विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1
लेखनप्रकार
वाचने
13959
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वरील शीर्षकाचा एक मजेशीर घटनेवर आधारित लेख पुर्वी दिवाळी अंक २०१२ मधे सोडला होता. त्यावेळी आलेल्या अन्य अनुभवांचा आढावा.
काय लोच्या आहे कळत नाही हे नुसते वाचुनही ७व्या आकाशात पोचल्यासारखे वाटते.
शरीराला गरजेपुरतं अन्न आणि विश्रांती द्यायची .साधनं(जपमाळ वगैरे)पण नको .समोर मूर्ती नाही .कोणतेही पुस्तक नाही .देव ,कर्म यांचे विचार चर्चा नाही .
उरले मन .
विपश्यना .
पु.भा.प्र.
अवांतरः मै कब जाउंगा ?? :(
एकदा विपश्यनेचा अनुभव घ्यायचा आहे.
छान छान छान.
विपश्यनेचा प्रयोग केलात आणि विशेष म्हणजे तो सर्वांपर्यंत लेखातून पोहोचवत आहात उत्तमच.
शिबिरात जी प्रवचने ऐकवतात, त्यांचा समग्र वृत्तांत अवश्य लिहावा.
शुभेच्छा. पु.भा.आ.प्र.
In reply to छान छान छान by चित्रगुप्त
गोएंन्काजींची एक अट आहे की अशा शिबिरात येऊनच ते ध्यान धारणा करणाऱ्यांनी ती ऐकावीत. सर्व शिबिर मोफत असले तरी त्यातील ज्ञानकण वेचायला साधनेचे मोल द्यावे. इतकी माफक त्यांची अपेक्षा सुयोग्य वाटते.
In reply to शिबिरातील प्रवचने by शशिकांत ओक
तो कोणतातरी खेळ असतो, त्यात एकाने दुसर्याला सांगितलेले बदलत बदलत शेवटी भलतेच काहीतरी होते, तसे होऊ नये, म्हणून ज्याने त्याने प्रत्यक्ष मूळ प्रवचने ऐकावीत हे चांगले.
मी अनेक वर्षांपूरी विपश्यनेचे शिबीरात सहभागी झालो होतो, तो अनुभव अविस्मरणीय आहे.
मात्र 'आर्ट ऑफ लिव्हिंग' वाले भक्कम फी घेऊनच 'सुदर्शन क्रिया' नावाचा प्राणायामाचा एक प्रकार शिकवतात, शपथ घ्यायला लावतात, वगैरे अति वाटते. रामदेव बाबा टीव्हीवरून मोफत प्राणायाम वर्षानुवर्षे शिकवत आहेत, त्या संदर्भात तर 'आर्ट' वाल्यांचे जास्तच खटकते. मी दोनदा 'आर्ट' च्या शिबिरात सहभागी झालो, पण एकदाही माझे तिथे पटले नाही, माझे प्रश्न त्यांना गैरसोयीचे वाटायचे, आणि उत्तर देणे टाळायचे. दोन्ही वेळी शिबीर पूर्ण केले नाही.
खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.
In reply to एकाने दुसर्याला सांगितलेले by चित्रगुप्त
@खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.>>> इतनाही सच है..बाकि सब..
In reply to एकाने दुसर्याला सांगितलेले by चित्रगुप्त
चित्रगुप्त , ही
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात. गोएन्काजी आपल्या प्रवचनात यावर भर देतात की ही साघना पद्धति न बदल वापरली जावी
In reply to चित्रगुप्त , ही by शशिकांत ओक
@शशिकांत ओक
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतातखरे आहे. पतंजलींनी सांगितलेल्या यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्व अवस्था अत्यंत प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात. काही व्यक्ती जन्मतःच यासाठी पात्र असतात. विपश्यना हा प्रकार यापैकी धारणा आणि ध्यान यांच्या मधली पायरी, असा माझा अनुभव आहे. सर्व प्रकारचे ध्यान-प्रचारक आमची ध्यान पद्धती ही 'डायरेक्ट' करता येते, (अर्थात त्यापूर्वी यमनियम, प्राणायामादि साध्य करण्याची आवश्यकता नाही), असा प्रचार करत असतात. वस्तुतः ते योग्य नाही. सात-दहा दिवसांच्या शिबिरात फक्त अमूक एका ध्यानपद्धतीची ओळख होते, थोडेसे जमूही लागते, परंतु तिचा अपेक्षित परिणाम हा दीर्घकाल नियमितपणे केलेल्या साधनेतूनच साध्य होत असतो. त्यामुळे शिबिर संपल्यावर जर नियमित साधना केली नाही, तर आपल्या माहितीत आणखी एक भर पडली, एवढाच काय तो उपयोग त्या शिबिराचा झाला, असे होते. याचे कारण माझ्यामते आपण ध्यान ही योगाची सातवी पायरी एकदम गाठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याआधीच्या पायर्या चढल्याशिवाय त्यात यश मिळत नाही. मुळात यम-नियम-आसन-प्राणायाम या प्रारंभिक पायर्यांबद्दल यथोचित माहिती मिळणे, हेच कठीण होऊन बसले आहे. विविध विद्वानांनी पतंजलींच्या सूत्रांचा आपापल्या समजुतींप्रमाणे अर्थ लावलेला असल्याने खरे काय, हेच कळेनासे झालेले आहे. त्यातून हल्ली विविध आर्ट वाल्यांच्या दुकानदारीची चलती असल्याने गोंधळ आणखीनच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमिवर मी लिहिले, की या सर्व उपद्व्यापातून हाती काहीच न लागण्यापेक्षा आपल्याला ठाऊक असलेल्या दोन - चार गोष्टी (ज्या लहानपणापासून माहित असूनही वर्षानुवर्षे आपण करण्याचे टाळत असतो, परिणामी त्यातून अचानकपणे गंभीर संकटांना सामोरे जात असतो), त्या जरी नेटाने प्रत्यक्ष करत राहिलो, तरी खूप. मी विपश्यनेचे शिबिर दहा- बारा वर्षांपूर्वी उत्तम प्रकारे केले, तात्कालिन फायदाही झाला, परंतु त्यानंतर घरी आल्यावर आजतागायत एकदाही विपश्यना केली नाही. याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.
