मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हा संभ्रम माझा

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे

वाचने 2751 वाचनखूण प्रतिक्रिया 4

नाखु Tue, 07/23/2019 - 22:28
दुसरं कडवे तीन तीनदा वाचले तर प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागला, नक्की काय आहे ते पुन्हा पुन्हा सुसंगत वाचावे लागेल असे दिसते. वाचकांची पत्रेवाला नाखु

चौथा कोनाडा Wed, 07/24/2019 - 16:33
वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली !
अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा
हे विशेष आवडले ! सुंदर कल्पना ! चांदणे संदीप _/\_