मिपा संपादकीय - संभोग म्हणजे काय?
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
संभोग म्हणजे काय?
हा प्रश्न फारसा कोणाला पडत नसावा. किंवा चारचौघात हा प्रश्न विचारण्याचे धाडस होत नसेल म्हणुन हा प्रश्न कोणी विचारत नसेल्.एखाद्या नवर्याने त्याच्या बायकोला किंवा बायकोने नवर्याला हा प्रश्न विचारला तर प्रश्न ऐकणारा एक क्षण हादरुन जाईल. त्या प्रश्नापासून जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर जाईल. शक्य तितक्या लवकर प्रश्न विसरण्याचा प्रयत्न करेल. सुसंस्कृततातल्या संस्कृत माणसाला या प्रश्नाने जितके पछाडले असेल तितके इतर कोणत्याच प्रश्नाने पछाडले नाही.
जगात आत्तापर्यन्त अन्न आणि सेक्स या विषयावर जितके संशोधन झाले आहे तितके माणसाच्या इतिहासावरही झालेले नाही. भारतीय समाजाबद्दल बोलायचे झाले तर आपली कुटुम्ब संस्था हे त्या विषयाचे फलीत आहे.सुरक्षीतता आणि कामवासना हे आपली समाजसंस्था टिकवणारे दोन महत्त्वाचे खांब आहेत.भारतीय विवाहसंस्थे चा मूळ उद्देशच तो आहे.सहजीवन वगैरे ही त्याला दिलेली गोंडस नावे आहेत.
लग्न हे दोन जीवांचे मीलन आहे. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात आहे वगैरे मुलामा असतो. गेल्या शतकाच्या मध्यापर्यन्त लग्नपत्रीकेत सरळ सरळ लग्न या ऐवजी "शरीरसम्बन्ध" असा उल्लेख असायचा.
भारतीय कुटुम्ब संस्था ही स्त्रीला स्थैर्य आणि सुरक्षीतता देण्यासाअठी आस्तित्वात आली असे इतिहासाचार्य केतकर "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात लिहितात. पण या विवाह संस्थेमुळे किती स्त्रीया खरोखर सुरक्षीत झाल्या हा खरोखरच मोठा प्रश्न आहे.
लग्नात स्त्रीला "धर्म अर्थ काम " यात पुरुषाच्या बरोबरीने स्थान असावे असे म्हणतो. तशी प्रतीज्ञाही करतो . किती पुरुष हे असे स्थान स्त्रीला देतात? किंवा किती स्त्रीयाना याची जाणीव असते?
स्त्रीला धर्माच्या बाबतीत दुय्यम स्थान असते. धर्म याचा अर्थ समाजकारण रीत व्यवहार अशा अर्थाने. अर्थाच्या बाबतीत स्त्री कमावणारी नसेल तर तीला कित्येक घरांत भुईला भार अशीच वागणुक दिली जात असतें नवर्याच्या पगारात खर्या अर्थाने स्त्रीचा अर्धा वाटा असतो हे कितीजण मान्य करतात? नवर्याने त्याला मिळणार्या पगारातून खर्च किती करायचा हे नवरा ठरवतो पण कमावत्या स्त्रीला मिळणार्या पगारातुन तीने स्वतःसाठी किती खर्च करायचा हे किती स्त्रीयाना स्वतः ठरवता येते? घरात घेतल्या किती निर्णयात स्त्रीचा विचारघेतला जातो?
पैशाच्या किंवा समाजात मिळणार्या स्थानाच्या बाबतीत बर्याच जणानी थोडा पुढे जाउन विचार केला असेल पण एका बाबतीत मात्र आपण अ़जूनही विचारसुद्धा करायला तयार नसतो . ते म्हणजे तीच्या कामभावने बाबत.
