मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
मनमोहनसिंगांचा १० वर्षाचा पंतप्रधानपदावरील काळ हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड होता हे नक्की.सहमत आहे. हिंदूंना शिक्षण देण्याच्या हक्कात असंख्य अडथळे आणणारा शिक्षण हक्क कायदा पास करण्याचे पापही मनमोहन सिंगांचेच आहे. या कायद्याबद्धल साहना यांनी मिपावर भरपूर लिहिले आहे.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ by वामन देशमुख
मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?काँग्रेसचे गुलाम
In reply to मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम? by वामन देशमुख
In reply to कॉंग्रेसचे नाही, गांधी by श्रीगुरुजी
कॉंग्रेसचे नाही, गांधी घराण्याचे.सहमत आहे.
पत्रकार परिषदेंची संख्या हा कर्तृत्वमापनाचा मानदंड असेल तर, ब्रह्मांडातील सर्वाधिक कर्तृत्ववान महापुरूष संजय राऊत आहे.Former Prime Minister Dr Manmohan Singh addressed/ interacted with the Press 117 times during his 10 year tenure between 2004-14.
— Manish Tewari (@ManishTewari) January 3, 2024
Press Conferences by Dr Manmohan Singh 2004-2014:
On foreign trips- 72
Annual Pressers - 10
Domestic/state visits- 23
Election/political/manifesto -… pic.twitter.com/F8ZjAiwRmn
In reply to Former Prime Minister Dr by श्रीगुरुजी
मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे.नाही. त्यांची अवगुंणांची लक्तरे लगोलग वेशीवर टांगण्यासाठी तुम्ही केवळ शीर्षक लिहिले असते आणि मजकूर लिहिला नसता तरी पुरेसे झाले असते. असो.
In reply to डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली by धर्मराजमुटके
In reply to त्याचे माप त्याच दिवशी / लगोलग घालायला... by वेडा बेडूक
योग्य टाईम्लाईन कोणती?टाईमलाईन मला माहित नाही पण माणुस मेला त्याच दिवशी / लगोलग घालायला पुढे सरसावणे हे अधम मनोवृत्तीचे उदाहरण आहे.
माणूस गेल्यावर ७० वर्षे झाली तरी त्याला शिव्या घालणे योग्य कि अयोग्य?अयोग्य !
In reply to डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली by धर्मराजमुटके
In reply to डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली by धर्मराजमुटके
In reply to डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली by धर्मराजमुटके
मी भाजपा समर्थक असलो आणि चर्चांमधून मला बरीचशी भाजपाच्या बाजूने बोलणार्या सभासदांची मते पटत असली तरी ह्या बाबतीत त्यांच्याशी मिळता जुळता विचार ठेवणे अवघड आहे.मते पटत असली तरी मिळता जुळता विचार ठेवणे अवघड आहे? हे काय लॉजिक झाले? समजले नाही.
माणूस गेल्यावर लगेच त्याच्या पापपुण्याचा हिशेब करायला घेणे आणि बापावर स्मशानात अंतिम संस्कार करुन आल्यावर १० वा व्हायच्या आतच प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी भांडणार्या मुलांमधे मला तरी काही फरक दिसत नाही.दोन मुद्दे: १. मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान होते, कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. त्यामुळे दहावे व्हायच्या आत प्रॉपर्टीच्या वाटण्या हा सामान्य लोकांच्या कुटुंबियांपुरता मर्यादित विषय असतो तसा मनमोहनसिंगांची लीगसी हा विषय मर्यादित राहू शकत नाही. २. मी आणि इतर अनेक सदस्यांनी मनमोहनसिंग हयात असतानाही इथे व्यक्त केली होती तीच मते मांडली होती. त्यांच्या कारकिर्दीचे (किंवा तुम्ही म्हणता तसे पापपुण्याचे) मूल्यमापन आधीच केले होते. इथे मांडले आहे त्यात नवे काहीही नाही. शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील पण अर्थ तर तोच होता.हा धागा आल्यामुळे काही गोष्टी परत लिहिल्या. याचा अर्थ मनमोहनसिंगांचे निधन झाल्यावर लगेच पापपुण्याचा हिशेब करायला घेतला असे आहे का?मनमोहन हयात असतानाही तो केला होताच- आणि कोणत्याही पब्लिक फिगरविषयी तसे करायचा सगळ्यांना अधिकार आहेच.
"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्"हे रामाने बिभीषणाला कोणत्या स्थितीत म्हटले होते? रावणाचा युध्दात मृत्यू झाल्यावर बिभीषण आपल्या भावावर अंत्यसंस्कार करायला तयार होत नव्हता तेव्हा रामाने त्याला ते सांगितले होते. अर्थातच ते वैयक्तिक पातळीवर लागू होते. ते विधान एक्स्ट्रापोलेट करून सार्वजनिक पातळीवर लागू करायचे काय प्रयोजन आहे? ज्यावेळेस मनमोहनसिंगांनी काश्मीरी हिंदूंना ठार मारणार्या, आपल्याच हवाईदलाच्या अधिकार्यांना ठार मारणार्या यासिन मलिकला मोठ्या मानाने पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेतले होते तेव्हा आमच्याच देशाचा पंतप्रधान आमच्या लोकांना, आमच्या सैनिकांना मारणार्या दहशतवाद्याचा सन्मान करत आहे हे बघून अगदी अभिमानाने मान उंचावलीच असेल नाही का? एप्रिल २०१८ मध्ये मनमोहन पंतप्रधान पदावर नव्हते. तरीही माजी पंतप्रधान म्हणूनही आपल्या देशाच्या हजारो नागरीकांना ठार मारणार्या आय.एस.आय प्रमुखाबरोबर ते स्टेज शेअर करत होते ते किती विलोभनीय दृश्य असेल ना? दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या व्यक्तीविषयी मत चांगले नसेल तर गेलेल्या माणसाविषयी वाईट बोलायचे नाही म्हणून काही बोलले नाही हे एकवेळ समजू शकतो. पण उगीच मनात नसताना त्याचे बळेबळे कौतुक करायचे हे ढोंग कशाकरता? तुम्ही तसे करत आहात असे म्हणत नाहीये पण तसे करणारे लोक सोशल मिडियावर दिसतीलच. आणि मग काही दिवस/काही महिने/काही वर्षे उलटली की दुसर्या कोणत्या संदर्भात बोलायचे असेल तर एखादे उदाहरण देऊन किंवा अन्य काही लिहून/बोलून ती व्यक्ती कशी वाईट हेच परत लिहायचे/बोलायचे? हे सगळे ढोंग वाटत नाही का? तिसरे म्हणजे कोणताही माणूस अमर नसतो. मोदीही त्याला अपवाद नाहीत.ते ही एक दिवस कधीनाकधी हे भूतल सोडून जाणारच आहेत. त्यांना उद्देशून मशरूम (मोदींच्या गोर्या रंगाचे रहस्य म्हणजे ते काही लाख रूपयांचे मशरूम खातात की तोंडाला लावतात असे जिग्नेश मेवाणी बरळला होता तो संदर्भ) गचकल्यावरही त्याच्याविषयी आम्ही काही चांगले थोडीच लिहिणार आहोत असे काही लिहिलेले मी पण वाचले आहे. मनमोहनसिंगांचे निधन झाल्यावर अशी भाषा कोणीतरी वापरली आहे का?जी काही मते पूर्वी होती आणि पूर्वी लिहिलेली आहेत ती परत या धाग्याच्या निमित्ताने परत कोणताही अपशब्द न वापरता लिहिली. त्यात आक्षेपार्ह काय? मनात नसताना उगीच बळेबळे गेलेला माणूस कित्तीकित्ती चांगला होता असे खोटे कौतुक करणे मला तरी आता जमत नाही. एकेकाळी तसे ढोंग जमायचे. मिपावरही ते केले आहे. पण आता नाही. असो.
In reply to डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली by धर्मराजमुटके
In reply to "मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं by सुबोध खरे
In reply to WhatsApp Forward - by वामन देशमुख
In reply to काहीही म्हणा, by प्रसाद गोडबोले
In reply to काहीही म्हणा, by प्रसाद गोडबोले
हे इतकेच पुरेसे आहे रोमन एम्पायर ची मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी दाखवायला.हे रोमन एम्पायर एकदम खतरनाक आहे. नरसिंहरावांचे निधन झाल्यावर त्यांचा मृतदेह काँग्रेस मुख्यालयात सामान्य लोकांना/कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी आणला नव्हता. इतर सर्व माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार दिल्लीत झाले होते पण नरसिंहरावांवर मात्र अंत्यसंस्कार आंध्र प्रदेशात झाले होते. त्यांच्या पार्थिवावर धड अंत्यसंस्कारही झाले नाहीत आणि त्यांचे पार्थिव पूर्ण जळलेही नव्हते आणि भटके कुत्रे त्यांच्या अर्धवट जळालेल्या पार्थिवाचे तुकडे ओढत होते असेही विनय सीतापती म्हणून एका लेखकाने नरसिंहरावांचे चरीत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे. https://www.business-standard.com/article/beyond-business/narasimha-rao-one-legacy-two-verdicts-116071401341_1.html खरेखोटे माहित नाही. नरसिंहरावांचा उल्लेखही कधी काँग्रेस करत नाही. त्यांचे काँग्रेसच्या कोणत्याही पोस्टरवरही चित्र कधी नसते. या सगळ्याचे कारण नरसिंहराव राजमातेच्या हो ला हो करून आपले पोतेरे होऊ द्यायला तयार नव्हते आणि स्वतंत्र बाणा जपायचा प्रयत्न करत होते. प्रणव मुखर्जी इतकी वर्षे विविध काँग्रेस सरकारांमध्ये मंत्री होते. राजमातेनेच त्यांना राष्ट्रपतीही केले. पण २०१९ मध्ये मोदी सरकारने त्यांना भारतरत्न दिल्यावर ते प्रथम कुटुंबाच्या नजरेतून उतरले.मुळच्या काँग्रेसच्याच नेत्याला भारतरत्न द्यायच्या समारंभाला एकही कॉंग्रेसचा नेता हजर नव्हता. प्रणव मुखर्जींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने शोकप्रस्तावही संमत केला नव्हता. त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींना सांगण्यात आले की माजी राष्ट्रपतींच्या निधनानंतर असा शोकप्रस्ताव मंजूर करायची पध्दत नाही. मात्र २००५ मध्ये के.आर.नारायणन या दुसर्या मुळच्या कॉंग्रेसच्या असलेल्या माजी राष्ट्रपतींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने तसा शोकप्रस्ताव मंजूर केला होता आणि तो प्रस्ताव स्वतः प्रणव मुखर्जींनीच मांडला होता असे शर्मिष्ठा मुखर्जींनी म्हटल्याचे आजच पेपरात वाचले. आणि मनमोहनसिंगांचे स्मारक दिल्लीत उभारावे या मागणीला शर्मिष्ठा मुखर्जींनी विरोधच केला आहे. https://www.hindustantimes.com/india-news/utter-rubbish-pranab-mukherjees-daughter-sharmistha-slams-congress-amid-manmohan-singh-memorial-row-101735353223134.html काँग्रेसला आता मनमोहनसिंगांचे स्मारक हवे असेल तर मग नरसिंहरावांचे स्मारक त्यांनी त्यांचेच सरकार असताना का बांधले नाही? गांधी परीवाराची हुजरेगिरी आणि हो ला हो केले की मग अशी मेहरबानी होते. पण जरा स्वतंत्र बाणा दाखविला की मात्र गत नरसिंहराव आणि प्रणव मुखर्जींसारखी होते.
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
In reply to श्रीमती इंदिरागांधी यांच्या by सुबोध खरे
उदा १९९१ साली भारत आर्थिक गर्तेत गेला होता त्याला बाहेर काढणारे श्री नरसिम्ह राव होते पण देशा ला अशा खड्ड्यात टाकण्याचे श्रेय कुणाचे? ते कुठेच कोणी लिहीत नाही. अर्थात ते श्री राजीव गांधी यांचे होतेआपल्याला आय.एम.एफ कडे १९८१-८२ मध्ये कर्ज घ्यायला धाव घ्यायला लागली होती आणि १९९१-९२ मध्ये सुध्दा. याचाच अर्थ १९८० च्या दशकातील सरकारांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नव्हती. पण १९९० मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर कबजा केल्यानंतर तेलाचे भाव भडकले म्हणून १९९१ चे संकट आले असे समर्थन करायची संधी मात्र मिळाली. जशी १९७३ मधील योम किप्पूर युध्दामुळे तेलाचे भाव भडकले म्हणून त्यामागे रिचर्ड निक्सन (आणि लिंडन जॉन्सनही) यांनी घातलेला घोळ लपवता आला तसेच काहीसे.
१९७३-७४ मध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजे ९७.५ % आयकराचा दर होता. हा आचरटपणाचा कळस असणारा दर असताना भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते? अर्थात डॉ मनमोहन सिंह.असा प्रचंड दर ठेवणे हे अचरटपणाचा कळस होता हे नक्कीच. पण त्यावेळेस असा अचरटपणा करायची जगभरातच फॅशन होती असे दिसते. खालील आलेखात अमेरिकेत १९१२-१३ मध्ये पहिल्यांदा आयकर आल्यापासून सर्वाधिक स्लॅबचे आयकराचे दर किती होते हे पाहता येईल.
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विचारलेल्या मुद्देसूद प्रश्नांची उत्तरं नसली की... by वेडा बेडूक
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डॉ.मनमोहनसिंग म्हणाले होते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१