Skip to main content

माझे सदस्यत्व .................

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी रविवार, 01/08/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7862
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच सुरू सक्रीय होते हो.. कदाचित ईतका काळ संयम ठेवून वाट पाहू शकणारेच खरेखुरे मराठीप्रेमी असतील व ते ईथे 'टाईमपास' करायला येणार नाहीत असा संपादक मंडळींचा होरा असावा व ते खरेही असेल.. असो, मिपावर तुमचे मनापासून स्वागत...

माझेही सदस्यत्व खूपच उशिरा चालू झाले. मला वाटले, आता नवीन सदस्य घेत नाहीत. परवा अनपेक्षित असताना मिळाले एकदाचे!

उशीरापर्यंत वाट बघायला लावुन मिपा सदस्याची 'सहनशक्ती' वाढवत्,म्हणजे उद्या इथल्या लोकांची नाटकं सहन करता यावीत.

नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर स्वागत आणि येथिल वावरासाठी शुभेच्छा!!! तुम्हाला आणि एकंदरीतच इतर नवसदस्यांना सदस्यत्व मंजूर होण्यासाठी थांबावे लागले यासाठी मिपाव्यवस्थापनाला खेद आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे असे घडले. यापुढे नवीन सदस्यांचे सदस्यत्व लवकरात लवकर चालू होईल याबद्दल व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.

In reply to by संपादक मंडळ

आपण समोर येऊन बोललात त्यातच सर्व काही आले. आपले धन्यवाद.

त्याचं काये, प्रत्येक जणीचे दिवस भरायचे दिवस वेगवेगळे असतात पण डॉक्टर एकाच दिवशी सिझेरीन करतात अन मग सगळ्यांचा जन्म एकाच तारखेला होतो. फुल टायम डुटी करनारा डाक्टर भर्ती व्हायाचा हाय नव्हं. म्हुन ही तकलीप. पुढच्या खेपेला कळ नाय काढाया लागनार.

मला वाटतं एक बॅच फाईल बनवून ठेवल्येय. ठराविक दिवसांनी रन करतात. आपुण बी बरेच म्हैणे थांबलो होतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तेव्हाची गोष्ट वेगळी होती.... आता सीईटी द्यावी लागते.

आम्हाला तर वाटलं , आता डोनेशनच द्यावं लागतं की काय....? पण नाय.. धकलं.. मंड्ळी आमचाही रामराम घ्यावा..

नमस्कार, गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्रिचा जिव्हाळा. मैत्रि दिवसाच्या शुभेच्च्छा

In reply to by अवलिया

नविन सदस्यांचे स्वागत. (फार जुना नाही फार नवा ही नाही) - ('माझं म्हन्नं तर ऐकून घ्या' चा फ्यान)

प्रवेश मिळाला अभिनंदन !! पण परीक्ष इथेच संपली नाही. व्यक्तिगत निरोप व खरडफळ्यावर लिहिण्याची सुविधा सर्वांसाठी नाही . ती सीईटी आम्ही अजून पास झालेलो नाही त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी त्या सीईटीचे २१ अपेक्षित काढावे ही विनंती. :)