मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा

माहितगार · · जनातलं, मनातलं
कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलून देऊ शकणारे खालील तंत्रज्ञ हवेत! * भाषातज्ञ हवेत : कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलणे, आणि असे संपादीत केलेले यश सातत्याने भविष्यात पुढील पिढ्यांसहीत कायमस्वरुपी टिकवणे. * अर्थतज्ञ : कामाचे स्वरुप : संपूर्ण मनुष्यजात जरी इंग्रजाळली तरीही मागणी-पुरवठा नियमांचा कोणताही प्रभाव न पडता, प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ इंग्रजी कौशल्याच्या उपलब्धतेच्या बळावर संपूर्ण मानवजातीतील प्रत्येक व्यक्तीची आर्थीक संपन्नता वाढवत नेणे. * वैद्यकीय व्यावसायीक : अशा गोळी, इंजेक्शन्स, जेनेटीक साधनांचा शोध लावणे जेणे करून भाषा तज्ञ त्यांचे उपरोक्त काम चोखपणे बजावू शकतील. - उपरोक्त गोष्टी ज्यांना शक्य आहेत त्यांनी ग्रीक मिथकातील राजा मिडास यांच्याशी लवकरात लवकर संपर्क करावा.

वाचने 1474 वाचनखूण प्रतिक्रिया 2