इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 4:17 pm

कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलून देऊ शकणारे खालील तंत्रज्ञ हवेत!

* भाषातज्ञ हवेत : कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलणे, आणि असे संपादीत केलेले यश सातत्याने भविष्यात पुढील पिढ्यांसहीत कायमस्वरुपी टिकवणे.

* अर्थतज्ञ : कामाचे स्वरुप : संपूर्ण मनुष्यजात जरी इंग्रजाळली तरीही मागणी-पुरवठा नियमांचा कोणताही प्रभाव न पडता, प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ इंग्रजी कौशल्याच्या उपलब्धतेच्या बळावर संपूर्ण मानवजातीतील प्रत्येक व्यक्तीची आर्थीक संपन्नता वाढवत नेणे.

* वैद्यकीय व्यावसायीक : अशा गोळी, इंजेक्शन्स, जेनेटीक साधनांचा शोध लावणे जेणे करून भाषा तज्ञ त्यांचे उपरोक्त काम चोखपणे बजावू शकतील.

- उपरोक्त गोष्टी ज्यांना शक्य आहेत त्यांनी ग्रीक मिथकातील राजा मिडास यांच्याशी लवकरात लवकर संपर्क करावा.

विडंबनभाषाविनोदऔषधोपचारअर्थव्यवहारशिक्षण

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

24 Nov 2015 - 4:20 pm | महासंग्राम

बाप्पा मंग इथ त्त पिवर वर्ण वालेच लाग्तीन त्यायले कामाले ….

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 4:20 pm | संदीप डांगे

ऐला भा हा री ही च!