Skip to main content

(तेढ्या आईची तेढी माया )......

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 26/04/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा  वेड्या आईची वेडी माया | मिसळपाव

आई मेली तर बरे होईल ;माझी! असे मोहन म्हणायचा.

खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून  इतक्या दूर अंड्रोमिडा गैल्क्सीत आला होता .
मोहन -  भूर्जपत्रे आणि पाली लीपी या विषयात तज्ञ असलेला   असा इंजिनिअर  होता त्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता

पण त्याची आई - ती जरा सामान्य होती आणि तिचे सामान्यत्व वाढतच चालले होते. मोहनला जेंव्हा मटर उसळ हवी असायची तेंव्हा ती नेमकी खोया मटार करायची. त्याला डब्यात जेंव्हा पोहे हवे असायचे तेंव्हा ती नेमकी पोळी भाजी द्यायची
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं हे वागणे त्याला   त्याला त्रासदायक वाटू लागलं,  त्याच्या मित्राना आईच्या हातची भाजी खूप आवडायची  म्हणून ते घरी यायचे. आणि घरी येवून स्वैपाकाचे कौतूक करत  मस्त गप्प्पा हाणायचे.  भविष्यातील तंत्रज्ञनाबद्दल बोलायचे . यामुळे मोहनला होणारा गोंधळ थकवणारा वाटू लागला  नव्या नव्या तंत्रज्ञनाची  नावं पाठ करायची , नवे शब्द शोधायची, मोहनला जळवायची,  मोहनला हे शब्द पाली भाषेत कधीच मिळायचे नाहीत. यात भर म्हणजे ती म्हणायची की भूर्ज पत्रांशी बोलायची. कधी कधी तीला तपासायला येणाऱ्या डॉक्क्टराना   शस्त्रक्रिया  कशी करायची हे प्रात्यक्षीक देऊन शिकवायची.डॉक्टर म्हणायचे की   हे  वाढतच जाणार  
एक संध्याकाळी, तिने त्याला त्याच्या दिवंगत वडिलांसारखं दोन पेग मारून “चखणा कधी येणार?” असं  मोहनला विचारलं,  त्यामुळे  मोहन सटकला. 
“हे फार झाले हे . मला आता हे जमणार नाही,” तो म्हणाला, पाली भाषेत चखणा याला शब्द दिलेला नाहीय्ये. त्यामुळे चखणा ही गोषट आस्तित्वातच नाहिय्ये.  असे मोहनचे म्हणणे पडले.

तिने वाद घातला नाही. फक्त मान हलवली, जणू हा क्षण तिला आधीपासूनच माहीत होता.
“ठीक आहे,” ती हळूच म्हणाली. “एक ना एक दिवस तू चखणा बनवायला शिकशील.फक्त… भूर्ज पत्रे  विसरू नकोस.”

मोहनला एके ठिकाणी नोकरीचा प्रस्ताव आला. ऐंड्रोमिडा गैलेक्सीत३ मधील "फायटो३"" ताऱ्याच्या आठव्या ग्रहाच्या कडांवर वसलेल्या ""निंद्रामसीया" या लघुग्रहावरच्या  कमिंद्रामिपा गावात नगरपालिका चतूर्थ पतश्रेणी कर्मचाऱ्यांच्या  पतसंस्थेत एका व्यवस्थापकाची गरज होती. त्याना खातेदारानी स्वाक्षरी केलेली  काही भूर्जपत्रे सापडली होती त्यानुसार हप्ते थकलेल्या खातेदारांकडून वसुली करण्यासाठी मनुश्य हवा होता. मोहन त्या नोकरीच्या  ठिकाणी दाखल झाला

नवी नोकरी, नवीन घर, नवीन लोक. तेथे चखन्याच्या   वासासारखं काहीच नव्हतं, जुन्या आठवणींसारखं नव्हतं.  कोणी विचारले नाही तरी लोकांना तो सांगायचा की ती आई वडील गेले आहेत.  तसेही कोणी त्याला फार विचारत नव्हते

काही वर्षांनीआकाश गंगेतल्या  एका जुन्या मित्राबरोबर थोडा संपर्क होता , त्याचा  फोन आला. ती शांतपणे हॉस्पिटलमध्ये होती पण तेथून पळून गेली — कोणताही नाट्य नाही, शेवटचे शब्द नाहीत — तिथल्या डॉक्टरांनी एक चुकीची शस्त्रक्रीया केली म्हणून डॉक्टर पळून गेले होते. ती त्यांचाा गुडघा बदलण्यासाठी त्यांच्या मागावर गेली होती . सही म्हणून तीने फक्त मॉनिटरवरील एक सरळ रेषा दाखवली होती..

 मोहन  आकाशगंगेत परत आला, कारण कागदोपत्री काम होतं. तिच्या सगळ्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये मावल्या: एक शाल, बंद पडलेलं   MacBook Neo २२९"   with A३६८ Pro chip: Built for सुपर ए आय  ऐपल  सुपर इन्टेलिजन्स, लिक्वीड रेटीना डिस्प्ले.८४ टी बी युनिफाईड  मेमरी , आणि ३५०के  टी बी   स्टोरेज , आणि जाड वैद्यकीय फाइल. तो फाइल उघडणारच नव्हता. मैकबुकचा पासवर्ड आई  ने एका  लॉकर मधे भूर्जपत्रावर लिहून ठेवला होता. तसाही तो त्याला हात लावणार नव्हता. पण त्या सोबत आत  एक  संमतीपत्र होतं — अनेक वर्षांपूर्वीचं — तिच्या मॉनिटरवरच्या सहीसह, डॉक्टरांच्या सहीसह. 
प्रायोगिक गुडघा ट्रान्सप्लांट. गुडघागुडघ्याची  अदलाबदली विषयावरची  अशी अनेक कागदपत्रे होते आणि त्यात त्याचे नाव होते अनेक कायदेशीर कागद आणि त्यावर आईच्या  मॉनिटरवरच्या सह्या आणि वाचता वाचता त्याला कळले कि लहान असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झालेली आणि तो वेडा होणार हे नक्की होते 

मोहनचे आजोबा ऑर्थोपेडिक सर्जन होते ,   ते मेंदूचे  ऑपरेशन करायचे पण ते बरेच उचापती होते , संशोधन करायचे .  संशोधन करताना त्याना अनेक लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो  हे सिद्ध केले होते. एकदा तर स्वतःच स्वतःचे पोटाचे ऑपरेशन त्यांनी केले होते. ते करताना त्यानी एक नवीन शोध लावला होता. पोटाला जर झिप चेन बसवली तर मानव हवे तेवढे खाउ शकेल. कितीही हादडा , खाऊन झाले की चेन उघडा आणि पोट रिकामे करा. कधी कधी झिप चेन झाकूनही  अचानक उघडी पडायची  मग ते ज्याचे पोट असे त्याला उघड्या पोटानेच फिरावे लागायचे किंवा मग  झिप चेन उघडलीच जायची नाही . असे  अपवादात्मक प्रॉब्लेम्स सोडले तर हे संशोधन जगन्मान्य झाले होते.

 या विषयावर त्याना विश्वप्रवक्ते पदा कडून नोबेल मिळाले होते. विश्वप्रवक्ते नेहमी म्हणायचे की डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला अधीक नॉलेज असते. तेंव्हा पासून कम्पौंडर च्या कोर्सची फी कित्येक पटीन वाढूनही ऐडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या.

 त्यांनी पर्याय मांडला नातवाचे आणि सुनेच्या गुडघ्याची अदलाबदली करायची आणि सुनेला खोटे सांगितले कि तू कंट्रोल मध्ये राहशील आणि मुलगा ठीक होईल गुडघ्याचीगुडघा ट्रान्सप्लांट सहजपणे छोट्या हॉस्पिटल मध्येही होतो पण त्यावेळी ती फारच मोठी गोष्ट होती .  

पण मुलगा अति हुशार झालाच पण सुनेची बुद्धी ही   वाढत गेली. त्या धक्क्काने आधी मोहनचे आजोबा आणि मग वडील गेले.

