राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)
विचार करून सारासार विवेक करून ठरवावे...सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी...हॅ..हॅ..हॅ.... हे लईच झालं राव. त्ये काय समर्थ रामदासस्वामी हैत का, सारासार विचार-विवेकाची कास धरून "चिंता करितो विश्वाची" म्हणणारे ??? काय तरी सोप्पं, बंटी, मुन्नू, पप्पू, बबली वगैरेंना समजंल, असं सांगा की.
In reply to माझ्या आईचा एक जुना मिक्सर by साहना
In reply to राहूल कसे असतील तसे असोत by शशिकांत ओक
In reply to राहूल कसे असतील तसे असोत by शशिकांत ओक
In reply to राहूल कसे असतील तसे असोत by शशिकांत ओक
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>> परदेशातून काळा पैसा आणुन by वामन देशमुख
In reply to >>> परदेशातून काळा पैसा आणुन by वामन देशमुख
In reply to सल्लागारांना असे वाटत असावे की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर, by खटपट्या
In reply to अजून थोडी वर्ष थांबा. by कंजूस
In reply to अजून थोडी वर्ष थांबा. by कंजूस
In reply to अजून थोडी वर्ष थांबा. by कंजूस
In reply to "राहुल गांधी केव्हाच मेला. मी by श्रीगुरुजी
In reply to "राहुल गांधी केव्हाच मेला. मी by श्रीगुरुजी
In reply to मनुष्य आशेवर जगतो...असे 'ह्यांचे' म्हणणे. by चित्रगुप्त
In reply to भारत जोडो यात्रा by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद. by विवेकपटाईत
ए एस दुलत ( मौना सरदार अर्थात पगडी न pघालणारे)हे अतिशय लोकप्रिय अधिकारी होते. वाजपेयी काळात मी त्यांचा पीए होतो.अरे वा. त्या काळाविषयी गोपनीयतेच्या मर्यादा पाळून काही लिहिता येईल का? ए.एस.दुलात या मनुष्याविषयी माझ्यासारख्या सामान्यांचे मत अती वाईट आहे. त्यांनी लिहिलेल्या Kashmir: The Vajpayee Years या पुस्तकात त्यांनी फारूख अब्दुल्लासारख्यावर अगदी भरभरून स्तुतीसुमने उधळली आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपट हा प्रोपोगांडा आहे असे त्यांचे मत आहे. मग काश्मीरी पंडित उगीच हौस म्हणून नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर सोडून पळून आले का याचे ते कधी उत्तर देतील का? म्हणे काश्मीरी पंडित हेच एकमेव टारगेट केलेला समाजगट नव्हता. नसेलही. पण म्हणून काश्मीरी पंडितांबरोबर जे काही झाले त्याची तीव्रता कमी होते का? ३७० कलम काढायला पण त्यांनी विरोध केला होता. त्या निर्णयाला त्यांचा विरोध असेल तर ते समजू शकतो. प्रत्येक भारतीयाला सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा अधिकार आहे. पण ३७० काढले तर रक्ताचे पाट वाहतील या फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्यांच्या धमक्यांनंतरही त्यांनी त्याविरूध्द काही बोलल्याचे ऐकिवात नाही. २०१८ मध्ये म्हणजे ३७० कलम काढायच्या एक वर्ष आधी त्याच माणसाने आय.एस.आय चा माजी प्रमुख असद दुर्रानी याच्याबरोबत संयुक्तपणे The Spy Chronicles हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्याला दिल्लीला यायचे होते पण मोदी सरकारने त्याला व्हिसा नाकारला. मग तो व्हिडिओ कॉन्फरन्सवरून पाकिस्तानातून त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हजर राहिला होता. दिल्लीत प्रकाशनासाठी मनमोहनसिंग, हामीद अन्सारी, फारूख अब्दुल्ला, कपिल सिब्बल, यशवंत सिन्हा वगैरे मंडळी हजर होती आणि पाकिस्तानातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तो असद दुर्रानी.
भारताचे माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी अर्थ-परराष्ट्रमंत्री आय.एस.आयच्या माजी प्रमुखाबरोबर एकाच व्यासपीठावर हजर होते!! किती विलोभनीय दृश्य असेल ना ते? त्याच आय.एस.आयने हजारो भारतीयांना ठार मारले आहे असे आपल्या सरकारचे (मनमोहन पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनच आणि ते पंतप्रधान असतानाही) मत आहे त्या संस्थेच्या माजी प्रमुखाबरोबर आपले माजी पंतप्रधान? किळस आली तो प्रकार बघून आणि मनमोहनसिंग यांच्याविषयी जो काही थोडाफार आदर होता तो त्या प्रकारानंतर पूर्ण संपला. असला प्रकार कशामुळे झाला? तर तो त्याच ए.एस.दुलात यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे.
या प्रकारांमुळे ए.एस.दुलात या मनुष्याविषयी माझ्यासारख्यांचे मत अगदी वाईट आहे. विशेषतः हामीद अन्सारीसारख्यांच्या संगतीत ते वावरत असतील तर त्यांना 'बेनेफिट ऑफ द डाऊट' देणेही माझ्यासारख्यांना शक्य वाटत नाही. तरी पडद्याआड घडलेल्या काही गोष्टी असतील तर ते वाचायला आवडेल. तेव्हा पंतप्रधान कार्यालयात केलेल्या कामाची गोपनीयता भंग होणार नाही अशाप्रकारे काही लिहिता आले तर जरूर लिहा ही विनंती.
In reply to विनंती by चंद्रसूर्यकुमार
In reply to विनंती by चंद्रसूर्यकुमार
In reply to डिसेंबर 1999 मध्ये पाकिस्तान by अर्जुन
अनुत्तरीत प्रश्न असा आहे की: तोमर, काठमांडू येथील भारतीय दूतावासात प्रथम सचिव, अपहरण झालेल्या विमानात काय करत होते? मी आतापर्यंत सरकारच्या सर्वोच्च स्तरावर ऐकलेले स्पष्टीकरण म्हणजे तोमर अपहरण झालेल्या विमानात चढले हा “वाईट योगायोग” होता.बापरे. हा प्रकार खरोखरच माहित नव्हता. सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.
अनेकांचा असा विश्वास आहे की,कमांडोना अमृतसरमधील विमानात कार्वाई करण्याची परवानगी दिली गेली नाही कारण तोमर आत होते. कमांडोना पाठवण्याच्या प्रस्तावात अन्य कोणीही नसून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सचिव एन के सिंग यांनीच बदल केला होता. तोमरचे लग्न एन के सिंग यांच्या धाकट्या बहिणीशी झाले आहे. अनेक जण मान्य करतात की सिंगने आपल्या मेव्हण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व बदल केले!हे खरं असेल तर मग वाजपेयींनी एन.के.सिंगांना जाब विचारला का? त्यांना पदावरून काढले का? वाटत नाही.
३७० कलम काढण्यास विरोध, दुलत यांची मेहर तरार, असद दुर्रानीसारख्यां बरोबरची जवळीक, पाकिस्तानची ISI ही जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर यंत्रणा आहे. व मला आयएसआय प्रमुख व्हायला आवडले असते!! हे बोलणे त्यांचा देशप्रेमाबद्द्ल शंका निर्माण करते.असल्या घाणेरड्या माणसाला पी.एम.ओ मध्ये मुद्दामून वाजपेयींनी का बोलावून घेतले असावे? असल्या प्रकारांमुळेच वाजपेयींविषयी एकेकाळी वाटत असलेला आदर आता अजिबात वाटत नाही. कधीकधी वाटते की २०१८ मध्ये दुलतच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस वाजपेयी हिंडते फिरते असते आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे त्यांना कळत असते तर ते पण गेले असते. त्यांच्याच लाडक्या दुलातने लिहिलेले पुस्तक आणि त्यांच्या मर्जीतले फारूख अब्दुल्ला आणि यशवंत सिन्हा वगैरे लोक तिथे गेले असतील तर वाजपेयी तिथे जायची शक्यता न जायच्या शक्यतेपेक्षा जास्त होती असे मला तरी वाटते (वैयक्तिक मत).
I walked and talked with @RahulGandhi in Punjab.
— S lrfan Habib एस इरफान हबीब عرفان حبئب (@irfhabib) January 19, 2023
There is a spring in his step and conviction in his voice. And his knowledge runs deep. A genuine man genuinely concerned for our country. There was positivity in the thousands of yatris.#BharatJodaYatra pic.twitter.com/9LqGYI55B4
In reply to I walked and talked with by श्रीगुरुजी
In reply to I walked and talked with by श्रीगुरुजी
In reply to मोदी लाट, २०१४ चे राक्षसी यश, by मोदक
२०१६ नंतर पप्पूने बरीच मेहनत करून स्वत:ची आणि पक्षाची भारतीय राजकारणातली जागा कमी करवून घेतली आहे.स्स्स्स्स्सहमत!
In reply to या लेखाचा उद्देश्य ज्या by विवेकपटाईत
या लेखाचा उद्देश्य ज्या कोंग्रेस कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पार्टीच्या प्रसारासाठी वेचले त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न होता.या लेखातील शर्माजी काल्पनिक असले तरी एका खर्याखुर्या शर्माजींविषयी लिहितो. त्या शर्माजींचे नाव होते रामकृष्ण द्विवेदी. त्यांना गांधी परिवाराने दिलेली वागणूक पाहता काँग्रेससाठी कार्यकर्ते (जेवढे आहेत तेवढे) तरी का खपतात हेच समजत नाही. भाजप किंवा कम्युनिस्ट पक्षांप्रमाणे कोणतीही विचारधारा नाही- म्हणजे जरी पक्षनेतृत्वाने वाईट वागणूक दिली तरी विचारधारेला मानून तरी पक्षासाठी काम करतील अशी परिस्थिती नाही. जर फायदा मिळाला तर तो गांधी घराण्याला आणि परिणाम भोगायचे इतरांनी अशी परिस्थिती. असो. तर त्याचे झाले असे की १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींचा काँग्रेस (आर) आणि इंदिरा विरोधकांचा काँग्रेस (ओ) अशी फूट पडली. ऑक्टोबर १९७० मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस (ओ) चे त्रिभुवन नारायण सिंग हे इतर सगळ्या विरोधकांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य नव्हते त्यामुळे त्यांना एप्रिल १९७१ पूर्वी पोटनिवडणुकीत निवडून जाणे भाग होते. १९६२, १९६७ आणि १९६९ मध्ये गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते महंत अवैद्यनाथ. हे महंत अवैद्यनाथ गोरखपूरच्या गोरखनाथ मठाचे प्रमुख होते (योगी आदित्यनाथ त्यांच्यानंतर मठाचे प्रमुख झाले). तर हे महंत अवैद्यनाथ १९७० मध्ये पोटनिवडणुकीत गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांनी आपली उत्तर प्रदेश विधानसभेतील मनीरामची जागा रिकामी केली. त्या जागेवर पोटनिवडणुक होणार होती जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यात. तुम्ही मनीराममध्ये नुसते फॉर्म भरायला या बाकीचे आम्ही बघतो असे आश्वासन अवैद्यनाथांनी मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंगांना दिले. त्याप्रमाणे काँग्रेस (ओ) चे उमेदवार होते मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग. तर विरोधात इंदिरा गांधींनी उमेदवारी दिली होती काँग्रेस (आर) च्या रामकृष्ण द्विवेदींना. हे रामकृष्ण द्विवेदी पत्रकार होते आणि त्यामानाने नवखे उमेदवार मानले जात होते. पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी प्रचार करू नये अशी पध्दत त्यावेळेस होती आणि बर्यापैकी ती पाळलीही जायची. त्यामुळे स्वतः उमेदवार असले तरी त्रिभुवन नारायण सिंग प्रचाराला गेले नाहीत. त्यांच्या बाजूने वाजपेयींसह सगळ्या विरोधी नेत्यांनी प्रचार केला. हे मतदान व्हायच्या आठवडाभर आधीच लोकसभा बरखास्त झाली होती आणि मार्च १९७१ मध्ये लोकसभेसाठी मध्यावधी निवडणुक होणार होती त्यामुळे या पोटनिवडणुकीला अन्यथा झाले असते त्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले. रामकृष्ण द्विवेदींच्या बाजूने इंदिरा गांधींनीही प्रचार केला. मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा धक्कादायक निकाल आला. रामकृष्ण द्विवेदींनी मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्या दुप्पट मते घेऊन त्यांना पराभूत केले. हे रामकृष्ण द्विवेदी अगदी हाडाचे काँग्रेसवाले होते. या पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना हरविले म्हणून त्यांना त्रिभुवन नारायण सिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या कमलापती त्रिपाठींच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळाले. पण त्यानंतर त्यांना कधी उमेदवारीही मिळाली नाही. इंदिरा गांधींसाठी विमान अपहरण करण्यासारखा गंभीर गुन्हा करणार्या भोलानाथ आणि देवेंद्र पांडे या भावांना काँग्रेसने दोन टर्मसाठी आमदार केले होते. त्यापैकी एक भोलानाथ पांडे अगदी २०१४ पर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवत होते. असल्या लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण आपल्याच हाडाच्या कार्यकर्त्याला मात्र खड्यासारखे बाजूला ठेवले. तरीही हे रामकृष्ण द्विवेदी पक्षासाठी राबत राहिले. २००४ मध्ये राहुल गांधीने अमेठीतून लोकसभा निवडणुक लढवली तेव्हा 'अमेठीका डंका बेटी प्रियांका' ही घोषणा देणारे हेच रामकृष्ण द्विवेदी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात राज्यात पक्ष मजबूत करायला काय करता येईल याविषयी चर्चा केली आणि प्रियांका गांधींच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी पक्षात फार मोठे स्थान कधी न भूषविलेला माणूस पक्षविरोधी कारवाया करू शकेल ही शक्यता फारच थोडी. पण त्यांनी प्रियांकांवर नाराजी व्यक्त केल्याने ते गांधी घराण्याच्या मर्जीतून उतरले आणि त्यांना पक्षातून काढण्यात आले. तेव्हा 'मी नक्की कोणत्या पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत हे तरी सांगा' असे डोळ्यात अश्रू आणत द्विवेदी म्हणाले होते. पक्षातून काढताना कारणे दाखवा नोटिस वगैरे काहीही बजावण्यात आली नव्हती तर तडकाफडकी त्यांना पक्षातून काढले गेले. काही दिवसातच त्यांना दुर्घर आजार (बहुदा कॅन्सर) झाला. तेव्हा द्विवेदींना 'मानवीय' आधारावर पक्षात घेण्यात येत आहे असे काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजे त्यांना काढण्यात आपली चूक झाली हे मान्य करणे दूरच राहिले अंथरूणाला खिळलेल्या ८७ वर्षांच्या हाडाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला उपकार केल्याप्रमाणे पक्षात परत घेतले गेले. त्यानंतर २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान त्यांचे निधन झाले. तर अशी होती या खर्याखुर्या शर्माजींची गोष्ट. तरीही असले लोक पक्षासाठी राबत राहतात आणि त्यांच्या हाती धुपाटणेही येत नाही. दिवसेंदिवस भाजपमध्ये (निदान महाराष्ट्रात तरी) अशा खर्याखुर्या शर्माजींची संख्या वाढत चालली आहे हे पण खेदाने नमूद करावेसे वाटते.
कोण आहेत म्हणे राहुलचे सल्लागार ?