मिपा संपादकीय - ही एक इष्टापत्ती ठरो.
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
हे संपादकीय लिहिणारे क्लिंटन (नामे:विल्यम जेफरसन क्लिंटन) यांना त्यांच्या एका नातेवाईकाच्या अकस्मात निधनामुळे आज दुपारी तातडीने बाहेरगावी जावे लागले. येत्या दोनेक दिवसात ते पुण्यात परतल्यावर वाचकांच्या काही शंका/अभिप्रायांना अवश्य उत्तरे देतील असे कळवण्याची त्यांनी मिपा व्यवस्थापनाला विनंती केली आहे.
ही एक इष्टापत्ती ठरो
मुंबईवर अतिरेक्यांचा अभूतपूर्व हल्ला झाला आणि त्यात आतापर्यंत सुमारे १८३ निरपराध लोकांची कत्तल झाली. तो आकडा २००-२५० पर्यंत जाऊ शकतो. देशात संतापाची लाट उसळली. वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर आता 'इनफ इज इनफ' यास्वरूपाच्या चर्चा झाल्या. नेहमीप्रमाणे 'भ्याड' हल्ल्याचा निषेध राष्ट्रपती- पंतप्रधानांपासून मिसळपाववरील सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी केला.परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधानांनी हल्ल्यामागे पाकिस्तानातील अतिरेक्यांचा हात आहे असे म्हटले. शेजारी राष्ट्राला 'गंभीर परिणाम होतील' अशी फुकाची धमकी देऊन झाली. २९ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत ताजमधील कारवाई संपुष्टात आल्यावर ३० तारखेपर्यंत मुंबई पूर्वपदावर येईल. लोकांच्या मनात प्रचंड भिती आहेच तरीही मुंबईकरांच्या धैर्याचे तोंडदेखले कौतुक होईल. दहशतवादाला धर्म नसतो अशास्वरूपाची पोपटपंची होईल.
यापुढील काळात काय करायला पाहिजे यावर अनेक ठिकाणी काथ्याकूट होईल. एखाद्या कडक कायद्याची अंमलबजावणी व्हावी, दहशतवादाविरोधात एका केंद्रिय यंत्रणेची स्थापना व्हावी यासारखे अनेक उपाय सुचवले जातील. पण महिन्याभरात पहिले पाढे पंचावन्न म्हणत आपण भारतीय एकमेकांशी भांडण्यात मश्गुल होऊन जाऊ. मी ब्राम्हण की मराठा की मागासवर्गीय, मी मराठी की बिहारी, मराठ्यांमध्ये मी ९६ कुळी की ९२ कुळी, ब्राम्हणांमध्ये मी कोकणस्थ की देशस्थ इत्यादी अनंत वादविवादांमध्ये आपण इतके गुरफटून जाऊ की अतिरेकी परत येऊन कधी हल्ला करून निघून जातील हे आपल्याला कळणार पण नाही. आपण स्वत: किंवा आपले आप्तस्वकिय अशा कोणत्याही हल्ल्यात सापडणार नाहीत अशी प्रार्थना करण्याशिवाय सामान्य जनतेच्या हातात फारसं काही उरणार नाही.
एक प्रश्न पडतो की दरवेळी असा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कमीअधिक फरकाने हाच क्रम चालू असतो. आठवा ११ जुलै २००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोटांनंतर किंवा दिल्लीतील २००५ आणि २००८ च्या स्फोटांनंतर, अहमदाबादमधील जुलै महिन्यातील स्फोटांनंतर,२००१ च्या संसदभवनावरील हल्ल्यानंतर आणि अशा अनेक हल्ल्यांनंतर वेगळे काय चालू होते?
राजा शिवछत्रपती पुस्तकात बाबासाहेब पुरंदर्यांनी त्यांच्या शैलीत एक वाक्य लिहिले आहे. शिवाजी भोसल्याने पन्हाळगड जिंकला ही बातमी कळताच विजापूर दरबार संतापला. दरवेळी शिवाजीने काहीना काही जिंकायचं आणि विजापूर दरबाराने संतापायचं हा शिरस्ता गेली २५ वर्षे अबाधितपणे चालू होता! आणि त्याच धर्तीवर दुर्दैवाने अतिरेक्यांनी प्रत्येक वेळी हल्ला करायचा आणि भारतीय जनतेने संतापायचे, पंतप्रधान-राष्ट्रपतींनी नेहमीची छापील वाक्य बोलायची, अशा भ्याड हल्ल्यांचा कडक शब्दात निषेध करायचा, मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहायची आणि पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे हा शिरस्ता गेली अनेक वर्षे अबाधितपणे चालू आहे. त्यात काहीही बदल नाही.
अत्यंत मवाळपणा (किंवा बावळटपणा), अनाठायी मानवता (सावरकरांच्या शब्दात सद्गुणविकृती), इतिहासापासून काहीही न शिकणे आणि घरभेदीपणा या दुर्गुणांचा आपल्या समाजाला शापच लागला आहे.
या दुर्गुणांमुळे आपले कमालीचे नुकसान झाले आहे. भारतभूमीवर एकामागून एक आक्रमणे होत राहिली, रणांगणावर विजय मिळवूनही अशा काही दुर्गुणांमुळे परकिय आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करणे आपल्याला शक्य झालेले नाही. एकेकाळी आपली संस्कृती सद्यकालीन अफगाणिस्तानापर्यंत होती आणि या दुर्गुणांमुळे त्या प्रदेशाचा संकोच होत होत १००-१५० वर्षांनी सद्यकालीन भारतावर सुध्दा हिरवा रंग चढणार की काय अशी भिती वाटू लागली आहे.
'इतिहासापासून न शिकणे' या एका दुर्गुणाने भारताचे जेवढे नुकसान केले आहे याची मोजदादच नाही. भारतीय सैन्य प्राचीनकाळी हत्तींच्या फौजा घेऊन लढत असे. अनेकदा राजा स्वत: किंवा सरसेनापतींसारखे मोठे अधिकारी हत्तीवर बसून स्वत: लढाईत भाग घेत असत. असे हत्ती पिसाळले तर ते आपल्याच सैन्याला पायदळी तुडवत मोठी अंदाधुंदीची परिस्थिती निर्माण होत असे आणि अत्यंत शौर्याने लढणार्या हिंदू सैन्याचा पराभव होत असे. परकिय आक्रमकांनी हे हेरून मुद्दामून हत्तींच्या गंडस्थळावर मादक द्रव्यांनी भरलेले बाण अनेकदा मारले आणि हिंदू सैन्याचा ज्या लढायांमध्ये पराभव झाला त्यापैकी बहुतांश लढायांमध्ये 'हत्ती' हा मुद्दा महत्वाचा होता. अगदी सिंधच्या दाहिर राजापासून (इ.स. ७१२) राणा संगापर्यंत (इ.स. सुमारे १५२८) अनेकांचे पराभव या कारणांमुळे झाले आहेत. अगदी जयपाळ-अनंगपाळ किंवा पृथ्वीराज चौहान यांचे पराभव होण्यात हा एक महत्वाचा मुद्दा होता. ज्या राजांचा या कारणामुळे पराभव झाला त्या राजांच्या नावांच्या यादीत काही त्रुटी किंवा चुका असण्याचा संभव आहे कारण याविषयीचे वाचन करून बरीच वर्षे झाली आहेत. पण सांगायचा मुद्दा म्हणजे ७००-८०० वर्षे आपला पराभव एकाच कारणामुळे होत होता. कोणीही या समस्येवर उपाय शोधून काढायचा आणि आपली रणनिती बदलायचा प्रयत्न केला नाही. कोणीच इतिहासापासून शिकले नाही.
घरभेदीपणा तर अगदी अंभीराजापासून भारताच्या कुंडलीतला कालसर्प योगच जणू.तरी अलेक्झांडर खूपच सुसंस्कृत आक्रमक होता. त्याने सामान्य लोकांच्या कत्तली केल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे अंभीराजाचा घरभेदीपणा भारताला तेवढ्या प्रमाणावर नडला नाही.पण जयचंदाने मोहम्मद घौरीला पृथ्वीराज चौहानविरूध्द मदत केली. त्यानंतर दिल्लीवर सुलतानी अंमलाचा काळाकुट्ट अध्याय सुरू झाला.त्या सुलतानांच्या सैन्यात कर्तबगारी दाखवायचा एक मार्ग म्हणजे निरपराधांच्या कत्तली करणे. एस.आर. बक्षींची 'मेडिव्हिएल इंडियन हिस्ट्री' वरील ३ भागांमध्ये ही माहिती आहे. अगदी अल्लाद्दिन खिलजीपासून अनेकांनी अशा कत्तली करून आपली 'कर्तबगारी' सिध्द केलेली आहे.जयचंदाच्या घरभेदीपणामुळे अनेक शतके भारतात सुलतानी अंमल चालला. या अंमलाला राणा प्रताप सारख्यांनी अयशस्वी तर शिवाजी महाराजांनी यशस्वी प्रत्युत्तर दिले.तरीही महाराष्ट्राच्या लाडक्या संभाजीराजांना पकडून देण्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली? संभाजीराजांच्या पत्नीच्या सख्ख्या भावाने म्हणजेच त्यांच्या सख्ख्या मेहुण्याने-- गणोजी शिर्केने. संभाजीराजांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली आणि त्यावेळी पुढाकार घेणारा कोण होता?त्यांच्या सख्ख्या बहिणीचा नवरा-- महादजी निंबाळकर! दुर्दैवाने असे अनेक किस्से आपल्या इतिहासात आहेत. गणोजी शिर्के इतिहासापासून शिकला नाही आणि शिवछत्रपतींचे स्वप्न-- हिंदवी स्वराज्य मोठ्या संकटात सापडले. पुढे शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावणारा कोण होता? बाळासाहेब नातू! तो तरी शिकला का इतिहासापासून? नाही ना. आणि नेमके हेच आपले दुर्दैव आहे.
अती मवाळपणा (किंवा बावळटपणा) आणि गाफीलपणा हे आपल्याला लागलेले काही अजून मोठा शाप आहेत.
अतिरेकी संसदभवनापर्यंत पोहोचू शकले आणि केवळ सुदैवाने फार मोठ्या संकटात आपण पडता पडता वाचलो तरीही पुढे काहीही होत नाही. महंमद अफझल अजूनही जिवंतच आहे. कारगीलमध्ये अतिरेकी श्रीनगर-लेह मार्गावर तोफांचा मारा करेपर्यंत आत पोहोचले तेव्हा कुठे आपल्याला खडबडून जाग आली. आणि ती जाग आली ती सुध्दा काही मेंढपाळांनी सुरक्षादलाला सुचना दिल्यावर! कंदाहार विमान अपहरण प्रकरणी सोडलेला मोहम्मद अफझल १९९४ पासून भारत सरकारच्या बिर्याणीवर यथेच्छ ताव मारत होता.इतकेच नव्हे तर तिहार तुरूंगामध्ये त्याच्याकडे मोबाईल फोन होता आणि त्याला सोडविण्यासाठी अतिरेक्यांचे जे काही प्रयत्न चालू होते त्याची बित्तंबातमी त्याला होती. पुरुलियाप्रकरणी विमान २ दिवस भारतभर पाहिजे तिकडे उडत होते आणि त्या विमानाला जबरदस्तीने मुंबई विमानतळावर उतरवल्यानंतर किम पीटर डेव्ही पोलिसांना चकवा देऊन पळून जाऊ शकला. ही सगळी बावळटपणाची उदाहरणे नाहीत तर काय आहे? बरं हा बावळटपणा गेल्या १२-१५ वर्षांत आला आहे का? तर तसे अजिबात नाही. कलकत्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून सुरू झालेला मुस्लीम लीगच्या गुंडांचा हैदोस त्यानंतर वर्ष-सव्वा वर्ष सुरू होता.ज्या पवित्र सिंधू नदीच्या काठावर वेदांची रचना झाली तिथे जिहादची कारस्थाने शिजू लागली.लाखो लोकांना निर्वासित व्हावे लागले, काही अंदाजांप्रमाणे सुमारे ५ लाख लोकांना प्राण गमावावे लागले, हजारो लोकांचे सक्तीचे धर्मांतर झाले. पंजाब-बिहार मध्ये हिंदू-शीखांनी स्वसंरक्षणार्थ लढा दिला तो अपवाद वगळता आपण काय करत होतो? आपण मारणार्यांसाठी आणि मरणार्यांसाठी प्रार्थना आणि उपवास करत होतो! ३० कोटींच्या भारतावर सुमारे लाखभर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले! अभिनव भारत, गदर पार्टी, अनुशीलन समिती यासारख्या संघटनांचे काही शे (किंवा काही हजार) क्रांतीकारक किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे योगदान होते. पण असे महान क्रांतिकारक बहुदा स्वातंत्र्यचळवळीत ०.१% असतील. ते सोडून आपला स्वातंत्र्यलढा काय होता? या सर्व महान क्रांतीकारकांचे योगदान सोडले तर अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला (उदाहरणार्थ लाहोर काँग्रेसमध्ये १९२९ साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला आणि जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावला) यापध्दतीचे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील मोठे महत्वाचे टप्पे होते! भारतीयांनी वाट्टेल ते ठराव पास केले तरी इंग्रजांच्या केसाला तरी धक्का लागणार होता का? क्रूरकर्म्या हिटलरने दुसरे महायुध्द सुरू करून इंग्रजांचे पेकाट मोडले नसते तर आज तरी आपण स्वतंत्र असतो का?कदाचित आजही आपण वेगवेगळे ठरावच पास करत राहिलो असतो आणि एखादा लॉर्ड टोनी ब्लेअर भारताचा व्हॉईसरॉय असता. मूठभर इंग्रजांपासून सुटका करून घेण्यासाठी १५० वर्षांनंतरही दुसर्या कोणीतरी आपल्या शत्रूच्या पेकाटात लाथ मारायची आपल्याला वाट बघावी लागते आणि तरीही आपण 'दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल' असे म्हणत 'आम्ही इंग्रजांना आमच्या देशातून हाकलून दिले' असे म्हणतो!
शत्रूला विनाकारण दया दाखवणे हा तर आपल्या समाजाचा स्थायीभावच झाला आहे. खरं म्हणजे शत्रूला कायम लक्षात राहिल असा धडा शिकवणे गरजेचे असते.पण अशी 'किलर इन्स्टिंक्ट' आपण दाखवत नाही. मेनाखेम बेगीन हे इस्त्राएलचे १९७७ ते १९८३ या काळातील पंतप्रधान होते. त्यांनीच इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सदात यांच्याबरोबर ऐतिहासिक कँप डेव्हिड शांतता करारावर सह्या केल्या.याचे कारण इजिप्त यापुढे इस्त्राएलला धोका उत्पन्न करणार नाही याची त्यांना खात्री पटली. १९६७ च्या युध्दात इस्त्राएलने इजिप्तकडून जिंकून घेतलेले सिनाई वाळवंटसुध्दा त्यांनी इजिप्तला परत केले.याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक पण मिळाले. पण नंतरच्या काळात अबु निदाल या अतिरेकी संघटनेने इस्त्राएलच्या इंग्लंडमधील राजदूताची हत्या केली. त्याविरूध्द त्यांनी निषेधाचे खलिते पाठवले नाहीत तर लेबेनॉनवर जबरदस्त आक्रमण केले. इराकने अणुकार्यक्रम सुरू करताच याच मेनाखेम बेगीनने निर्णय घेतला आणि इस्त्राएलच्या हवाईदलाने मधील दोन देशांच्या सीमा ओलांडून १९८३ मध्ये इराकच्या अणुभट्ट्या उडवून दिल्या. त्यांचा शत्रूला इशारा होता की तुम्ही आमच्याबरोबर शांततेत राहायला तयार असाल तर आम्ही तुमचा मित्रत्वाचा प्रस्ताव मान्य करू. पण तुम्ही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमचे डोळे आम्ही फोडू! असा शत्रूला कायमचा लक्षात राहिल असा धडा कधी आपण शिकवला आहे का?
किलर इन्स्टिंक्ट असणे आणि शत्रूचे कायमचे पारिपत्य करणे तर सोडाच पण आपण पहिले आक्रमण करणे हे महान पातक असल्याप्रमाणे आपली वर्तणूक असते. आमच्या छ्त्रपतींनी अफजल खानाचे पोट फाडून त्याला ठार मारले तरीही अनेकांचे म्हणणे असते की महाराजांनी पहिला वार केला नाही तर अफझल खानाने पहिला वार केला त्याला महाराजांनी प्रत्युत्तर केले. अफझल खान महाराजांचा शत्रू म्हणून आला होता ना?मग त्याचे पारिपत्य करण्यासाठी जे जे काही करणे गरजेचे होते ते आमच्या महाराजांनी केले.पहिला वार कोणी केला हे नक्की पुराव्यानिशी सांगणे कठिण आहे पण जर पहिला वार महाराजांनी केला तर त्यात चूक काय?शेवटी तो शत्रूच होता ना? आणि मा.अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे अफझल खान हा महाराजांशी पत्ते खेळायला थोडीच आला होता मग त्याला अगदी पहिला वार करून ठार मारले तर त्यात काहीही चूक नाही. ही असली पराभूत मनोवृत्ती आपण का बाळगतो?
