https://www.misalpav.com/poem/51708 -कावळ्यांची फिर्याद-३
डिस्क्लेमर-:
१.सांप्रत प्रस्तुती कुठल्याही परंपरा,श्रद्धा,धर्म, समाज मान्यतेवर टिका टिप्पणी नाही.भावना दुखावण्याचा यत्किंचितही मानस नाही.
२. वाढत्या डिजीटल आणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व हस्तक्षेप यावर रूपकात्मक विडंबन करण्याचा प्रयत्न आहे.
३. देवदत्त प्रज्ञेचा अविष्कार,कृपया कृ.बु.चा सहभाग शोधण्यात वेळ दवडू नये.
कावळ्यांची फिर्याद-४
मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू,
वायसांची,एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू!
बूमर जेन झाले जमा, मांडला गंभीर मुद्दा
चर्चा सुरू झाली, सहभागी जेन झी सुद्धा.
देवदत्त प्रज्ञा बासनी, मानवाने गुंडाळली
कुऱ्हाड मारली पायी,कृत्रिम प्रज्ञा धुंडाळली.
तूनळी वर पंडिताने,मांडली अभासी पुजा
कोडीला कृ.बु.ने,भात पिंड ताजा ताजा.
आभासी काक, काव काव ही आभासी
आभासी नैवेद्य दावीला,पितरे अभागी.
नको माका,नको दर्भ, सर्व काही आभासी
उघडून लॅपटॉप करतसे श्राद्ध,तर्पण प्रभाती.
चिंताग्रस्त झाले वृद्ध,झाले जेन झी ही कृद्ध
विचारती एक एका,का मानवाने छेडले युद्ध.
जेन झी वदले,बंद पाडा वाय फायचा खेळ
पितर आणि डेटाचा तो कसा बसवेल मेळ?
महाग्यानी बोले,ऑप्शन आहे मोबाईल डेटा
इसके बारेमे क्या खयाल है जेन झी बेटा!.
वायसांच्या सभेमधे पसरली घोर शांतंता,
फिर्याद करू चित्रगुप्ता,असे ठरले अंतता:.
या वर्षी मामला,जरा जास्तच गंभीर होता,
माऊलींच्या काऊला, घोर लागला होता.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा, एआय नैवेद्य भारीच 😂
हा हा, एआय नैवेद्य भारीच 😂
मुद्दा खरच गम्भीर! आणि छान…
मुद्दा खरच गम्भीर! आणि छान शैलीत मान्डलेला. 👌
पंख असलेले वानर' किंवा पक्ष्यांमधला 'आईन्स्टाईन'
कावळ्पंयाला पंख असलेले वानर' (Feathered Primates) किंवा पक्ष्यांमधला 'आईन्स्टाईन' म्हटले जाते.
करोना काळत "कावळ्यांची फिर्याद ",हा विचार झालेल्या मानवी मृत्यूदरातून सुचला.
पक्षाबद्दल विवीध माहीती घेताना कावळ्यावर आणी इतर पक्षांवर झालेले विवीध संशोधन पुढे आले.त्यातून असे कळाले की कावळा बुद्धिमान पक्षी असून त्याच्या मधे परसेप्च्युअल कॉन्शसनेस' (संवेदनात्मक जाणीव) आणी मानवी चेहरे लक्षात ठेवण्याची अद्भुत क्षमता आहे. कावळ्याच्या काव काव मागील तर्कशास्त्र थोडे समजायला लागले. असे म्हणतात कावळे नुसते चेहरे लक्षात ठेवत नाहीत तर इतर भाऊबंदाना कम्युनिकेट करतात.
उगाच नाही माऊलींनी म्हणले आहे,
उड उड रे काऊ
तुझे सोन्याने मढवीन पाऊ
असो, पितृपक्ष आणी अंतीम संस्कार यामधे कावळ्यांची अवशकता लक्षात घेऊन विडंबन पण विचार करायला लावणारे असे विषय सुचत गेले.
या वर्षी चौथे पुष्प गुंफले आहेत.
@श्र्वेता,मोघे व सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.
रूपकात्मक विडंबन....
हे रूपकात्मक विडंबन धर्म, श्रद्धा,परंपरा,पुर्वज यावर नसून आजकाल बोकाळलेल्या डिजिटल संस्कृती आणी कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आहे.
बर्याच गुरूजींनी गणपती पुजा,सत्यनारायण पुजा युट्यूबवर टाकली आहे.
घरगुती अडचणी मधे सप्तशतीचा पाठ करावा लागेल म्हणून दहाहजार रूपये घेऊन , पाठ मी घरी करतो सांगून एक ऑडिओ फाईल पाठवली.
मंत्रोच्चारण, ध्वनी ने होणारा वातावरणातील सकारात्मक प्रभाव डिजिटल माध्यमातून खरेच होईल का,आणी असे झाले तर पानावरच्या आणी घाटावरच्या पुजा बंद पडून बेरोजगारी भर पडेल काय?असा प्रश्न पडतो.
@कर्नल तपस्वी, समजले आता.
In reply to रूपकात्मक विडंबन.... by कर्नलतपस्वी
तुमचा हा प्रतिसाद वाचून 'कावळा प्रकरण' थोडेसे समजू लागले आहे, परंतु अन्य मिपाकरांच्या कविता वगैरे अद्याप समजत नाहीयेत.
आवडलं 😀
आवडलं 😀