आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
दुसर्या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल.
आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे.
एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत.
शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो. नियमानुसार पुढचा निम्मा सामना सुरु होताना मोहोर्याच्या रंगांची आदलाबदल होते त्यामुळे पुन्हा सातव्या डावातही आनंदची मोहोरी काळीच असणार आहेत!
त्यामुळे आजचा डाव जिंकणे त्यानंतर ६ आणि ७ हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे हे आनंदसाठी अतिशय चांगले ठरेल.
कारण त्यापुढच्या पाच डावात आनंदकडे ३ वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत.
याउलट मॅग्नुसचा मनसुबा आजचा डाव बरोबरीत सोडवून पुढचे दोन्ही डाव, किमान एकतरी, जिंकणे असा असणार आहे.
त्यामुळे ५, ६ आणि ७ हे तीनही डाव अतिशय निकराने लढले जाणार आहेत यात शंका नाही!
गेल्या स्पर्धेच्या वेळी आनंद पाचवा डाव हरला आणि त्यानंतर त्याची आत्मविश्वास पातळी इतकी खालावली की तो त्या मानसिकतेतून वरती येऊ शकलाच नाही. यावेळी तसे दिसत तरी नाहीये. त्यामुळे आनंद आज आक्रमक असणार. पुन्हा
एकदा डी४ आणि शार्प वेरिएशन बघायला मिळणार का आणखीन काही धक्कादायक?
दहाच मिनिटात डाव सुरु होतोय, चला बघूयात!
Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दोघे पटावरती
क्वीन्स इंडियन
पट कोण टाकतंय धाग्यात?
AK 5
(No subject)
डाव एकदमच
डावात स्थिती समसमान आहे
आनंदला
कार्लसननं वजीर एफ-३ खेळून
तरी पण सध्या डाव आनंदकडे
कार्लसनची मोहरी जास्त पोटेंशियल व्यापून आहेत
ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच
येस!
हत्ती-डी१!
वजिर गेले..
बरोबरीकडे वाटचाल.
पण हे सगळे इंडिकेटर्स
गेमवर आता कार्लसनचं नियंत्रण आहे!
ही कमेंट वाचण्यासारखी आहे
संक्षी
आयला,
आता खरी मजा आहे.. प्रत्यक्ष
आनंद येवढा वेळ का घेतोय !
टाइम
ड्रॉ..??
ड्रॉ?
ड्रॉ?
ड्रॉ झाला....
आनंदनं चांगला अॅडवांटेज घालवला!
!
धन्यवाद