https://www.misalpav.com/poem/51708 -कावळ्यांची फिर्याद-३
डिस्क्लेमर-:
१.सांप्रत प्रस्तुती कुठल्याही परंपरा,श्रद्धा,धर्म, समाज मान्यतेवर टिका टिप्पणी नाही.भावना दुखावण्याचा यत्किंचितही मानस नाही.
२. वाढत्या डिजीटल आणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व हस्तक्षेप यावर रूपकात्मक विडंबन करण्याचा प्रयत्न आहे.
३. देवदत्त प्रज्ञेचा अविष्कार,कृपया कृ.बु.चा सहभाग शोधण्यात वेळ दवडू नये.
कावळ्यांची फिर्याद-४
मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू,
वायसांची,एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू!
बूमर जेन झाले जमा, मांडला गंभीर मुद्दा
चर्चा सुरू झाली, सहभागी जेन झी सुद्धा.
देवदत्त प्रज्ञा बासनी, मानवाने गुंडाळली
कुऱ्हाड मारली पायी,कृत्रिम प्रज्ञा धुंडाळली.
तूनळी वर पंडिताने,मांडली अभासी पुजा
कोडीला कृ.बु.ने,भात पिंड ताजा ताजा.
आभासी काक, काव काव ही आभासी
आभासी नैवेद्य दावीला,पितरे अभागी.
नको माका,नको दर्भ, सर्व काही आभासी
उघडून लॅपटॉप करतसे श्राद्ध,तर्पण प्रभाती.
चिंताग्रस्त झाले वृद्ध,झाले जेन झी ही कृद्ध
विचारती एक एका,का मानवाने छेडले युद्ध.
जेन झी वदले,बंद पाडा वाय फायचा खेळ
पितर आणि डेटाचा तो कसा बसवेल मेळ?
महाग्यानी बोले,ऑप्शन आहे मोबाईल डेटा
इसके बारेमे क्या खयाल है जेन झी बेटा!.
वायसांच्या सभेमधे पसरली घोर शांतंता,
फिर्याद करू चित्रगुप्ता,असे ठरले अंतता:.
या वर्षी मामला,जरा जास्तच गंभीर होता,
माऊलींच्या काऊला, घोर लागला होता.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया