माझे सदस्यत्व .................
लेखनप्रकार
नमस्कार .....
मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद.........
माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........
आपली नम्र
मृण्मयी दीक्षित
वाचने
7839
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच सुरू सक्रीय होते हो.. कदाचित ईतका काळ संयम ठेवून वाट पाहू शकणारेच खरेखुरे मराठीप्रेमी असतील व ते ईथे 'टाईमपास' करायला येणार नाहीत असा संपादक मंडळींचा होरा असावा व ते खरेही असेल.. असो, मिपावर तुमचे मनापासून स्वागत...
आभार
माझेही सदस्यत्व खूपच उशिरा चालू झाले. मला वाटले, आता नवीन सदस्य घेत नाहीत. परवा अनपेक्षित असताना मिळाले एकदाचे!
In reply to मला पण! by रुपी
आभार पण कारण काय ते समाजात नाही
आपण सगळे एकाच 'लॉट' चे का? ;)
In reply to आपण सगळे एकाच 'लॉट' चे का? by अनिल २७
हो
माझाही असाच आनुभव आहे. मी तर आशाच सोडुन दिली होती
आमीबी नविनच है हित
हिन्दुराव
उशीरापर्यंत वाट बघायला लावुन मिपा सदस्याची 'सहनशक्ती' वाढवत्,म्हणजे उद्या इथल्या लोकांची नाटकं सहन करता यावीत.
नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर स्वागत आणि येथिल वावरासाठी शुभेच्छा!!!
तुम्हाला आणि एकंदरीतच इतर नवसदस्यांना सदस्यत्व मंजूर होण्यासाठी थांबावे लागले यासाठी मिपाव्यवस्थापनाला खेद आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे असे घडले. यापुढे नवीन सदस्यांचे सदस्यत्व लवकरात लवकर चालू होईल याबद्दल व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.
In reply to नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर by संपादक मंडळ
आपण समोर येऊन बोललात त्यातच सर्व काही आले. आपले धन्यवाद.
त्याचं काये, प्रत्येक जणीचे दिवस भरायचे दिवस वेगवेगळे असतात पण डॉक्टर एकाच दिवशी सिझेरीन करतात अन मग सगळ्यांचा जन्म एकाच तारखेला होतो.
फुल टायम डुटी करनारा डाक्टर भर्ती व्हायाचा हाय नव्हं. म्हुन ही तकलीप. पुढच्या खेपेला कळ नाय काढाया लागनार.
In reply to त्याचं काये, प्रत्येक जणीचे by पाषाणभेद
हा प्रतिसाद उडवण्यायोग्य आहे का?
In reply to हा प्रतिसाद उडवण्यायोग्य आहे by नितिन थत्ते
नाही. हा प्रतिसाद उडवण्यायोग्य नाही.
मला वाटतं एक बॅच फाईल बनवून ठेवल्येय. ठराविक दिवसांनी रन करतात. आपुण बी बरेच म्हैणे थांबलो होतो.
राम राम ,
अखेर प्रवेश दिलिया बद्द्ल आभारि आहे.
नाही बॉ. आम्हाला तर लगेच प्रवेश मिळाला होता.
In reply to नाही बॉ. आम्हाला तर लगेच by llपुण्याचे पेशवेll
तेव्हाची गोष्ट वेगळी होती.... आता सीईटी द्यावी लागते.
In reply to तेव्हाची गोष्ट वेगळी होती.... by अवलिया
सीईटी?
In reply to नाही बॉ. आम्हाला तर लगेच by llपुण्याचे पेशवेll
लेका तुला कोण अडवणार...
आम्हाला तर वाटलं , आता डोनेशनच द्यावं लागतं की काय....?
पण नाय.. धकलं..
मंड्ळी आमचाही रामराम घ्यावा..
नमस्कार,
गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्रिचा जिव्हाळा. मैत्रि दिवसाच्या शुभेच्च्छा
सर्व नवसदस्यांचे मनःपुर्वक स्वागत.
In reply to सर्व नवसदस्यांचे मनःपुर्वक by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद.
(जुना सदस्य) पेशवे
In reply to धन्यवाद. (जुना सदस्य) पेशवे by llपुण्याचे पेशवेll
नवीन सदस्यांचे!
(पुप्यापेक्षाही जुना सदस्य) टिंग्या
In reply to स्वागत by ब्रिटिश टिंग्या
नवीन सदस्यांचे!
(तिंगुलीपेक्षाही जुना सदस्य) नाना
In reply to स्वागत by अवलिया
नविन सदस्यांचे स्वागत. (फार जुना नाही फार नवा ही नाही)
- ('माझं म्हन्नं तर ऐकून घ्या' चा फ्यान)
मला पण खूप उशीरा प्रवेश मिळाला.
प्रवेश मिळाला अभिनंदन !! पण परीक्ष इथेच संपली नाही. व्यक्तिगत निरोप व खरडफळ्यावर लिहिण्याची सुविधा सर्वांसाठी नाही . ती सीईटी आम्ही अजून पास झालेलो नाही त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी त्या सीईटीचे २१ अपेक्षित काढावे ही विनंती. :)
In reply to प्रवेश मिळाला अभिनंदन by सोम्यागोम्या
ते जीडी/पीआय पास झालावरच मिळेल! ;)
ते जीडी/पीआय पास झालावरच मिळेल!मेवे तुम्हाला 'झाडावर' म्हणायचे आहे का ? ;)
:)
अरे वा . अनेक नवीन सदस्य मिसळ चाखायला आलेले दिसतात.
स्वागत आहे
अमोल
नमस्कार मृण्मयीबाई....
मी हि नवा सदस्य आहे. पण सबर का फळ मिठा होता है असे ऐकून आहे ....
नविन सभासदाचे स्वागत...
आम्हाला अजुनही ईथे नविनच असल्यासारखे वाटते...
ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच