नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा
स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा
अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा
- संदीप चांदणे
जिओ चांदणे पैलवान जिओ
पैजारबुवा,
वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली !
अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझाहे विशेष आवडले ! सुंदर कल्पना ! चांदणे संदीप _/\_
एकदम मस्त कडवं आहे ते
छान कविता