हा संभ्रम माझा
नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा
स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा
अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा
- संदीप चांदणे
छान कविता
मस्त.. लै दिसानी आलात पण मस्त लिवलत...
वाह, सुरेखच ! वेगळ्याच
+1