आपल्याच समाजातील पंचमस्तंभीय अनेकदा इतका बुध्दीभेद करतात की कधी कधी वाटते की अशा मंडळी नक्की कोणाच्या बाजूने आहेत?कुमार केतकर, प्रफुल बिडवाई, मणिशंकर अय्यर यासारख्या अनेकांचे असे म्हणणे असते की भारतात दहशतवाद बाबरी मशिद पाडल्यामुळे वाढला. पण सत्य परिस्थिती आहे की भारतातला दहशतवाद इ.स. ७१२ पासून सुरू आहे. मोहम्मद बीन कासीमने भारतावर पहिले यशस्वी आक्रमण केले. त्यापूर्वी सुध्दा आक्रमणे होत होती पण त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. मोहम्मद बीन कासीमने पहिल्यांदा मुस्लिम दहशतवाद काय असतो याची चुणुक आपल्याला दाखवली. दाहिर राजा लढाईत मारला गेला हे कळताच सिंधच्या राणीने जोहार केला पण दुर्दैवाने राजकन्या (नक्की नाव आता आठवत नाही) कासीमच्या हातात पडली. आमच्या महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जशी वागणूक दिली तशी कासीमने वागणूक कासीमने तिला दिली असे कोणता हरिचा लाल म्हणू शकेल? अफगाणिस्तानात बौध्द संस्कृती होती.पण मुस्लिम आक्रमकांनी जवळपास सर्व लोकांना एकतर ठार मारले किंवा सक्तीचे धर्मांतर तरी केले.हिंदूकुश पर्वताचे नाव कसे पडले याला अत्यंत रक्तरंजित इतिहास आहे.तो दहशतवाद नव्हता तर काय होते?औरंगजेबाने संभाजीराजांना ज्या पध्दतीने ठार मारले ती काय मानवता होती? केरळातील मोपल्यांचे बंड, कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिन आणि त्यानंतर फाळणीच्या वेळच्या कत्तली वगैरे दहशतवाद नव्हता तर काय होते?त्यावेळी कोणती बाबरी पाडली होती? आणि बाबरी पाडली ती सुध्दा मुस्लिम समाजाच्या आडमुठेपणामुळेच. एकदा प्रवीणभाई तोगाडियांनी विचारले की १९४७ साली इस्लामच्या नावावर आम्ही त्यांना आमच्या देशाची ३०% जमिन दिली. पण ते एक रामजन्मभूमी सोडायला तयार का नाहीत? भारतात मंदिरे पाडून मशिदी अनेक ठिकाणी बांधल्या आहेत. त्यापैकी सगळी ठिकाणे परत मागणे गरजेचे नाही पण जी हिंदूंना परमपवित्र अशी तीन ठिकाणे आहेत ती परत मागितली तर त्यात चूक ती काय?तरीही हिंदू ऐकून घेतात म्हणून सगळ्यांची लेक्चरबाजी हिंदूंनाच चाले की हिंदूंनी राम तिथे जन्मला याचा पुरावा आणावा. पण हीच मंडळी मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांना असे प्रश्न विचारायला जात नाहीत! या अशा आडमुठेपणामुळे आणि दुटप्पीपणामुळे संतापलेल्या हिंदूंनी बाबरी मशीद पाडली त्यात चूक काय?तरीही कुमार केतकरांसारखी मंडळी लोकांचा बुध्दीभेद करतात. प्रवीण स्वामीसारखा पत्रकार तर म्हणतो की लोकमान्य टिळकांपासून हिंदू दहशतवादाची सुरवात झाली. आणि त्याचा हा लेख ज्या 'द हिंदू' या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाला त्याचे संपादक त्याविषयीचे पत्रसुध्दा प्रसिध्द करायची तसदी घेत नाहित! हे असे कुजलेली विचारसरणी असलेले लोक आपल्याच समाजात जन्माला का येतात?
हिंदू समाजाचे एक सुदैव आहे की ज्या ज्या वेळी पाणी नाकातोंडाशी येते त्या त्या वेळी एखादा चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी, संभाजी यासारखे महान योध्दे जन्माला येतात आणि सर्व पराभूत मनोवृत्ती मुळापासून उखडतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात.या संकटानंतर हिंदू समाज आपला तृतीय नेत्र उघडेल, आपण इतिहासापासून धडा शिकू आणि तो नेत्र आपल्यातील दोषांना भस्मसात करेल.नवसंजीवनी घेऊन हिंदू सैन्य पाकिस्तान आणि बांगलादेशाचा खातमा करेल आणि सिंधू नदी भारतात आणेल. सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल आणि नथुराम गोडश्यांच्या अस्थी सिंधू नदीत विसर्जित होऊन त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. त्याचबरोबर आपण आपल्या समाजातील जातीभेदांचे पण पूर्णपणे पारिपत्य करू आणि एक समतेवर आधारीत समाज निर्माण करू. आपल्या समाजातील अनेक बांधवांना हिंदू राज्य येणे म्हणजे जातीभेदांचे राज्य येणे अशी भिती वाटते. ती भिती मुळापासून उखडली जाईल आणि आपल्या समाजातील सर्व दोष नाहिसे होतील अशी आशा करू या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात मुस्लिमांना आपण सांगू 'आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना, आणि विरोधाल तर उच्छेदून हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही'. या सर्वाची सुरवात मुंबईवरील भीषण हल्ल्यानंतर व्हावी आणि हा हल्ला एक इष्टापत्ती ठरावा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या शतकाच्या आत ही सर्व स्वप्ने पूर्ण होतील अशी प्रार्थना करू या. आणि तीच या आणि अशा अनेक हल्ल्यांमधील मृतांना खरी श्रध्दांजली ठरेल.
जय हिंद!
---विल्यम जेफरसन क्लिंटन.
पाहुणा संपादक : क्लिन्टन.
वाचने
29644
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
प्रक्षोभक अग्रलेख
In reply to प्रक्षोभक अग्रलेख by आजानुकर्ण
ज्या
In reply to ज्या by विसोबा खेचर
इतिहासातील सोयीस्कर दाखले
In reply to इतिहासातील सोयीस्कर दाखले by आजानुकर्ण
अपवाद
In reply to अपवाद by विसोबा खेचर
हिंदूंचा नेभळटपणा नाही
In reply to प्रक्षोभक अग्रलेख by आजानुकर्ण
सहमत
सहमती.
In reply to सहमती. by कलंत्री
माझ्या
सर्व जगच जिंकावे
संपादकीय लेख आवडला.
लेख आवडला ...
In reply to लेख आवडला ... by मनीषा
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको..
In reply to लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.. by प्राजु
पाकड्यांच
In reply to पाकड्यांच by विसोबा खेचर
पुळका अजिबात नाही..
In reply to पुळका अजिबात नाही.. by प्राजु
एकूणच
In reply to लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.. by प्राजु
हिटलर,
In reply to हिटलर, by विसोबा खेचर
जे पटकन जमेल ते करा..
In reply to हिटलर, by विसोबा खेचर
हिटलर,
In reply to लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.. by प्राजु
हिटलर,
In reply to लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.. by प्राजु
नाही पटत
In reply to लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.. by प्राजु
प्राजु ...
अग्रलेख
या अग्रलेखातील बरेच
चांगला अग्रलेख
आतापर्यंत
आशावादी
अग्रलेख
In reply to अग्रलेख by मदनबाण
सहमत
अतिशय प्रामाणिक
लेख आणि चर्चेतील अनेक मुद्दे
उत्तर
In reply to उत्तर by क्लिंटन
आपला प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद लांबलचक नाही
क्लिंटनजी , इतिहासाचे व इस्लामबाबतचे अज्ञान दूर करणे गरजेचे आहे
अग्रलेख
In reply to अग्रलेख by यशोधरा
संयत पण
In reply to अग्रलेख by यशोधरा
यशोधराशी
स्पष्टोक्ती भावली
In reply to स्पष्टोक्ती भावली by सर्वसाक्षी
ओ तुमीपण
समजले नाही
काही राहिलेले मुद्दे
In reply to काही राहिलेले मुद्दे by क्लिंटन
धन्यवाद
अवांतर
मूळ लेख आणि प्रश्नोत्तरे वाचली
In reply to मूळ लेख आणि प्रश्नोत्तरे वाचली by चतुरंग
ब्लॅकमेलिंग
नवीन मुद्दे
In reply to नवीन मुद्दे by क्लिंटन
चांगले
In reply to नवीन मुद्दे by क्लिंटन
परामर्ष
In reply to परामर्ष by आजानुकर्ण
चटकन दिसले
In reply to नवीन मुद्दे by क्लिंटन
येशु
नवीन प्रतिक्रिया
In reply to नवीन प्रतिक्रिया by क्लिंटन
पाकिस्तान आणि बांग्लादेश
संपादकिय प्रक्शोभक नक्कीच नाहि
ईस्लाम बद्दल म्हाइति