉलस्ट्रीटच्या टोप ब्रेन्समध्ये नव्हती हे पटण्यासारखे नाही. हव्यास आणि भ्रष्टाचार (पॉवर करप्टस् ऍन्ड अबसोल्युट पॉवर करप्टस् अबसोल्युटली) यांच्या प्रभावाखाली भल्याभल्यांनी सोयीस्करपणे दुनियेला टोपी घालायला मागेपुढे पाहिले नाही असे म्हणायला भरपूर वाव आहे.हव्यासाबद्दल काहीही आर्ग्युमेंट नाही, नव्हतेच. सुपीक डोक्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा 'वापर' करून हे इमले रचले, त्यात तेव्हा त्यांच्या कंपन्यांना फायदा मिळत गेला, व त्यांना स्वतःला भरपूर कमिशन्स व बोनसेस. हे इमॉरल होते की नाही हा प्रश्न वेगळा. पण ह्याला भ्रष्टाचार मात्र म्हणणे पटत नाही.
In reply to हे सगळे मान्य by प्रदीप
In reply to फक्त नियमात बसते आहे म्हणून by चतुरंग
बर्नानकेपासून सगळे अजूनही बँकांचे नॅशनलाझेशन झाले आहे असे म्हणता येणार नाही असे म्हणत आहेत... बट डू यू बीलिव्ह दॅट? रशियाने जे वास्तव्य स्वीकारायला शेवटच्या श्वासापर्यंत नकार दिला त्याचा अमेरिकन अवतार सध्या जन्माला आलेला आहे. ही अतिशयोक्ति वाटेल पण वास्तवापासून फार दूरही नाही.१००% सहमत.
माणसाची नीतिमत्ता हव्यासाने गिळंकृत होते तेव्हा तो भ्रष्टाचारच असतोह्याच संदर्भात झालेल्या एका चर्चेत मी असे विधान केले होते :"आंधळी व अनिर्बंध हाव". तेव्हा धनंजयांचे त्यावरील उत्तर मार्मिक होते, ते इथे तसेच्या तसे टाकत आहे:"या वाक्याचा अर्थ लागला नाही. आपला फायदा बघून घ्यावा, असा विचार तर सर्वच करतात. त्याची कितपत राशी निर्बंधांच्या पलीकडे आहे हे कसे ठरवणार? सतारीची तार तटकन तुटल्यानंतर कोणीही सांगेल की खुंटा खूपच - अनिर्बंध - पिळला. (हाइंडसाईट २०-२०). दोष देताना हे सांगावे लागते की वादकाला आधीच माहिती असायला हवे होते की "अमुक अमुकपेक्षा तारस्वरात श्रुती लावता येत नाही". नेमका किती फायदा घेतल्यावर दलालांनी "धालो" म्हणायला हवे होते असे आपल्याला वाटते? डोळस हाव म्हणजे कशी असायला हवी होती? या हुंड्यांची (म्हणजे मॉर्ट्गेज बॅक्ड सेक्युरिटी, केडिट डिफॉल्ट स्वॉप, वगैरेंची) किंमत कशी निश्चित करायची याबद्दल डोळस विचार करण्यासाठी सुयोग्य विदा कुठे उपलब्ध होता?" नीतिमत्तेचे काय आहे, कोण कुणाला सांगणार? * पायरेटेड सॉफ्टवेयर वापरणे * पायरेटेड म्युझिक/ चित्रपट ऐकणे/पहाणे * (भारतात) केबलवाला टी. व्ही.कं. ना गंडवतो आहे हे माहिती असूनही त्याचे सब्स्क्रिप्शन घेणे व त्या टी.व्ही. चॅनेल्सचे कार्यक्रम 'सब्सिडाईझ्ड' दरात बघणे * इत्यादी, इत्यादी..... तुमच्याआमच्यासारखा सर्वसामान्य माणूस कायकाय गोष्टी आयुष्यात सहजपणे करत असतो, त्याची ही काही उदाहरणे. जो कुणी स्वतःच्या छातीवर हात ठेऊन सांगेल की आपण नेहमी नैतिकदॄष्ट्या चोख वागत आलो आहोत, त्याला नीतिमत्तेबद्दल बोलावयाचा अधिकार आहे. मीतरी हे करू धजत नाही.