मुला मी तुझ्यासाठी बरीच संपत्ती साठवली आहे. त्यामुळै तुला कधीच भूर्जपत्रे वाचावी लागणार नाहीत.  ती सगळी संपत्ती मी कमिंद्रामिपा गावात नगरपालिका चतूर्थ  श्रेणी कर्मचारी पत संस्थेत क्रिप्टो करन्सी मधे ठेवली आहे. मात्र त्याचा पासवर्ड शोधावाच लागेल.

मोहन ने हे वाचून भूर्जपत्रावर लिहीलेला पासवर्ड वाचायचा   प्रयत्न केला.  तो आईने खरोष्टी लिपीत लिहीला होता. त्यात लिहीले होते की  तू   चखणा विसरलास पण मी नाही विसरले.  माझ्या  मैकबुकचा पासवर्ड आहे खारी बुंदीचा चखणा कशाबरोबर खातात  त्या द्रव पदार्थाचे नाव.

मोहन ने बऱ्याच द्रव पदार्थांची नावे आठवून पाहिली ब्लैक लेबल, ब्लु लेबल , ग्लेन फिडीच ,  ग्लेन मोरांजी , अमृत सिंगल मालट , बॉम्बे सफायर , इव्हान हिल केंटकी, बेल्ल्स, निक्का,रेडब्रेसट,जैक डैनियल्स , हायलैंड पार्क ,यामाझाकी सिंगल मालट ,मेकर्स मार्क , 

जगभरातल्या सगळ्या ब्रांडची नावे देऊन झाली कंप्यूटर पंधराव्या नावानंतर कायमचा लॉक होणार होता.

मोहन ने खूप विचार केला आणी एक नाव आठवून टाईप केले " देशी भिंगरी संत्रा", ते आईचे  रोजचे आवडते  पेय होते.

हे टाईप केल्या वर लैपटॉप एकदम सुरू झाला. समोर एक हसणारी स्मायली आली.

ती ऐनिमेटेड स्मायली मोठ्याने म्हणाली :  मला माहीत होते हे तुला येईल म्हणून. पण आता    क्रिप्टोचा खाते नंबर मिळण्यासाठी  तुला आणखी एक पासवर्ड टाईप करावा लागेलः हा पासवर्ड हरियाणामधील एका प्रसिद्ध  पेयाचे नाव आहे.

मोहन ने हे नाव आठवायचा बराच प्रयत्न केल. पण त्याला ते आठवेना. कंप्यूटरचा तो निळा स्क्रीन   सक्रीय  होणे बंद झाले.

आईची हुशारी  आठवून मोहन धाय मोकलून रडायला लागला.
तो आयुष्यभर आता रडणार होता  .

तुम्हाला आठवत असेल तर मोहनला मदत करा अन्यथा त्या अभावी  अगदी जवळ असूनही हक्काची संपत्ती गमवावी लागेल

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 253
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मोहन ने खूप विचार केला आणी एक नाव आठवून टाईप केले "भिंगरी संत्रा"

हे टाईप केल्या वर लैपटॉप एकदम सुरू झाला. समोर एक हसणारी स्मायली आली.

ती ऐनिमेटेड स्मायली मोठ्याने म्हणाली :  मला माहीत होते हे तुला येईल म्हणून. पण आता    क्रिप्टोचा खाते नंबर मिळण्यासाठी  तुला आणखी एक पासवर्ड टाईप करावा लागेलः हा पासवर्ड हरियाणामधील एका प्रसिद्ध  पेयाचे नाव आहे.

मोहन ने हे नाव आठवायचा बराच प्रयत्न केल. पण त्याला ते आठवेना. कंप्यूटरचा तो निळा स्क्रीन   सक्रीय  होणे बंद झाले.

आईची हुशारी  आठवून मोहन धाय मोकलून रडायला लागला.
तो आयुष्यभर आता रडणार होता  .

तुम्हाला आठवत असेल तर मोहनला मदत करा अन्यथा त्या अभावी  अगदी जवळ असूनही हक्काची संपत्ती गमवावी लागेल

हा पासवर्ड हरियाणामधील एका प्रसिद्ध पेयाचे नाव आहे ... तुम्हाला आठवत असेल तर मोहनला मदत करा...

आं, आमी नाइ सांगनाल आसं, आदी तुमी सांगा आमाला कूप चकना देनाल मनुन!

लस्सी? किवा शिकंजी?

मिळुदे रोहन ला त्याच्या हक्काची संपत्ती क्रिप्टो मध्ये. पण एक शंका--माझा सी ए म्हण्तो क्रिप्टो तील फायद्यावर सरसकट ३०% टॅक्स लागेल. यातुन वाचायचा रोहनकडे काही उपाय आहे का? म्हणजे त्या पतसंस्थेत खाते वगैरे उघडायला लागले तरीपण चालेल. हळुहळु काढुन घेता येतील पैसे. पण गुढघ्याची स्मृती वगैरे गेली तर मोठाच प्रॉब्लेम व्हायचा, म्हणजे काही वर्षांनी सगळेच विसरले तर कुठेतरी बॅक अप पाहीजे ना? 

मोहन  चिंताग्रस्त होता.एवढी मोठी संपत्ती कशी सोडून द्यायची?त्याने आईची लोखंडी ट्रंक उघडली. पुन्हा एकदा शोधाशोध सुरू केली.  बराचवेळ खालीवर करत होता पण काही सापडत नव्हते. 

संध्याकाळ  होत आली होती. वैतागून  काही पेय मिळते तर बघू म्हणून उभा राहीला.मांडी खाली एक श्वेत श्याम,जिर्ण अवस्थेतला फाटका तुटका, काहीसा धूसर झालेला त्याला फोटो दिसला. स्काॅचचा पटियाली भरला व फोटोकडे एकटक बघू लागला.फोटोतले आजी आजोबा आणी आई  त्याने पटकन ओळखले पण बाकीचे कोण असावेत यावर विचार  करू लागला.तीन चार पटियाला स्काॅच आणी आकाशगंगेतल्या जुन्या मित्राने पाठवलेले प्लेटभरून जुने खारे काबू (जुन्या अंबेमोहोर तांदळ सारखे) (काजू+बदाम बियांपासून तयार केलेले परग्रहावरील संकरीत फळ) पोटात  रिचवल्या नंतर पुन्हा मोहनचा तल्लख मेंदू सक्रिय झाला व आठवले  की आई शेजारी बसलेला त्याचा दूरचा ताया  जो हरियाणातल्या चरसी-पादरी मधे युनानीचा वैद्य होता. खलमकडा, शिलाजित ने दुर्धर रोग बरे करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याला नक्कीच  काहीतरी माहिती असेल असा विचार डोक्यात चमकून गेला.मोहनची बेचैनी कमी झाली. त्याने लगेच शेअर भिंडीगो एअर लाईन्सचे टिकीट बुक करण्यासाठी नेपच्यून वरील आपल्या असिस्टंटला सांगितले व आणखीन  एक पटियाला घेऊन निपचित (निश्चिंत) पडला.

 इतक्या वर्षानंतर ताया जिवंत असेल का? मोहनला तो ओळखेल का? मोहन पासवर्ड आणी पर्यायाने संपत्ती मिळवण्यात  यशस्वी होईल का? असे एक ना अनेक प्रश्न सुजाण  वाचकांना पडतील.......उत्तरासाठी एटीपी चॅनेल जरूर लाईक्स करा,सबस्क्राईब करा, घंटा.......... हालवायला विसरू नका....

ता. क.- तिसमारखा नावाचा ब्लाॅकबस्टर चित्रपट मोहनने बघीतला असेल काय!!!!!

तायाला पासवर्ड माहीत असेल काय? तायाला अल्झायमर झाला असेल तर पासवर्ड कसा मिळेल!!!!!!

विजुभाऊ कथा रोचक आणी ब्लाकबस्टर आहे. चटरिना आणी रक्षक कुमार  यांच्या तारखा मिळतील.  फायनान्स कराल काय🤔🤪

In reply to by कर्नलतपस्वी

खलमकडा एक वनौषधी जी कलियुगात संजीवनी बुटी चे काम करते.  तीकडे दुर उत्तरेकडे म्हणतात की इतकी परिणामकारक आहे की

"खलमकडा, खलमकडा.....

रानी को छोड बांदी को पकडा...."

मिपा वयस्क झाले आहे,वयस्कर नाही याची नोंद घ्यावी. ह. घ्या.