Skip to main content

२. स्वप्नमेघातील चांदणं

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 19/08/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628 आकाशमिठीत गर्द रात्र ओली शृंगारलेली नभवेलीवर शुभ्रांकित निशिगंधीत चांदणं निशब्द ओठांवरती पारिजात धुंद स्वप्नमेघ पालवत निशिगंधीत चांदणं ओझरत्या दवबिंदूंमध्ये कातरलेला चंद्र शहारलेल्या अंगणी निशिगंधीत चांदणं नभी चंदेरी आरास नीर दर्पण शोभीवंत झावळीतून शिंपलेले निशिगंधीत चांदणं चंद्रसावलीचा प्रदेश शब्दांध वार्‍याचा झोत क्षितिजापल्याड झेपावलेले निशिगंधीत चांदणं --- शब्दमेघ (१९ ऑगस्ट २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)

वाचने 2552
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्तच रे गणेशा. कविता जरी फारश्या कळत नसल्या तरी तुझी ही कविता फार फार आवडली.

गणेशा -छान सूर लागलेत निशब्द ओठांवरती पारिजात धुंद स्वप्नमेघ पालवत निशिगंधीत चांदणं मस्त. आणि पु.ले.शु.