Skip to main content

वेड्या आईची वेडी माया

लेखक ताजे प्रेत यांनी शनिवार, 25/04/2026 16:49 या दिवशी प्रकाशित केले.

आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा.


खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता .
रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता


पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते 
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची. डॉक्टरांनी हे बरे होणार नाही, हे  वाढतच जाणार असे म्हटले


एक संध्याकाळी, तिने त्याला त्याच्या दिवंगत वडिलांसारखं समजून “तो कधी येणार?” असं विचारलं, आणि रोहन सटकला. 
“फार झाले हे . मला आता हे जमणार नाही,” तो म्हणाला, दाराकडे वळतच.


तिने वाद घातला नाही. फक्त मान हलवली, जणू हा क्षण तिला आधीपासूनच माहीत होता.
“ठीक आहे,” ती हळूच म्हणाली. “फक्त… जेवण विसरू नकोस.”


तो दुसऱ्या शहरात गेला. नोकरी, नवीन घर, नवीन आयुष्य — जिथे काहीच औषधांच्या वासासारखं नव्हतं, जुन्या आठवणींसारखं नव्हतं. लोकांना तो सांगायचा की ती आई वडील गेले आहेत. कोणी त्याला फार विचारत नव्हते


काही वर्षांनी एकच जुन्या मित्राबरोबर थोडा संपर्क होता , त्याचा  फोन आला. ती शांतपणे हॉस्पिटलमध्ये गेली होती — कोणताही नाट्य नाही, शेवटचे शब्द नाहीत — फक्त मॉनिटरवरील एक सरळ रेषा.


रोहन परत आला, कारण कागदोपत्री काम होतं. तिच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये मावल्या: एक शाल, बंद पडलेलं घड्याळ, आणि जाड वैद्यकीय फाइल.

तो फाइल उघडणारच नव्हता.

आत एक संमतीपत्र होतं — अनेक वर्षांपूर्वीचं — तिच्या सहीसह, डॉक्टरांच्या सहीसह.
प्रायोगिक ब्रेन ट्रान्सप्लांट. मेंदूची अदलाबदली आणि त्यात त्याचे नाव होते अनेक कायदेशीर कागद आणि त्यावर आईच्या सह्या आणि वाचता वाचता त्याला कळले कि लहान असताना त्याच्या मेंदूला दुखापत झालेली आणि तो वेडा होणार हे नक्की होते 


मुलाचे आजोबा ऑर्थोपेडिक सर्जन होते , गुढग्याचे ऑपरेशन करायचे पण ते बरेच उचापती होते , संशोधन करायचे . एकदा तर स्वतःच स्वतःचे पोटाचे ऑपरेशन त्यांनी केले होते. 


त्यांनी पर्याय मांडला नातवाचे आणि सुनेच्या मेंदूची अदलाबदली करायची आणि सुनेला खोटे सांगितले कि तू कंट्रोल मध्ये राहशील आणि मुलगा ठीक होईल. आज ब्रेन ट्रान्सप्लांट सहजपणे छोट्या हॉस्पिटल मध्येही होतो पण त्यावेळी ती फारच मोठी गोष्ट होती .  


पण मुलगा अति हुशार झाला पण सुनेचे वेड वाढत गेले. त्या धक्क्काने आधी रोहनचे आजोबा आणि मग वडील गेले 


आईचे बलिदान पाहून रोहन धाय मोकलून रडायला लागला.
तो आयुष्यभर आता रडणार होता   


वाचने 355
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मला माझ्या आईचा खूप तिरस्कार होता. मला तिची प्रचंड लाज वाटायची. कारण? कारण ती थोडीशी वेडी होती . हो ती डोक्याने थोडीशी कमी होती आणि गरज नसताना सगळीकडे माझ्यावर प्रेम करायची . तिच्या वागण्यात फरक पडायचाही आणि का कोणास ठाऊक मला शिसारी यायची. ती आमच्या कुटुंबावर एक कलंक आहे, असं मला वाटायचं.


ती शाळेत स्वयंपाकाचं काम करायची, मुलांसाठी खिचडी बनवायची.
एक दिवस, मी प्राथमिक शाळेत असताना ती अचानक माझ्या वर्गात आली. कदाचित मला डबा द्यायला किंवा बघायला.
मी जमिनीकडे बघू लागलो. मला इतकं ॲम्बॅरसिंग (Embarrassing) वाटलं की मला रडूच आलं. माझी आई... आणि ती अशी 'एका डोळ्याची'?
माझ्या मित्रांनी मला चिडवायला सुरुवात केली, "ए... तुझ्या आईला तर एकच डोळा आहे रे! बापरे, कशी दिसते ती!"
त्या दिवशी मला तिचा इतका राग आला की वाटलं, हिने माझ्या आयुष्यातून निघून जावं.
घरी गेल्यावर मी तिच्यावर ओरडलो, "तुझ्या त्या एका डोळ्यामुळे मला शाळेत मुलांनी खूप चिडवलं. तू मरून का जात नाहीस? का जिवंत आहेस अजून?"
माझ्या या वाक्यावर ती शांत झाली. तिने मला एकही शब्द उलट उत्तर दिलं नाही. मला वाटलं ती निर्लज्ज आहे. पण त्या वेळी मला तिच्या भावनांची कदर नव्हती, कारण माझा राग माझ्या समजण्यापेक्षा मोठा होता.
मी ठरवलं, काहीही करून इथून बाहेर पडायचं. मी खूप अभ्यास केला. स्कॉलरशिप मिळवली आणि शहरात शिक्षणासाठी निघून गेलो. तिथेच नोकरी मिळवली, लग्न केलं, स्वतःचं घर घेतलं. माझी मुलं झाली. मी माझ्या जुन्या आयुष्याला आणि त्या 'एका डोळ्याच्या' आईला पूर्णपणे विसरून गेलो होतो. मी माझ्या सुखी संसारात खूप आनंदी होतो.
एक दिवस, अचानक, ती मला शोधत माझ्या शहरातल्या घरी आली. कितीतरी वर्षांनी ती आली होती.
ती दारात उभी राहिली. तिचा तो भयानक चेहरा बघून माझी लहान मुलं घाबरली आणि रडू लागली.
माझा पारा चढला. मी तिच्यावर जोरात ओरडलो,
"तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? माझ्या मुलांना घाबरवलंस तू! चल निघ इथून! आत्ताच्या आत्ता चालती हो!"
तिने शांतपणे उत्तर दिलं, "माफ कर बाळा, मला वाटलं हा पत्ता चुकीचा आहे."
आणि ती तशीच शांतपणे, मान खाली घालून निघून गेली.
काही वर्षांनंतर, मला माझ्या शाळेतून 'पुनर्मिलन सोहळ्याचे' (School Reunion) निमंत्रण आले. मी बायकोला खोटं सांगितलं की मी ऑफिसच्या कामासाठी जातोय आणि गावी गेलो.
रियुनियन संपल्यावर, उत्सुकता म्हणून मी माझ्या त्या जुन्या झोपडीकडे गेलो.
तिथे गेल्यावर समजलं की माझी आई वारली आहे.
हे ऐकून माझ्या डोळ्यातून एक थेंबही पाणी आलं नाही. उलट, एक ओझे कमी झाल्यासारखे वाटले.
तिथल्या शेजाऱ्यांनी माझ्या हातात एक पत्र दिलं. ते तिने मरण्यापूर्वी माझ्यासाठी लिहून ठेवलं होतं.
त्या पत्रात लिहिलं होतं:
"माझ्या प्रिय बाळा,
तू परत येशील की नाही, मला माहित नाही. पण माझी एक इच्छा आहे, तुला एकदा डोळे भरून बघायचंय. तू जेव्हा शहरात आला होतास, तेव्हा माझी मुलं (तुझी मुलं) बघून मला खूप आनंद झाला होता. पण त्यांना मी घाबरवलं, त्याबद्दल मला माफ कर.
बाळा, तुला एक सत्य सांगायचं आहे, जे आजवर मी लपवून ठेवलं होतं.
तू जेव्हा खूप लहान होतास, तेव्हा तुझा एक अपघात झाला होता आणि त्यात तुझा 'एक डोळा' गेला होता.
एक आई म्हणून, तू आयुष्यभर एका डोळ्याने जगणार, हे मला सहन होत नव्हतं. लोक तुला चिडवतील, हे मला बघवलं नसतं. म्हणून बाळा... डॉक्टरांना सांगून मी तुला 'माझा डोळा' दिला होता.
आज तोच डोळा घेऊन, जेव्हा तू जग बघतोस, आणि यशस्वी होतोस, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. तू माझ्यावर कितीही चिडलास, तरी मला दुःख नाही. कारण माझ्या मुलाच्या रूपात माझाच डोळा हे जग बघतोय.
तुझीच,
आई."
ते पत्र वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातून ते कागद गळून पडले.
ज्या आईचा मी आयुष्यभर तिरस्कार केला, जिला मी 'कुरूप' समजलो... तिने स्वतःचं सौंदर्य, स्वतःची दृष्टी मला दिली होती, जेणेकरून मी सुंदर दिसावं.
आज मी रडत होतो... खूप रडत होतो... पण माझे अश्रू पुसायला आज ती हयात नव्हती.
आई-वडिलांच्या प्रेमाला कधीच गृहीत धरू नका. ते तुमच्यासाठी काय त्याग करतात, हे तुम्हाला तेव्हाच समजते जेव्हा ते या जगात नसतात. आजच त्यांची कदर करा.
 पण आई वडील हे मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात हे मला माहीत आहे

तसतसं साहित्य पण समृद्धव सृजनशील होतय का?.....

आजच एक कायप्पावर हृदय प्रत्यारोपणावर भावूक ढकलपत्र वाचले. 

एक गजरा विकणारा छोटा मुलगा,पोर्शे कार मधील आईवडील, वाहतूक सिग्नल, त्याच दिवशी गजरा विकणाऱ्या मुलाचा वाढदिवस,   वर्षापूर्वी त्याच दिवशी र्पोशे कार वाल्या आईबापाचा मुलगा ब्रेन डेथ, मुलाचे हृदय गजरा विकणाऱ्या मुलाच्या आत,आईबाप  भावूक, मग फुकट शिक्षण  ब्ला ब्ला कथा फुलत जाते.

 

असे तर डोळे,मूत्रपिंड, मेंदू  आणी बरेच काही वर लिहिता येईल. 

 

बाकी  मस्त टाईमपास.  काही लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो म्हणे! कदाचित  त्यामुळे डाॅक्टर अर्पोथेडीक मेंदू   प्रत्यारोपण करू शकले असावेत. 

 

बाकी स्वताचे पोटाचे आप्रेशन आजोबांनी कसे केले असेल यावर वैद्यकीय मित्रांबरोबर बोलून काही बातमी कळाल्यानंतर सांगतो. नाहीतरी हल्ली वैद्यकीय खर्च खुपच वाढलाय. जर पोटाचे आप्रेशन घरच्या घरीच करता आले तर तेव्हढेच पैसे वाचतील. असा एक विचार.....


अगदी  सोपे आहे हो... पोटाला एक झिप चेन बसवून घ्यायची .

मग अगदी रोज म्हणालात तरी जमेल.

इच्छा असेल ते हादडायचे. ते झाल्यावर झीप उघडून नको असेल ते काढून टाकायचे.

  फक्त झिप चेन बिघडू नये याची काळजी घ्यायची. नाही तर नको असेल तेंव्हा अचानक आ वासून घोटाळा करायची.


एके काळी दर्जेदार साहीत्य आणी हीरीरीने होणाऱ्या चर्चांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिपावर हे असले दळभद्री लेख वाचुन 'ड्वाले पानावले'.


In reply to by नेत्रेश

ते निदान लिहीत तरी आहेत. गेल्या १८ वर्षात तुम्ही  फक्त १० लेख लिहीले आहेत. त्यातला शेवटचा २०२० मधे लिहीला आहे.

मिपावरच्या लेखांचा दर्जा ही लेखकांमुळे टिकतो.  आपला एक अत्यंत दर्जेदार लेख या इथे आहे.काला कोट चोर.... | मिसळपाव