In reply to हे सगळे मान्य by प्रदीप
In reply to उत्तम संपादकीय... by मनिष
In reply to हे वाचा.. by दशानन
In reply to ह्याला फक्त by मनिष
In reply to अधिक परिपूर्ण हवा होता.. by सुनील
प्रगत आणि सुस्थितीतील अर्थव्यवस्थेत, जीडीपीतील सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्रातून येतो. त्या खालोखाल औधोगिक क्षेत्र आणि सर्वात शेवटी कृषी क्षेत्रातून येतो.आता लगेच अगदी कुठचा विदा तपासून बघत नाही, तरीही जपान, जर्मनी व चीन येथील जीडीपी हे प्राम्युख्याने औद्योगिक क्षेत्रांवर अवलंबून आहेत असे म्हणणे चुकिचे ठरू नये. आणी हे देश प्रगत व त्यांच्या अर्थव्यवस्था सुस्थितील* समजण्यासही कुणाची फार हरकत नसावी? [* आताच्या आर्थिक पडझडी (फानॅन्शिअल त्सुनामी)च्या अगोदर तरी. नंतर अनेक चित्रे बदलतील, तरी हे विधान ह्या तिन्ही अर्थव्यवस्थांना तसेच लागू रहावे].
In reply to खरेच? by प्रदीप
In reply to खरेच? by प्रदीप
In reply to विदा by सुनील
In reply to विदा by सुनील
In reply to उत्तम लेख by आनंदयात्री
In reply to सहमत, तरीही शंका!! by पिवळा डांबिस
In reply to सहमत, तरीही शंका!! by पिवळा डांबिस
In reply to सत्यम, by मराठी_माणूस
In reply to >>म्हणूनच by दशानन
In reply to अमेरिकेची by अवलिया
In reply to राजेंच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अमेरिकेची by अवलिया
In reply to अवलिया, तुम by दशानन
In reply to सत्यम, by मराठी_माणूस
In reply to :) by पिवळा डांबिस
In reply to ईतर धंद्या by मराठी_माणूस
In reply to ईतर धंद्या by मराठी_माणूस
In reply to :) by पिवळा डांबिस
In reply to अवलिया साहेब by विनायक प्रभू
In reply to सुरेख by विसोबा खेचर
In reply to सहमत by अवलिया
In reply to सहमत by अवलिया
In reply to जागा रहा by विनायक प्रभू
- अमेरिकन अर्थव्यवस्था ढासळण्याचे कारण हे जास्त करून नियंत्रणे नसणे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा त्या अर्थी अतिरेक करणे हे आहे. त्यात अमेरिकन "हर्षद" आणि "केतन" निघालेत पण अशा एखाद्या व्यक्तींमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था भारतातील पण वेठीस धरता येणार नाही. एखादा पोचा पडू शकतो - तो देखील तात्पुरता.
- नियंत्रणे नसल्याने अर्थातच बर्याच खाजगी निर्णयांवर नियम पाळायचे बंधन नव्हते. त्यामुळे अतिगोपनियतेत मोठमोठ्या बँका एकमेकींशी व्यवहार करत होत्या. पण ते सगळे हवेतलेच इमले होते (प्रेडीक्शन्स वर आधारीत, पण प्रेडीक्षन्स ना आधार नाही असे काहीसे). हे विशेष करून चालू झाले ते आधी गृहकर्जामधे नंतर अर्थातच विमा कंपन्या, एआयजी सारख्या त्यात गोवल्या. आता हे बरोबर का चूक हा प्रश्न खेळानंतर नियम सांगून फाउल ठरवण्यातला होतो. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही.
- असे असले तरी गृहकर्जासंदर्भात बरीच लफडी झाली - मुख्य म्हणजे त्यात विकत घेणार्याची आर्थिक पत बघण्याकडे झालेले सोयीस्कर दुर्लक्ष.
- दुसरा भाग म्हणजे एकमेकांची कर्जे विकत घेत असताना बँकांनी वर म्हणलेल्या प्रेडिक्शन्सवर काही ठरवून कुठल्याही भावात घेतले आणि आता सामान्य घरमालकाप्रमाणे पैशाचे प्रश्न उभे राहीले. ह्यावर एकदा एनपीआर ह्या रेडिओवर छान कार्यक्रम झाला होता. दुवा मिळाल्यास कळवेन.
- आता सर्व्हीस सेक्टर - सेवाक्षेत्राचा प्रश्नः प्रगत राष्ट्रांमधे सेवाक्षेत्र हे प्रधान क्षेत्र होते हे वास्तव आहे. मात्र अमेरिकेचे प्रश्न हे त्याच्यामुळे तयार होण्या ऐवजी कर्ज घेण्याच्या अतिरेकी वृत्तीमुळे तयार झाले आहेत. मधे प्रसिद्ध झालेले एक या अर्थी वाक्य होते, "आपण(अमेरिकन्स) चायनाकडून गोष्टी विकत घेतो, त्यावर चायना पैसे मिळवते ते पैसे ते आपल्या आर्थिक संस्थांत गुंतवते (परदेशी गंगाजळी) त्या आर्थिकसंस्था त्या पैशातून आपल्याला कर्ज देतात, त्यातून आपण घरे घेतो, मग त्या घरात परत क्रेडिट कार्डचा वापर करून (परत कर्जच) "मेड इन चायना" गोष्टी आणतो, त्यातून चायनाला पैसे मिळतात..." हे नष्टचक्र चालूच राहते.
- आता ओबामा म्हणतो की आम्ही बाहेर जाणार्या नोकर्यांवर अर्थात आउट सोअर्सिंगवर बंधने आणू. कदाचीत ते थोडेफार शक्य होईलही. कारण आउटसोअर्सिंग हे बुश (रिपब्लीकन) राज्यात वाढले. पण तरी त्यात अमेरिकन दादागिरी चालू शकेल असे वाटत नाही. कारण आउटसोअर्सिंग बंद करणार पण तुमचे उद्योग मात्र मुक्तअर्थव्यवस्थेचे म्हणजे तुमच्या देशाला प्रोटेक्टीव्ह असून चालणार नाहीत असे म्हणणे हे चालू शकणार नाही. "इट द केक अँड हॅव इटचा अमेरिकन माजरटपणा आता चालू शकेल असे वाटत नाही". पण त्यासाठी आपण (भारत) काय करतोय हे विचारले तर काय दिसते?
- भारतात होणारे आउट्सोअर्सिंग कमी/बंद झाले तर त्याला कारण ओबामा, अमेरिकन्स अथवा इथली अर्थव्यवस्था नसणार आहे तर आपली धंदा करण्याची पद्धत, इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षितता, राजकीय आणि खाजगी भ्रष्ट्राचार ही कारणे असणार आहेत आणि त्या सर्वाचा एक परीणाम म्हणजे होणारी फसवणूक जी चांगल्या काळात चालू शकते पण वाईट काळात जेंव्हा कंपन्यापण दात कोरून जगतात तेंव्हा चालत नाही... असे ऐकले आहे की सत्यम मधले अनेक अमेरिकेत नुसते बेंचवर बसून आहेत - अर्थात काहीच काम नाही पण पैसे मिळत आहेत. तीच अवस्था इतर कंपन्यांची असणार...
- दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडील आयटी सेवा कंपन्या ह्या केवळ एक्स्पोर्ट कडेच डोळे लावून बसतात आणि स्वतःच्या १ बिलीयन्सच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करतात. जे बाहेरील धंदे पण करत नाहीत!
- या संदर्भात अजून एक समस्या म्हणजे अमेरिकन सेवा संस्थांचे स्वतःचे प्रॉडक्टस असतात, पेटंट्स असतात आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्था पैसा निर्माण करतात. आपल्याकडील सेवा कंपन्या ह्या म्हणजे फक्त "बिग एम्लॉयी ऑफ बिगर एम्प्लॉयर" सारख्या वागतात. स्वत:चे प्रॉडक्टस नाहीत की स्वतःच्या देशासाठी सर्व्हीसेस नाहीत. पूर्ण दलाली वृत्ती...
- मोठमोठ्या अमेरिकन कंपन्यांनी अप्रत्यक्ष आउटसोअर्सिंग चालू केले आहे - म्हणजे त्यांची ऑफिसेस भारतात आहेत त्यामुळे त्यात ते काहीच बेकायदेशीर करणार नाहीत आत्ताच्या आणि भविष्यातील नियमांप्रमाणे...
- सरते शेवटी शेतकर्यांचा मुद्दा - आपला देश शेतीप्रधान राहीला म्हणून काही बिघडत नाही. त्याने मुळात बिघडलेले नाहीच आहे. इतक्या लोकांना सर्वप्रकारची कामे आणि अन्न देण्याची व्यवस्था करावी लागणारच आहे. मात्र त्यासाठी बरेच काही बदलावे लागेल - शेतकर्यांसकट ते सरकार, उद्योग आणि तुम्ही-आम्ही जनसामान्यांपर्यंत...हा वेगळा विषय आहे आणि त्यावर परत कधीतरी अधिक लिहीन...
संपादकीय