नवराबायकोचे नाते म्हणजे एक कविता असते. दोघे मिळून अवघे विष्व असते असे आपण म्हणत असतो.एखाद्याला दैवत्व दिले की त्याबातीतले सगळे प्रश्न निकालात काढता येतात अशी आपली समजुत असते.स्त्रीला एकदा देवी म्हंटले की तिच्या मानवी समस्यांबद्दलचे सगळे प्रश्न संपतात असे आपला समाज मानत असतो.
नवराबायको च्या नात्यात स्त्रीला किती प्रमाणात समानतेची वागणूक मिळते. कित्येक ठीकाणी तर स्त्रीला गृहीत धरूनच व्यवहार होतात. एखाद्या घरात धर्म आणि अर्थाच्या बाबतीत समान वागणूक मिळतही असेल पण काम याबाबतीत मिळनार्या वागणूकीचे काय? त्याही बाबतीत स्त्रीला गृहीत धरले जाते. शरीरसंबंधास नकार देणार्या स्त्रीला मारहाण झाल्याच्या बातम्या कधी वर्तमानपत्रात येत असतात. न येणार्या छापल्या जाणार्या बातम्यांबद्दल काय.
सम्भोग हा शब्द सम + भोग या दोन शब्दानी मिळुन बनलेला आहे. यात भोग या शब्दाला जितके महत्त्व आहे तितकेच सम या शब्दालाही आहे.
एक व्यक्ती म्हणून किती पुरुष स्वतःच्या पत्नीला ओळखत असतात. किंवा एक पत्नी स्वतःच्या नवर्याला एक व्यक्ती म्हणून किती ओळखत असते. मला वाटते की दोन्ही प्रश्नांची उत्तरे फार वेगळी नाहीत. नवरा बायकोच्या नात्यात शरीरसम्बन्ध हे फार महत्त्वाची भूमीका बजावत असतात. किंबहुना संसाराच्या गाड्यात शरीरसम्बन्ध हे वंगणाची भुमीका बजावत असतात. कुरकुरी कुरबुरी कमी करायला शरीरसम्बन्ध खूप उपयोगी पडत असतात. तसेच त्या वाढवायला ही कारणीभूत होत असतात.
इतर प्राणी आणि मानव यांच्याबुद्धी मध्ये किती फरक आहे हे ठाऊक नाही. पण प्राणी आणि मानव यांच्यात कामवासने मध्ये मात्र खूप फरक आहे. प्राण्यांच्यात कामभावना ऋतुमानानुसार ठरावीक कालावधीतच असते. मानवामध्ये मात्र ती सदोदीत असते . पशुपक्ष्यांत नर कधी मादीवर आक्रमण करून तिच्यावर हक्क गाजवताना दिसत नाही. पक्षी मादीला उत्तम घरटे विणून दाखवतो. कधी तो तिच्या भोवती रुन्जी घलतो. तिला गोड गाणी म्हणून मोहवतो.मानवात मात्र हे दिसत असते किंवा काहींना तर आक्रमण करणे म्हणजेच पुरुषार्थ असे वाटत असते.
कदाचित "धर्म ,अर्थ" हे एकेकट्याने करता येत असतील पण "काम" पूर्ण होण्यासाठी स्त्रीची गरज असतेच.
घटस्फोटाच्या बरर्याचशा केसेसची सुरुवात या न बोलल्या जाणार्या विषयामधून होत असते. त्या बाबतीत पुरुषाने स्त्रीला हक्काची वस्तु समजण्यामुळे ईगो दुखावले जातात्.पुरुषाला शरीरसम्बन्ध हे शारीरीक मानसीक ताणतणाव मोकळे करण्यासाठीचे साधन वाटत असते तर स्त्रीला भावनीक गुंतवणूक वाटत असते.
स्त्रीने दिलेला नकार हा पुरुषाला पर्सनल रीजेक्षन( व्यक्तीगत रीत्या झिडकारणे) वाटते तर याउलट पुरुषाने नकार देणे हे कोणी कल्पनेतसुद्धा कल्पुशकणार नाही. यातुनच दोघांचीही घुसमट वाढीला लागते.दोघांचा ही त्या विषयाकडे पहायचा दृष्टीकोण वेगळा असतो.दुर्दैवाने आपल्या समाजात दोघांच्याही मनाची जडघडण लहानपणासूनच हे काही समजुन घेण्याच्या पद्धतीने झालेली नसते. या विषयावर धड कुठे मोकळेपणे बोलताही येत नाही. दोघांच्याही बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती असते
कुटुम्बात नवर्याने कमावुन आणणे आणि त्या बदल्यात बायकोने त्याला शरीरसूख देणे म्हणजे संसार हेच त्यांच्या मनावर लहानपणासून कळतनकळत बिम्बवले जाते. ज्या ऋषीने विवाहात "धर्मे च , अर्थे च, कामे च" ची शपथ घ्यायला सांगितली त्याने त्याचा अर्थ जाणला होता. बायकोने नवर्याला एक व्यक्ती म्हणुन तसेच नवर्याने बायकोला एक व्यक्ती म्हणून समजावुन घ्यायला हवे. तरच संसार सुखाचा होईल हेच त्याला म्हणायचे होते. त्यातले मर्म विसरले गेले आहे केवळ उपचार बाकी राहिला आहे.
नवराबायकोने एकमेकाना नीट समजून घ्यायचे असेल तर तीन "टी " कडे जाणीवपूर्वक लक्ष्य दिले पाहिजे
ते म्हणजे टॉक , टाईम , टच
टॉकः नवराबायको एकमेकांशी किती बोलतात यात स्पीक पेक्षा टॉक महत्त्वाचे. एकमेकाना समजून घेने महत्त्वाचे. विचार ऐकणे महत्त्वाचे दुसर्या व्यक्तीलही काही विचार असतात याची जाणीव असणे महत्त्वाचे. तू बोलत रहा मी टीव्ही बघत बसतो/ तुम्ही बोलत रहा मी सीरीयल बघत बसते हे करणे टाळले पाहिजे
टाईम: नवर्याला / बायकोला क्वालिटी टाइम देणे महत्त्वाचे. एकमेकांसोबत घालवलेले साधे साधे क्षणही खूप काही जादू करून जातात. लग्नाच्या अगोदर हे कळतनकळत घडत असते. पण नन्तर त्याची सवय होऊन जाते. आणि हळू हळु शुश्क व्यवहार बनून जातो
टचः हा टी सर्वात महत्त्वाचा. मानवाचे सर्वात मोठे इन्द्रीय त्वचा त्या इन्द्रीयातून जाणवणारे बरेच काही असते. काही स्पर्ष अंगावर पारीजातकाचा सडा पाडतात. लग्ना अगोदर प्रथमच हातात हात घेताना हा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो.तो पारीजतकाचा सडा आपण रोजच्या व्यवहारामध्ये हरवुन टाकतो.
ओशो रजनीश म्हणतात की आपण सम्भोग सुद्धा एक उपचार म्हणून / एक सवय म्हणून करत असतो.ड्रायव्हिंग्ची जशी सवय होते आपण नकळत गीयर टाकत रहातो तसेच काहिसे.. ड्रायव्हिंगमधली गम्मत, थ्रील सम्पलेली असते. नवराबायको हे काही गाडीसारखे यन्त्र नव्हेत.
कोणत्याही गोष्टीची सवय झाली की त्यातले काव्य मरून जाते.त्यातले खडे जाणवायला लागतात. रजनीश पुढे म्हणतात की सवय होणे आपण थांबवु शकतो.त्या साठी त्यातला आनन्द जाणीव पूर्वक भोगता आला पाहिजे
संसारात पारीजातकाचा शिडकावा नेहमीच आणायचा असेल तर उपभोगपेक्षा "सम भोग" महत्त्वाचा!
पाहुणा संपादक : विजूभाऊ.
वाचन
51548
प्रतिक्रिया
0