✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून !

श — शिव कन्या, Fri, 11/06/2015 - 15:48
मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह. आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा... सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’! यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील! त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात, ‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’ याविषयी मार्गदर्शन केले जाईल. दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल, ‘हवामनाचा अंदाज’ मध्ये! विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या भल्याबुऱ्या बातम्यांचे सहक्षेपण दरघटकेला होईलच! गृहिणींसाठी ‘मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती’ या विषयावर कोरडी चर्चा होईल. दुपारच्या कामगार सभेत ‘कार्यालयीन मन:शैली’ या सदरात ‘रिकाम्या वेळेतील मनाचे उद्योग’ याविषयी गभळक्षऋ यांची मुलाखत सादर होईल. त्यानंतर ‘देश कि सुरिली धडकन’ मनाचे आकाशवाणी केंद्र पुनःपुनःप्रक्षेपित करेल! संध्याकाळी सहा वाजता ‘आपले मन, आपली माणसं’ यात जुन्या आठवणी, कातर वेळा, हरवलेले क्षण, सापडलेल्या डायऱ्या इत्यादींचा इमोसनल आढावा घेतला जाईल. ‘फोनइन’ मध्ये मनाच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर होईल! रात्री साडेदहा वाजता ‘बेला के फूल’! whatsapp, फेबुक, गुगल, स्काईप, तूनळी इत्यादी कशावरूनही मन रेंगाळत राहील. रात्री ठीक अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी मनाच्या आकाशवाणी केंद्राचे बाह्य प्रसारण आपोआप विराम पावेल!

प्रतिक्रिया द्या
5288 वाचन

💬 प्रतिसाद (22)

मस्त...

मुक्त विहारि
Fri, 11/06/2015 - 16:00 नवीन
छान लिहिले आहे...
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Fri, 11/06/2015 - 16:44 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

:-)

एस
Sat, 11/07/2015 - 00:54 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

मन असा आयडी नाहीये का अजून.

रातराणी
Sat, 11/07/2015 - 01:14 नवीन
मन असा आयडी नाहीये का अजून.
  • Log in or register to post comments

आहेत की...

सतिश गावडे
Sat, 11/07/2015 - 10:41 नवीन
मन मन१ मनराव अजूनही बरेच असतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

मनरंग असाही एक आयडी आहे भौतेक

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 17:01 नवीन
मनरंग असाही एक आयडी आहे भौतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

छान..

स्वाती दिनेश
Sat, 11/07/2015 - 01:26 नवीन
आवडले स्फुट! स्वाती
  • Log in or register to post comments

छान.

इडली डोसा
Sat, 11/07/2015 - 01:31 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

सहज सुंदर सालस.... :-)

संदीप डांगे
Sat, 11/07/2015 - 02:08 नवीन
सहज सुंदर सालस.... :-)
  • Log in or register to post comments

मस्त आणि नर्मविनोदी..

मांत्रिक
Sat, 11/07/2015 - 10:23 नवीन
मस्त आणि नर्मविनोदी.. मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती हे अगदी गंमतीशीर...
  • Log in or register to post comments

मस्त... आवडले.

सतिश गावडे
Sat, 11/07/2015 - 10:41 नवीन
मस्त... आवडले.
  • Log in or register to post comments

हही हही हही!

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/07/2015 - 17:41 नवीन
हही हही हही!
  • Log in or register to post comments

कसं जम्तं हो असं हसायला =))

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 20:43 नवीन
कसं जम्तं हो असं हसायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हह्ही हह्ही हह्ही

मांत्रिक
Sat, 11/07/2015 - 21:09 नवीन
हह्ही हह्ही हह्ही असं हसायचं असतं ते टक्कुमहाराज. इतकं पण कळत नै? हुम्म!!! दू दू दू टक्का!!!! तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे.... दू दू दू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हही हही हही! आणि हह्ही हह्ही

टवाळ कार्टा
Sun, 11/08/2015 - 11:02 नवीन
हही हही हही! आणि हह्ही हह्ही हह्ही यात फरक आहे बाकी तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे.... हे भारीये =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आवडलं

एक एकटा एकटाच
Sat, 11/07/2015 - 18:25 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

हेच मुक्तक पुरुष आयडी कडून

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/07/2015 - 20:22 नवीन
हेच मुक्तक पुरुष आयडी कडून आले असते, तर मिपाच्या आकाशवाणी केंद्रावरून काय काय प्रतिक्रिया प्रसारीत झाल्या असते बरे परा? ;)
  • Log in or register to post comments

कहर =))

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 20:42 नवीन
कहर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आवडले. छान लिहिले आहे...

_मनश्री_
Sat, 11/07/2015 - 20:32 नवीन
आवडले. छान लिहिले आहे... Image removed.
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Sat, 11/07/2015 - 20:34 नवीन
छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

मस्तच

राघवेंद्र
Sun, 11/08/2015 - 01:44 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

वाह वाह! जमलय मस्तच!!

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 17:55 नवीन
वाह वाह! जमलय मस्तच!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा