Skip to main content

मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 27/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे. https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKU… त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्‍याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते. या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्‍यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा. मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_

वाचने 6852
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

काहीही म्हणा, पण खणत्या राजा पेक्षा तरी मौनमोहन सिंग जास्त हुशार होते हे मान्य करायला कोणाचीही हरकत नसावी. कारण कसे का असेना, त्यांची "बस चुकली नाही". बाकी नव्वद चे दशकातील आर्थिक सुधारणांचे श्रेय आजही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या पारड्यात न टाकता सिंग ह्यांच्या पारड्यात टाकले जाते, हे इतकेच पुरेसे आहे रोमन एम्पायर ची मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी दाखवायला. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या बद्दल दुमत नाही. गांधी घराण्याचे लांगुनचालन करून , योग्य वेळी, पंतप्रधान पदी विराजमान झाले. खरगे काय किंवा मनमोहन सिंग काय किंवा ग्यानी झैलसिंग काय, ह्यांचे बोलवते धनी म्हणजे, गांधी घराण्यातील व्यक्ती. मग ती इंदिरा गांधी असो किंवा सोनिया गांधी...

In reply to by प्रसाद गोडबोले

हे इतकेच पुरेसे आहे रोमन एम्पायर ची मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी दाखवायला.
हे रोमन एम्पायर एकदम खतरनाक आहे. नरसिंहरावांचे निधन झाल्यावर त्यांचा मृतदेह काँग्रेस मुख्यालयात सामान्य लोकांना/कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी आणला नव्हता. इतर सर्व माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार दिल्लीत झाले होते पण नरसिंहरावांवर मात्र अंत्यसंस्कार आंध्र प्रदेशात झाले होते. त्यांच्या पार्थिवावर धड अंत्यसंस्कारही झाले नाहीत आणि त्यांचे पार्थिव पूर्ण जळलेही नव्हते आणि भटके कुत्रे त्यांच्या अर्धवट जळालेल्या पार्थिवाचे तुकडे ओढत होते असेही विनय सीतापती म्हणून एका लेखकाने नरसिंहरावांचे चरीत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे. https://www.business-standard.com/article/beyond-business/narasimha-rao… खरेखोटे माहित नाही. नरसिंहरावांचा उल्लेखही कधी काँग्रेस करत नाही. त्यांचे काँग्रेसच्या कोणत्याही पोस्टरवरही चित्र कधी नसते. या सगळ्याचे कारण नरसिंहराव राजमातेच्या हो ला हो करून आपले पोतेरे होऊ द्यायला तयार नव्हते आणि स्वतंत्र बाणा जपायचा प्रयत्न करत होते. प्रणव मुखर्जी इतकी वर्षे विविध काँग्रेस सरकारांमध्ये मंत्री होते. राजमातेनेच त्यांना राष्ट्रपतीही केले. पण २०१९ मध्ये मोदी सरकारने त्यांना भारतरत्न दिल्यावर ते प्रथम कुटुंबाच्या नजरेतून उतरले.मुळच्या काँग्रेसच्याच नेत्याला भारतरत्न द्यायच्या समारंभाला एकही कॉंग्रेसचा नेता हजर नव्हता. प्रणव मुखर्जींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने शोकप्रस्तावही संमत केला नव्हता. त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींना सांगण्यात आले की माजी राष्ट्रपतींच्या निधनानंतर असा शोकप्रस्ताव मंजूर करायची पध्दत नाही. मात्र २००५ मध्ये के.आर.नारायणन या दुसर्‍या मुळच्या कॉंग्रेसच्या असलेल्या माजी राष्ट्रपतींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने तसा शोकप्रस्ताव मंजूर केला होता आणि तो प्रस्ताव स्वतः प्रणव मुखर्जींनीच मांडला होता असे शर्मिष्ठा मुखर्जींनी म्हटल्याचे आजच पेपरात वाचले. आणि मनमोहनसिंगांचे स्मारक दिल्लीत उभारावे या मागणीला शर्मिष्ठा मुखर्जींनी विरोधच केला आहे. https://www.hindustantimes.com/india-news/utter-rubbish-pranab-mukherje… काँग्रेसला आता मनमोहनसिंगांचे स्मारक हवे असेल तर मग नरसिंहरावांचे स्मारक त्यांनी त्यांचेच सरकार असताना का बांधले नाही? गांधी परीवाराची हुजरेगिरी आणि हो ला हो केले की मग अशी मेहरबानी होते. पण जरा स्वतंत्र बाणा दाखविला की मात्र गत नरसिंहराव आणि प्रणव मुखर्जींसारखी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इंदिरा गांधी, यांच्या काळातील आहे.(https://en.wikipedia.org/wiki/D._Devaraj_Urs) पण एक मात्र आहे... काँग्रेस सोडून दिल्या नंतर, फक्त माननीय शरद पवार, हेच तेव्हढे राजकारणात टिकले.. इतरांचा सुपडा साफ झाला. अगदी अरस यांचा देखील.

श्रीमती इंदिरागांधी यांच्या कारकिर्दीत १९७३-७४ मध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजे ९७.५ % आयकराचा दर होता. हा आचरटपणाचा कळस असणारा दर असताना भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते? अर्थात डॉ मनमोहन सिंह. In 1972, Singh was chief economic adviser in the Ministry of Finance, and in 1976 he was secretary in the Finance Ministry.[23] In 1980–1982 he was at the Planning Commission, and in 1982, he was appointed governor of the Reserve Bank of India under then finance minister Pranab Mukherjee and held the post until 1985.[23] He went on to become the deputy chairman of the Planning Commission (India) from 1985 to 1987.[13] अशा गोष्टी त्यांचा उदो उदो करताना काळजीपूर्वक वगळल्या गेल्या आहेत. उदा १९९१ साली भारत आर्थिक गर्तेत गेला होता त्याला बाहेर काढणारे श्री नरसिम्ह राव होते पण देशा ला अशा खड्ड्यात टाकण्याचे श्रेय कुणाचे? ते कुठेच कोणी लिहीत नाही. अर्थात ते श्री राजीव गांधी यांचे होते आणि त्याबद्दल त्यांना भारत रत्न हि देण्यात आले. हि गोष्ट हि काळजीपूर्वक वगळली जाते. गांधी घराण्याची गुलामगिरी काँग्रेसींच्या रक्तात इतकी मुरली आहे कि त्यांना वाईट काहीच दिसत नाही.

In reply to by सुबोध खरे

उदा १९९१ साली भारत आर्थिक गर्तेत गेला होता त्याला बाहेर काढणारे श्री नरसिम्ह राव होते पण देशा ला अशा खड्ड्यात टाकण्याचे श्रेय कुणाचे? ते कुठेच कोणी लिहीत नाही. अर्थात ते श्री राजीव गांधी यांचे होते
आपल्याला आय.एम.एफ कडे १९८१-८२ मध्ये कर्ज घ्यायला धाव घ्यायला लागली होती आणि १९९१-९२ मध्ये सुध्दा. याचाच अर्थ १९८० च्या दशकातील सरकारांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नव्हती. पण १९९० मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर कबजा केल्यानंतर तेलाचे भाव भडकले म्हणून १९९१ चे संकट आले असे समर्थन करायची संधी मात्र मिळाली. जशी १९७३ मधील योम किप्पूर युध्दामुळे तेलाचे भाव भडकले म्हणून त्यामागे रिचर्ड निक्सन (आणि लिंडन जॉन्सनही) यांनी घातलेला घोळ लपवता आला तसेच काहीसे.
१९७३-७४ मध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजे ९७.५ % आयकराचा दर होता. हा आचरटपणाचा कळस असणारा दर असताना भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते? अर्थात डॉ मनमोहन सिंह.
असा प्रचंड दर ठेवणे हे अचरटपणाचा कळस होता हे नक्कीच. पण त्यावेळेस असा अचरटपणा करायची जगभरातच फॅशन होती असे दिसते. खालील आलेखात अमेरिकेत १९१२-१३ मध्ये पहिल्यांदा आयकर आल्यापासून सर्वाधिक स्लॅबचे आयकराचे दर किती होते हे पाहता येईल. tax By IGTaylor - Own work, CC0, Link अमेरिकेतही १९६४ पर्यंत सर्वाधिक स्लॅब ९०% इतकी होती. ती ७०% पर्यंत खाली आणायचे जॉन केनेडींनी १९६३ मध्येच ठरविले होते. तो निर्णय अंमलात आला केनेडींचा खून झाल्यानंतर लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाल्यावर. त्यामुळे त्याला केनेडी टॅक्स कट असेच म्हणतात. पुढे १९८१ मध्ये रॉनाल्ड रेगननी तो दर ५०% आणि १९८५ मध्ये ३०% इतका खाली आणला- सप्लाय साईड किंवा व्हूडू इकॉनॉमिक्स म्हणून अमेरिकेतील मध्यमवर्ग संपविला असाही आरोप केला जातो. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे १९६० ते १९८० या काळात अमेरिकेतही असे सर्वाधिक स्लॅबचे दर अवास्तवपणे खूप जास्त होते. त्यामुळे निदान या बाबतीत तरी मनमोहनसिंगांना दोष देणार नाही. कदाचित ती त्या काळची फॅशन होती.

हजारों जवाबो से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आबरू रखी है अलविदा सर...._/\_ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

... पळ काढायची जुनीच खोड आहे.

In reply to by वेडा बेडूक

अगदी बरोबर! लख्ख प्रकाश दिसत असला तरी सर्वत्र काळोखच आहे असे ठासून वारंवार सांगणाऱ्याला पळ काढावाच लागतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय म्हणता सर ! कसे आहात ! Eagerly waiting for 2029 ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हजारों जवाबो से अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की आबरू रखी है १० महा घोटाळे पाहून डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या भारताच्या दिवंगत पंतप्रधानांनी त्यांना घोटाळ्याबद्दल बोलायला भाग पाडल्यावरही हेच उद्गार संसदेत काढले होते. बिरुटे सर हे लिहितात यात आश्चर्य ते कोणतं . गुलामीची सवय जात नाही हेच खरं'

अग्रलेख, मार्दवी मार्तंड आणि बडबड बहरातील मौनी डॉ.मनमोहन सिंगाबद्दलचे दोन्ही अग्रलेख आवडले. आज मटात मृदुभाषी.. कणखर लेखही भारी आहे. -दिलीप बिरुटे