मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

प्यारे१ · · जे न देखे रवी...
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते नका करु हो घाई सांगतो आहे मी काही आहे अ‍ॅड्मिन माझी 'कायम' मज करेना म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही प्रेरणा: http://misalpav.com/node/27781

वाचने 23336 वाचनखूण प्रतिक्रिया 75

चौकटराजा Mon, 05/05/2014 - 17:11
आता कवि तर कविता लिहून गेला. त्याच्या भावणा त्यानी व्यक्त केल्या त्या कशा बदलायच्या ? पुरच्या वेळची कविता मीट्रात येउंद्या !

जेनी... Mon, 05/05/2014 - 17:51
कायपण .. एकतर स्त्रीयांना भेळपूरी कमी आणि पाणीपूरी जास्त आवडते ...आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने *aggressive*

In reply to by दिपक.कुवेत

जेनी... Mon, 05/05/2014 - 19:00
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ... तुमच्यासारख्या काकुप्रेमीन्ना हे माहित नसावं ?? कि भेळीत नेमके कुठले चमचमित न चटपटीत पदार्थ असावेत कि जे स्त्रीयांना भेळ खायला मजबूर कर्तात ?? *sad* अहो दिपु काका विडंबन निव्वळ गंडलय .... ( काकुप्रेमी म्हणजे तुम्ही ज्या चिकन्या चिकन्या डीशेस करुन डीअर दिपु काकुला खाय्ला घालता सो तुम्हि काकुप्रेमी अश्या अर्थाने )

In reply to by जेनी...

धन्या Mon, 05/05/2014 - 18:03
आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने
ते आवले आहेत. आवळे नाही. तुमच्या मताशी असहमत. त्यांच्या कवितेवर तुम्ही चांगला किंवा वाईट प्रतिसाद जरुर देऊ शकता. मात्र "उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने" असे म्हणणे अती वाटते. त्यांना काय चुकले ते सांगा, ते सुधारण्याचा प्रयत्न करु शकतील.
की राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे | म्हणोनि काय कवणे | चालुचि नये ||
असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे...

In reply to by धन्या

जेनी... Mon, 05/05/2014 - 18:54
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं :-/ आवळे काका मलाहि एकदा अश्याच अर्थाचं एक वाक्य बोलले होते ... ते जरा आडुन होतं .. पण माझं हे डायरेक्ट्ट आहे ... कळ्ळं *pardon*

In reply to by पैसा

प्यारे१ Tue, 05/06/2014 - 18:50
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा असेल तर ठीक अन्यथा मराठी संस्थळावर जाणीवपूर्वक परभाषेचा उपयोग केल्याबद्दल तीव्र णि आणि षे आणि ढ! ;) -ट्यार्पीशील ;)

In reply to by प्यारे१

धन्या Tue, 05/06/2014 - 19:05
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा असावी. म्हणजे आपण मराठी माणसांनी तसे मानावयास हरकत नाही. कारण,
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा
असे समर्थांनी म्हटले आहे.

In reply to by सूड

बॅटमॅन Wed, 05/07/2014 - 14:39
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक, झालंच तर भारतपाक सगळें आयलें मरे! (कोंकणी-मालवणी एट ऑलची मोडतोड केलेला) ब्यँटम्यँन.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा गुरुवार, 05/08/2014 - 08:18
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम गलत हय. आपकोस अब गलतच कयसे दिसताय? हम्मेशाच गलतच अर्थ निक्कालते. बदलो थोडासा. अच्छा रहेंगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या गुरुवार, 05/08/2014 - 12:34
जगदीश खेबुडकरांनी "हम आपके हैं कौन"ची गाणी मराठीत आणली होती. रेकॉर्डही निघाली होती. त्यातलं एक गाणे होते "चपला दया पैसे घ्या".

सस्नेह Mon, 05/05/2014 - 22:26
एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे. पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.