मला भेटलेले रूग्ण - ११
http://www.misalpav.com/node/41281
ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.."
ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...
मिसळपाव
अमेरिकन हवाईदलातून निवृत्त होऊन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स उर्फ चार्ली ब्राउन परिपूर्ण असे आयुष्य जगत होता. १९७२ साली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातून निवृत्त झाल्यावर मायामी येथे स्थायिक झाला. १९८६ सालच्या एका कॉम्बॅट पायलट रीयुनियन सोहळ्यात त्याला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याला एकाने विचारले की "दुसर्या महायुद्धातील तुमचा सहभाग असलेल्या एखाद्या कामगिरीची आठवण सांगता का?" त्यावर त्याने 'ती' घटना सांगितली. ती घटना सांगितल्यावर चार्ल्स ब्राउनला वाटले की त्या घटनेतील एका व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.