In reply to ध्यान वगैरेंबद्दल by चित्रगुप्त
चित्रगुप्त,
पातंजलींच्या साधनापथाची ती उतरंड आज अनेक विचारधारांचे प्रातिनिधिकत्व करत आली आहे. थोड्याफार फरकाने तीच विपस्यनेतही आहे. गोएंकांच्या प्रवचनातून ते स्पष्ट होते. पण ते त्यांच्या तोंडून ऐकणे योग्य. सातवीतील अभ्यासक्रम पहिलीतील मुलांना सांगावा करायला, तसे काहीसे असावे.. मग सातव्या पायरीवर एकदम कसे चढावे... असा युक्तीवाद तार्किक म्हणून बरोबर वाटतो. पण ज्यांना पहिल्या पायरीवरच पोहोचायचे नाही, फक्त काय प्रकार आहे असा कानोसा घ्यायला जायचेय असे व जे जात्याच ओढ लागली म्हणून साधनेला लागले अशांचा प्रवाह तयार व्हायला ही शिबिराची साधना प्राधान्य देते. मी स्वतः विपस्यना केली पण 'रात गई बात गई' असे झालेला आहे. पण लोक यावेत, येतात, त्यातूनच पुढील मार्ग सापडायला सुरवात होते. शिवाय पातंजलीयोग साधना शऱीरावर अनित्यचा प्रभाव पहायची प्रत्यक्ष पुरावा दाखवून देणारी पद्धती नसल्याने, 'मला मानसिक पातळीवर जे होतेय त्याचा पडताळा न आल्याने' संदिग्धता येते, ती विपस्यनेत नाही असा यात ठळक फरक वाटतो. मग पायरीची समस्या समस्या न राहता फक्त वाटेवरची वळणे राहतील. पण काहींच्या बाबत (भले ते अगदी कमी संख्येने असतील) ज्यांना विपस्यनेच्या 'सरळ' वाटेवर ती वळणे कदाचित लागणारही नाहीत...
In reply to चित्रगुप्त , ही by शशिकांत ओक
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात.ओक साहेब.. एखी मारा पर क्या सॉलीड मार्या...! __/\__ @चित्रगुप्त
याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.जर आपण विपष्यना सांगितल्या प्रमाणे तंतोतंत केली असेल तर यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्वच पायर्या विपष्यनेच्या काळात निश्चीतपणे चढल्या असल्याचेच लक्षात येइल. हा परत आल्यावर काही पायर्या कोणाकडुन उतरल्या जात असतील तर तो विपष्यनेचा भाग नाही...
In reply to एकाने दुसर्याला सांगितलेले by चित्रगुप्त
In reply to बरोबर. by तिन तेरा
चित्रगुप्त बरोबर.
मिपाच्या खाणीतील अजून एक उत्तम लेखमाला....
In reply to मस्त सुरुवात... by मुक्त विहारि
उत्तेजना बद्दल...
जरूर करत रहा.
वैयक्तिक अनुभव चांगला आहे...
छान लेख. विपश्यना शिबिर हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव असतो.
थोडे योगाबद्दल;
माझ्या माहितीप्रमाणे "यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी" ही आठ अंग आहेत, पायर्या नव्हेत. ही आठही अंग कार्यरत असावी लागतात. एकदा का प्राणायाम चांगला आला की यम नियम सोडून दिलेले चालतात असं योगात करता येत नाही. कारण ही सगळीच अंग महत्त्वाची आहेत.
In reply to छान लेख. विपश्यना शिबिर हा by कवितानागेश
केल्याचे नुकतेच कळले. धाग्याची लिंक मिळाली तर वाचायला आवडेल.
In reply to विपश्यना साधना वर आपले लेखन by शशिकांत ओक
In reply to लिंक्स by कवितानागेश
अनुभूति न घेता विचार व्यक्त करायची घाई काहींना असते. अपेक्षा की आपल्या लेखातील विचारधनावर वाचक कृती करतील.
माहितीपूर्ण लेखमाला. वाचत आहे.
शशिकांत ओक तुम्ही या लेखमालेतून विपश्यना केंद्र आणि आचार विचारांचे डावे उजवे दोन्ही पैलू सभोर आणलेत .गोएन्कांनी एक चांगली व्यवस्था करून ठेवली आहे .त्यांचा जन्म बालपण म्यानमार(ब्रह्मदेश) मधला .त्यामुळे बुध्द धर्माचरण त्यांनी जवळून अवलोकिले आहे .जसे आहे तसे त्यांनी ते इथे आणले आहे .
In reply to शशिकांत ओक तुम्ही या by कंजूस
पुढील भाग ५ वेगळेपणाने सजला आहे. पहा आवडतोय का!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
सादर झाले.
बिरुटे सर, आपल्या प्रतिसादाबद्दल प्रतीक्षेत. पबिसादर झाले. आपल्या प्रतिसादाबद्दल प्रतीक्षेत.
विपस्यना केंद्रात भुताटकी?