Skip to main content

छंदशास्त्र

पाल्हाळ (देवद्वार)

लेखक लिखाळ यांनी रविवार, 09/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या लेखावरून स्फुर्ती घेउन... वाचतो क्वचित त्यातून ललित घुसते डोईत कधितरी लिहितो मधेच त्यातून तात्विक विचार सात्विक करितो मी ठरवितो मग लिहावी कविता सुखदु:ख बाता जमेचिना पुरे झाले आता डोके खाजवणे कविता रचणे चेष्टा नोहे पहा मिपावर असा हा लिखाळ लावितो पाल्हाळ पुन्हा पुन्हा --लिखाळ.

भूपाळी (देवद्वार छंद)

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 08/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नुकतीच धोंडोपंतांची नव्याने सुरु झालेली छंदशास्त्राची शिकवणी लावलेली आहे. हा पहिल्या धड्यावरचा गृहपाठ. उठा हो दयाळा प्रभात जाहली पाहा उजळली पूर्व दिशा भेटीसाठी झाले जन सारे गोळां भक्तांचा हा मेळां वाट पाहे दाखवा हो रूप सावळें सुंदर अति मनोहर आम्हालागीं तुम्ही राम आम्हा तुम्ही कृष्ण आम्हा विठ्ठलही आम्हा तुम्हाठायी द्या हो सर्वां सुख आरोग्य सावली करा ब्रीदावली काही सार्थ भटू म्हणे नाही मजला कवित्व केवळ ममत्व ईश्वराचे अजाणतेपणी काही केला यत्न दगडच रत्न माना ऐसे

छंदशास्त्र

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत. मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते. मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात.