इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना.
किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती.
त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय?
आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणार्यासारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं !
इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे.
एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का?
बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच.
War ‘वॅर’ नव्हे, वॉर.
Son सॉन नव्हे, सन.
‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ.
तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ.
One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक !
Know - सुरवातीला k लावायचा, शेवटी w लावायचा. का ? वेळगंमत म्हणून ?
उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा?
या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही?
थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!”
असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी?
मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो.
सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती.
इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”.
“नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच 'हळुवारपणे'. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणा शिक्षकाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे."
आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ?
जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली.
दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.”
हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल.
आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला आनायला अन् रामायन घडलं.
सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला.
तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत !
वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? गेलो असतो सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात !
वाचने
46972
वाचनखूण
प्रतिक्रिया
91
मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला
In reply to मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला by माहितगार
+१
[अवांतरः “‘I am’ is reportedly the shortest sentence in the English language. Could it be that ‘I do’ is the longest sentence?”]
In reply to +१ by बहुगुणी
कविता मस्तच आहे :)
In reply to +१ by बहुगुणी
आय डू इज द लाँगेस्ट सेन्टेन्स!
In reply to +१ by बहुगुणी
अवांतर मस्तं आहे =))
In reply to +१ by बहुगुणी
हाहा.. तल्लख बुद्धीमान
In reply to +१ by बहुगुणी
:)
मुळचे पुण्याचे असलेल्या गोडबोल्यांनी……
चुपके चुपके मधल्या धर्मेंद्रला
In reply to चुपके चुपके मधल्या धर्मेंद्रला by बोका-ए-आझम
@बोका प्रतिसादातील तुमचे
In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार
तो एक वाक्प्रचार आहे मा.गा.
In reply to @बोका प्रतिसादातील तुमचे by माहितगार
माहितगार सर - ही खालची लिंक वाचावी.
भारी लेख !!
छान लिहिलंय :) फार त्रासदायक
फीश आणि घोटी
त्याचे कारण म्हणजे जशी आत्ता
मस्त लेख. आवडला
कालच लहान मुलानी शिकवल
इंग्रजी शिकतांना सुरुवातीला हा त्रास झाला
पुलंच 'फ़िख्याडली'
सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग
In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन
हे सगळे इंग्रज जगभर
In reply to सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग by बॅटमॅन
हा काय प्रकार आहे?
In reply to हा काय प्रकार आहे? by बोका-ए-आझम
बॅटमणा
हॅ हॅ हॅ..खुसखुशीत.
In reply to हॅ हॅ हॅ..खुसखुशीत. by गवि
एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला
In reply to एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला by अस्वस्थामा
vine म्हणजे वेल ना?
कळस म्हणजे निःशब्द (silent)
मस्त लिहिले आहे
मस्तं खुसखुशीत लेख !
In reply to मस्तं खुसखुशीत लेख ! by डॉ सुहास म्हात्रे
फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
सहमत
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
फ्रेंच उच्चार नियम
In reply to फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि by सूड
+१
हाहाहा!
25-maps-that-explain-english
सर्वजण,
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
नायतर काय..
लेख आवडला..
लेख आवडला. "स्वीट टॉल्केर" .
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड
In reply to व्हॉट्सअॅप फॉरवर्ड by गॅरी ट्रुमन
अहो, आपल्या मराठीत क्रियापदे
डोस्क्याचा मासळीबाजार ....
In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान
केविन ब्रिजेस नावाचा एक
In reply to डोस्क्याचा मासळीबाजार .... by गामा पैलवान
पार भुस्काट झालय डोक्याच.
In reply to पार भुस्काट झालय डोक्याच. by मयुरेश फडके
महाराष्ट्रात ३०७ हजार चौ किमी
डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
+१
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
+१११११११११११११११११११११११११
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
फ्रेंच शब्दांचे उच्चार
In reply to फ्रेंच शब्दांचे उच्चार by डॉ सुहास म्हात्रे
डच भाषाही तशीच आहे, एक्दम
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
दोन्ही पश्चिम जर्मेनिक
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
चेक पण फोनेटिक
In reply to डच भाषाही तशीच आहे, एक्दम by बॅटमॅन
डच भाषाही तशीच आहे
In reply to डच भाषाही तशीच आहे by होबासराव
J चा उच्चार य ?
In reply to डच भाषाही तशीच आहे by होबासराव
जर्मनमध्ये...
In reply to जर्मनमध्ये... by डॉ सुहास म्हात्रे
डच भाषा
In reply to डच भाषा by मैत्र
g = ख़, तो घसा खरवडलेला ख.
In reply to डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या by नंदन
न चा ल
In reply to न चा ल by गामा पैलवान
स्थानिक नावांची इंग्रजांनी
In reply to स्थानिक नावांची इंग्रजांनी by डॉ सुहास म्हात्रे
खडकीचे नाव जरी kirkee केले
In reply to न चा ल by गामा पैलवान
'ए'चा 'आ'
मस्त धागा व प्रतिसादही
मस्त लेख आणि प्रतिसाद. मजा
अप्रतिम चिंध्या फाडल्यात
लेख छान, नंदनचा प्रतिसाद
सर्वजण,
यावर विं दा करंदिकरांची कविता
गोंधळ
In reply to गोंधळ by रॉजरमूर
बेळगांव इत्यादि
OK चे दिर्घरूप,स्पेलिंग व
रॉजर मूर - तुम्ही म्हणता ते
मार्मिक गोडसे - मी शिकलो होतो
मस्त..
बर्नार्ड शॉ आणि इतर काही
लेख आवडला. खुसखुशीत लिहिलंय.
In reply to लेख आवडला. खुसखुशीत लिहिलंय. by मधुरा देशपांडे
लांबलचक जर्मन शब्द
In reply to लांबलचक जर्मन शब्द by गॅरी ट्रुमन
मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी
मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पाठवला होता.अश्या शाब्दीक वेल्डिंगबाबतीत जर्मनचे संस्कृत भाषेशी खूप साम्य आहे. :) हे लांबलचक शब्द म्हणजे समास असतात... Freund + schafts + bezeigungen = friend + ship / ly + relation = मित्रत्वाचे नाते. त्यातल्या मूळ शब्दांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.In reply to मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी by डॉ सुहास म्हात्रे
पटले
In reply to मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी by डॉ सुहास म्हात्रे
हो बरोबर आहे, असं करून अर्थ
In reply to हो बरोबर आहे, असं करून अर्थ by मधुरा देशपांडे
अन्य भाषांच्या तुलनेत जर्मन
In reply to अन्य भाषांच्या तुलनेत जर्मन by बॅटमॅन
येस्स. हेच ते व्हिडिओ. याचा
In reply to येस्स. हेच ते व्हिडिओ. याचा by मधुरा देशपांडे
:)
आणखीन एक प्रश्न
इंग्रजी भाषेत स्वतःचे असे
In reply to इंग्रजी भाषेत स्वतःचे असे by प्रमोद देर्देकर
राजीव दिक्षित
In reply to राजीव दिक्षित by गॅरी ट्रुमन
अहो खुद्द तमिळमध्येही अनेक
In reply to अहो खुद्द तमिळमध्येही अनेक by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to इंग्रजी भाषेत स्वतःचे असे by प्रमोद देर्देकर
दक्षिण अमेरिकेतली लॅटिन!