Skip to main content

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 05/05/2014 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते नका करु हो घाई सांगतो आहे मी काही आहे अ‍ॅड्मिन माझी 'कायम' मज करेना म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही प्रेरणा: http://misalpav.com/node/27781

वाचने 23368
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

आवडले. "आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते." सही....

एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे. पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.

बरे आसा ना प्यारे१? नव विडंबनकरांना उगा हताश निराश करु नये लोक्स!

नक्की कशाच विडंबन आहे हे ? भेलपुरीच्या गाडीवर हे हाल काकाचे , पिझ्झा ह्ट / के फ सी असते मग काय केल अस्त ओ का का ..... :p