चक्रव्यूह
विशेष
(हे मात्रावृत्तातलं काव्य आहे, पण वृत्ताचं नाव माहीत नाही. जाणकारांनी सांगावं)
पूर्वेपासुनि परवामधुनी उजव्या बाजुस आणि उद्या
पसरूनी जणु रक्त शरीरा भिंति सदोदित खड्या उभ्या
सूर्य उगवतो अन् मावळतो काही सावल्या हालवतो
स्थितप्रज्ञासम स्तब्धस्थित त्या स्थितिक्कणांना न्याहळतो
चंद्रप्रकाशी न्हाउन जाउन भिंति दुग्धिमा पांघरती
भव्य भयानक भीषण सुंदर आणि विषण्ण त्या दिसती
जगड्व्याळ या जंजाळातुन उगीच उंदिर शोधे वाट
अडवणुकीचे सुखही न त्यांना ना सुटकेचे दु:ख मनात
कुरतडूनही जरा न तुटती अशाश्वताच्या शाश्वत गाठी
निराश उंदिर चाले पुढल्या चक्रव्युहा अभिमन्यूपाठी
वाचने
6921
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
सुंदर काव्य. शरदिनींच्या रचनांची आठवण झाली. अर्थात तितकी सफाई यायला वेळ लागेल. शुभेच्छा.
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
In reply to शरदिनी by सन्जोप राव
आगायायायायायाया... शरदिणी ... =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=))
=))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
संजोपराव नेहमी माझ्या मनातला प्रतिसाद लिहीतात ..
- टारेश ढोलबडवी
"नुस्तंच" सहि विडंबण करणं हे "कवितां"च्या लेंड्या पाडण्या इतकं सोपं असतं,
आशयाच्या आधी वृत्तातल्या दुरुस्तीबद्दल बोलण्याचा करंटेपणा करतो. माझ्या "वीटकामामुळे" अर्थाला बाध येत असल्यास या कडे दुर्लक्ष करावे.
पूर्वेपासुनि परवामधुनी उजव्या बाजुस आणि उद्या
पसरूनी जणु रक्त शरीरा भिंति सदोदित खड्या उभ्या
सूर्य उगवतो अन् मावळतो काही सावल्या हालवतो
स्थितप्रज्ञासम स्तब्धस्थित त्या स्थितिक्कणांना न्याहळतो
चंद्रप्रकाशी न्हाउन जाउन भिंति दुग्धिमा पांघरती
भव्य भयानक भीषण सुंदर खिन्नमनस्की परि दिसती
जगड्व्याळ या जंजाळातुन उंदिर शोधे वाट फुका
सुटकेच्या दु:खाला वंचित अडवणुकीच्या आणि सुखा
कुरतडूनी तुटती न अनित्याच्या परि या शाश्वत गाठी
अभिमन्यूपरि उंदिर चाले पुढच्या चक्रव्युहासाठी
बराच आशय दिसतो आहे. कविता आवडली.
In reply to आवडली by चित्रा
बराच आशय [असल्यासारखा] दिसतो आहे. कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
कविता आवडली. इंटरनेटवर इतके प्रगल्भ काव्य क्वचित वाचायला मिळते.
एकंदर अस्तित्त्वाबद्दल कृमी-कीटकादिचे रूपक कल्पून मांडण्याची कल्पना आपण या आधी पाहिली आहे. मर्ढेकर आठवतात. But Mouse, you are not alone /In proving foresight may be vain:/The best laid schemes of mice and men /Go often askew,/And leaves us nothing but grief and pain,/For promised joy! या ओळीसुद्धा प्रसिद्ध आहेत , ज्यांना पुढे स्टाईनबेकच्या कादंबरीच्या शीर्षकरूपाने चिरस्थायी स्वरूप मिळाले. ही कविता त्या जातकुळीतली आहे.
काही संकल्पनांचे चमत्कृतिपूर्ण juxtaposition कवितेत आढळते. उदा. पहिल्या ओळीतल्या काल-अवकाशाची गुंफण. किंवा "सुटकेचे दु:ख आणि अडवणुकीचे सुख". शाश्वत-अशाश्वताच्या द्वैताबद्दल , एकूणच काही मूलभूत समजल्या जाणार्या प्रश्नांबद्दल ही कविता आहे.
कुणी या कवितेस यशस्वी समजो वा अयशस्वी , low aim चा दोष तिला खचित देता येणार नाही.
मला इथे सर्वात आवडलेल्या कविता शरदिनी ताईंच्या . आपली तुलना त्यांच्याशी झाली ही फार मोठी गोष्ट आहे. अभिनंदन!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
खिन्नमनस्की शब्द आवडला.
>सुटकेच्या दु:खाला वंचित अडवणुकीच्या आणि सुखा
हे छंदात बसतं, पण ती निर्विकारता भिंतींची आहे, उंदराच्या सुख दु:ख वंचनेविषयी ती ओळ नाही.
>कुरतडूनी तुटती न अनित्याच्या परि या शाश्वत गाठी
हे ताणल्यासारखं वाटतंय. परि किंवा या एकच ठेवता येईल. पहिल्या तीन शब्दातदेखील काहीतरी लय चुकल्यासारखं वाटतं.
शेवटच्या ओळीतला निराश शब्दाऐवजी परि आला आहे. मूळ ओळीत मात्रा जास्त आहेत की या ओळीत कमी आहेत?
तुम्ही सुचवलेल्या बहुतेक ओळी वृत्तात बसतात. पण आत्ताच्या रचनेत अनुप्रास आहे.
In reply to खिन्नमनस् by राजेश घासकडवी
तुमच्या कवितेमधे अनुप्रास जाणवला नाही खरा.
हे मात्रा वृत्त आहे बहुधा नाव आर्या किंवा गीती असावे. प्रत्येक ओळीत ३० मात्रा. लघु आणि गुरू अक्षरांचा क्रम फिक्स नाही.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
२११२२ २१ २१२ ११११ २२ २११२
पूर्वेपासुनि परवामधुनी उजव्या बाजुस आणि उद्या
२२२११ ११२११२ ११२ २११ २१ १२
नितिन थत्ते
In reply to आर्या? by नितिन थत्ते
अरे देवा!! ह्या कवितेमध्ये इतके गूढ व्याकरण होते काय..!!!
शरदिनींच्या कवितांचे उदाहरण कुठे पहायला मिळेल...?
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"


In reply to शरदिनींच् by डावखुरा
http://misalpav.com/node/9621
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
छान आहे कविता.
लय चांगली साधली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
शुचि तुला कसे गं सगळ्या कविता माहीत आहेत....
असो तु दुवा दिलेली कविता छान आहे...
धन्यवाद..!!
--------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"


उंदीर हे दररोजचेच मरणे जगत असणार्या एखाद्या मानवाचे (की मानवसमूहाचे ?) प्रतिक आहे असे वाटते. दररोजचीच लढाई करणे म्हणजे चक्रव्युव्ह आहे असे वाटते. बाकी पहिले ३ कडवी (कडव्याचे अनेकरूप) वातावरण निर्मीतीसाठी बेतलेले दिसतात. (अन तुमचे आडनाव सार्थ करतात.: घासकडवी :-)).
छान काव्या आहे. बुद्धी ताणली गेली. (शारदिनी तै ची आठवण झाली. ) त्यांच्यासारखे तुम्ही करू नका. त्या फक्त दुर्बोध कविता टाकायच्या अन बाकी त्यांच्या वाचकांशी संवाद तर राहोच पण प्रतिसादही द्यायच्या नाही. त्या मुळे सगळा खेळ एककल्ली व्हायचा. तुमच्याकडून ती अपेक्षा नाही म्हणा. योग्यवेळी उत्तर येईलच. (ही आशा.)
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
अनेकांनी केवळ दुर्बोधतेपोटी या कवितेची शरदिनींच्या कवितेशी तुलना केली. त्यांच्या कविता मनापासून आवडत असल्यामुळे मला बरं वाटलं, पण तशी तुलना रास्त नाही असं वाटतं. त्यांच्या कवितेत असलेलं शब्दसामर्थ्य आणि नादमाधुर्य माझ्याकडे नाही. अर्थात ही कविता शाब्दिक पातळीवर क्लिष्ट नाही हेही खरं. असो. प्रत्येक वाचकाने आपला स्वतंत्र अर्थ काढावा, व कवीचा 'अर्थ' केवळ अनेकांपैकी एक असावा असं मी मानतो. पण जर कविता वाचकाला दुर्बोध वाटत असेल तर कवीने आपली भूमिका मोजक्या शब्दात मांडावी हे माझं मत आहे.
भिंती हे अस्तित्वाला असलेल्या बंधनांचं प्रतीक आहे. भौतिकतेचं बंधन. पुरुषाला असलेलं प्रकृतीचं बंधन. किंवा त्यापुढे जाऊन म्हणता येईल की ते अस्तित्वाच्या, स्वच्या, शक्तीपलिकडच्या विश्वाचं बंधन आहे. पहिल्या कडव्यात भिंती दिक्काल व्यापून राहिलेल्या आहेत याचं वर्णन आहे. भौतिकता ही आत्म्याच्या इतकी आतपर्यंत भिनली आहे की या दोन गोष्टी वेगळ्या काढणं कितपत अर्थपूर्ण आहे, असाही प्रश्न पडावा. उंदिर हे अर्थातच अस्तित्वाचं प्रतीक आहे. पण या द्वैताला थोडे पदर आहेत. म्हणजे स्व व विश्व, तसंच आपण व परिस्थिती, इच्छा व मर्यादा अशा वेगवेगळ्या पातळींवर अर्थ काढता येतील.
विश्वरूपी बाह्य बंधनांच्या वर्णनाने कवितेला सुरूवात होते, आणि नंतर फोकस बदलून ती स्व वर येते. बंधनं ही असतात. ती का असतात, अशीच का असतात, कोणी निर्माण केली याला उत्तर नाही. जीएंच्या अस्तिस्तोत्रातल्या समुद्राप्रमाणे ती केवळ असतात. या बंधनांना, भिंतींना, एक स्थायी, चिरंतन स्वरूप आहे. ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वाटतात, पण तो केवळ चंद्रप्रकाशाच्या दुग्धिम्यातून येणाऱ्या संदिग्धपणामुळे होणारा भास असेल. चंद्र, सूर्याच्या फिरण्याने (काळ गेल्याने) त्यांच्यावर काही सावल्या हलण्यांपलिकडे फरक पडत नाही. ती निर्विकार व स्थितप्रज्ञ असतात.
उंदराच्या हाती या सर्व अनर्थातून अर्थ काढण्याची धडपड करणं यापलिकडे काही नाही. या धडपडीबाबत बाह्य विश्व निर्विकार आहे. धडपडीचं यश, अपयश याने त्या अनर्थावर काही फरक पडत नाही. त्यात बदल होत नाही. या सगळ्याचा अर्थ लागत नाही. गुंता सुटत नाही. तेव्हा एक अर्धवट सुटलेला गुंता तसाच सोडून पुढच्या गुंत्याकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. या गुंत्यात पडणं केवळ आपल्या हाती असतं. चक्रव्यूहात शिरणं आपल्याला माहीत असतं. बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नसतो. अभिमन्यूप्रमाणेच आत शिरताना आपण बाहेर पडू शकू असा उत्साह असतो. तेव्हा वैफल्याशिवाय दुसरं काही हाती पडत नाही.
उंदीर, चक्रव्यूह या रूपकांना आणखीन लॅबरॅटचंही अंग आहे. हा मेझ कोणी रचलाय, पूर्ण केल्यावर बक्षीस काय मिळणार आहे, बक्षीस देणाऱ्याला यातून काय साध्य करायचं आहे याची उंदराला काही कल्पना नसते. कदाचित या सगळ्याबाबतीत योग्य प्रश्नांची मांडणी करण्याचीही क्षमता नसते.
कवितेची breadth आणि depth आवडली . तुमचं रसग्रहणने समजण्यात आणखी भर घातली. फक्त 'अडवणुकीचे सुखही न त्यांना ना सुटकेचे दु:ख मनात' असे म्हणून नंतर 'निराश उंदिर' असे म्हणणं थोडं clashing वाटतं.
काहितरी समजल्यासरखे वाटतय
छान आहे कविता
अप्रतिम काव्य रचना आणि त्यावरचे रसग्रहण..!!
शरदिनी