Skip to main content

अंधश्रद्धा

वेड्या आईची वेडी माया

लेखक ताजे प्रेत यांनी शनिवार, 25/04/2026 16:49 या दिवशी प्रकाशित केले.

आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा.


खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता .
रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता


पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते 
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची. डॉक्टरांनी हे बरे होणार नाही, हे  वाढतच जाणार असे म्हटले

डिजिटल चक्रव्यूह

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

आदल्या दिवशी दुपारची वेळ. स्वरालीचा फोन वाजला. पलीकडून रोहनचा मद्याच्या नशेतला आणि विकृत हसण्याचा आवाज आला.

"ऐक भिकारडे, उद्या कोर्टात काय होतंय बघच तू. तुला घटस्फोट देताना अक्षरशः रस्त्यावर आणेन. माझा वकील ॲडव्होकेट हंबीरराव आहे. तो आजवर एकही केस हरला नाहीये, त्याने सगळ्या न्यायाधीशांना पैशाने खिशात टाकलंय. पोटगीचे १५-२० लाख तोंडावर फेकेन आणि माझा अंश तुझ्याकडून कायमचा हिरावून घेईन. आणि हा... जास्त शहाणपणा केलास ना, तर 'चिन्मय भाई' तुझा कायमचा गेम करील!" रोहन बीभत्सपणे हसला आणि त्याने फोन कट केला.

सावलीतले रक्षक

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये राहुल एका प्रतिष्ठित कंपनीत 'सिस्टीम आर्किटेक्ट' म्हणून काम करत होता. त्याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्याला आता लवकरात लवकर 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून प्रमोशन हवे होते. पण त्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता त्याचा बॉस, राजेश सिन्हा. राजेश मूळचा बिहारचा होता, कडक स्वभावाचा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी. तो राहुलला सतत कामाचा त्रास द्यायचा.

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे - अनिल अवचट

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 19/04/2020 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे' अनिल अवचट प्रास्ताविक- (अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 17/07/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले.

अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 20/06/2018 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान सचिन तेंडुलकर आपल्या डाव्या पायाला पॅड आधी बांधतो, मग उजव्या पायाला, राहुल द्रविड़ मैदानात शिरताना नेहमी उजव पाऊल आधी टाकतो. सुनील गावसकर फलंदाजीसाठी मैदानात उतरताना न चुकता जोडीदाराच्या उजवीकडून चालत असे. सौरभ गांगुली नेहमी आपल्या गुरूचा फोटो खिशात ठेवून खेळायला येत असे आणि स्टीव्ह व आपल्या डाव्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेला काल हातरुमाल ठेवत असे. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे उघडच आहे. पण त्या त्या खेळाडूच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व आहे.

बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट

लेखक पुंबा यांनी शुक्रवार, 22/12/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्‍याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे.