✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

च
चतुरंग यांनी
Tue, 11/18/2014 - 17:29  ·  लेख
लेख
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत. आज त्याने १ गुण मिळवूण बरोबरी केली की सामना पुन्हा पूर्ण खुला होईल आणि मग पुढल्या दोन पांढर्‍या पैकी एकत्री जिंकून आणि उरलेल्या दोन काळ्या डावाअत बरोबरी करुन स्पर्धा जिंकता येईल. अर्थात हे म्हणणे सोपे आणि घडवून आणणे महाकठिण आहे. बघूयात आज आनंद कोणती सुरुवात करतो ?

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
6802 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा

चतुरंग
Tue, 11/18/2014 - 17:34 नवीन
डी ४ ने सुरुवात झाली. दोघेही अजून थिअरीत आहेत. ३ -३ मिनिटात ८ खेळ्या झाल्यात.
  • Log in or register to post comments

मॅग्नुसने नववी आणि दहावी खेळी

चतुरंग
Tue, 11/18/2014 - 17:52 नवीन
जरा वेगळी करुन आनंदला विचारात पाडले आहे. आनंद आता शार्प पोझीशन कशी टिकवता येईल याच्या विचारात आहे. कारण तीच जिंकण्याची संधी आहे.
  • Log in or register to post comments

अरे काय पोझीशन ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/18/2014 - 18:13 नवीन
आनंद जिंकला पाहिजे.... उगाच चुका करु नको भो. आज जिंकण्यासाठी खेळ भो... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कार्लसनपेक्षा जास्त वेळ

आतिवास
Tue, 11/18/2014 - 18:21 नवीन
कार्लसनपेक्षा जास्त वेळ लागतोय आनंदला प्रत्येक डावात!
  • Log in or register to post comments

आज जिंकायलाच हवा आनंद !

प्रसाद गोडबोले
Tue, 11/18/2014 - 18:26 नवीन
आज जिंकायलाच हवा आनंद !
  • Log in or register to post comments

आनंदच्या काळ्या घरातील उंटाने

मोदक
Tue, 11/18/2014 - 18:38 नवीन
आनंदच्या काळ्या घरातील उंटाने घोडा मारून आणि नंतर वजीर उंटाच्या जोरावर मॅग्नुसच्या राजाजवळ जाणे शक्य आहे का..?
  • Log in or register to post comments

डावावर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/18/2014 - 18:47 नवीन
आनंदची डावावर पकड़च नै असे वाटत राहते. वेळ कमी आहे कर बाबा आक्रमण जरा. उग चिवट खेळतो आणि डाव निसटुन जातो.
  • Log in or register to post comments

जवळ जवळ

सुजित पवार
Tue, 11/18/2014 - 18:50 नवीन
१ तासाने आनन्द मागे आहे...असे नेह्मिच कसे होत आहे?
  • Log in or register to post comments

वेळेच्या बाबतीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/18/2014 - 18:55 नवीन
वेळ खुप कमी राहतोय आणि मग चूक करुन बसतो आणि मग एक तर डाव बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय नै तर पराभवाचा सामना करावा लागतोय. काय गणित असतील त्यांचे देव जाणो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित पवार

अत्ता काय झाले?

सुजित पवार
Tue, 11/18/2014 - 18:58 नवीन
आनन्द चा घोडा कसा मेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही तोच प्रश्न पडला होता.

आनंद
Tue, 11/18/2014 - 18:51 नवीन
मलाही तोच प्रश्न पडला होता. QH7+ KF8 व QH8+ अस होवु शकल नसत का?
  • Log in or register to post comments

लक्षात आल ,. काही फायदा नसता

आनंद
Tue, 11/18/2014 - 18:58 नवीन
लक्षात आल ,. काही फायदा नसता झाला.
  • Log in or register to post comments

का..?

मोदक
Tue, 11/18/2014 - 19:01 नवीन
का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

आनन्द चा घोडा

सुजित पवार
Tue, 11/18/2014 - 19:02 नवीन
कसा मेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

छ्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/18/2014 - 19:31 नवीन
काय चाललंय राव हे.. नुसती मारामारी. सेम पोझीशन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झाला ड्रॉ

प्रसाद गोडबोले
Tue, 11/18/2014 - 19:47 नवीन
झाला ड्रॉ :( आनंदभाऊ , आता परत बाऊन्स ब्यॅक कधी करणार ? :(
  • Log in or register to post comments

ड्रॉ झालापण??

आदूबाळ
Tue, 11/18/2014 - 19:51 नवीन
ड्रॉ झालापण??
  • Log in or register to post comments

अजून नाही; पण तीच शक्यता

आतिवास
Tue, 11/18/2014 - 19:53 नवीन
अजून नाही; पण तीच शक्यता दिसतेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ड्रॉ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/18/2014 - 20:32 नवीन
रटाळ सामना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ब्वॉर्र, ड्रॉ तर ड्रॉ. पण

बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 21:11 नवीन
ब्वॉर्र, ड्रॉ तर ड्रॉ. पण स्कोर काय झाला शेवटी?
  • Log in or register to post comments

छ्या..

रामपुरी
Tue, 11/18/2014 - 21:19 नवीन
मज्जा नाही आली
  • Log in or register to post comments

ह्म्म!

चतुरंग
Tue, 11/18/2014 - 22:04 नवीन
आजचा डाव नीरस झाला. स्कोर ४.५ वि ३.५ मी काल म्हंटले तसे आनंदची इतकी शक्ती कालच्या साडेसहा तास चाललेल्या डावाने काढून घेतली की आज तो तितकासा आक्रमक राहू शकला नाही ही एक शक्यता आहेच. त्याशिवाय आनंदनेही आज काही गोष्टी चाचपून बघितल्या असाव्यात. आज मॅग्नुस ज्या वेगाने खेळत होता त्यावरुन त्याने सिसिलिअन आणि क्वीन्स मधली बरीच वेरिएशन्स शेवटपर्यंत खेळून बघितलेली आहेत हे आनंदला समजले आहे. उद्या विश्रांतीचा दिवस आहे. परवा काळ्या मोहोर्‍यांनी खेळताना बरोबरी करायची आणि दहावा डाव जिंकायचा असा प्लॅन करावा लागणार. बाकी तयारी आणि स्टॅमिना या दोन्ही बाबतीत मॅग्नुस वरचढ दिसतोच आहे. त्यामुळे आता आनंदला धक्का तंत्र वापरणे जरुरीचे आहे. दहाव्या आणि बाराव्या डावात वेगळे ओपनिंग खेळायची तयारी आनंदने करावी अशी अपेक्षा आहे. कारण त्याशिवाय ही कोंडी फुटणे अवघड दिसते आहे!
  • Log in or register to post comments

कुठेतरी

vikramaditya
Tue, 11/18/2014 - 22:13 नवीन
वयातील अंतर आनंदला भारी पडत असावे आणि त्याची दमछाक होत असावी. आमचा आपला एक अंदाज. बाकी तज्ञ सांगतीलच. काही म्हणा "उम्र का तकाजा है"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा