Skip to main content

बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 20/11/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत .

देवकुंड...............एक स्वर्गीय अनुभव

लेखक GRavindra यांनी सोमवार, 20/11/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या भटक्या मित्रांसोबत सकाळी ६ वाजता पुण्याहून देवकुंडच्या दिशेने निघालो. कात्रज, चांदणी चौक, मुळाशी मार्गे ताम्हिणी घाटातून नागमोडी वळणे घेत आम्ही भिरा ह्या बेसपॉईंटला ९ च्या सुमारास पोहचलो. तशी थंडी जास्त नव्हती पण भूक मात्र सपाटून लागली होती त्यामुळे पोटाची भूक शांत करून सोबत एक गाईड घेऊन डोळ्याची आणि मनाची भूक शांत करण्यासाठी आम्ही देवकुंडाच्या प्रवासासाठी निघालो. गेल्या काही काळात झालेल्या दुर्दैवी अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने सोबत गाईड घेऊन जाणे बंधनकारक केले आहे.

अण्णा

लेखक बोबो यांनी सोमवार, 20/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा --------- एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं. अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं. “अण्णा दळवी”,रंगा म्हणाला. “अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं. “अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना.

आरक्षण

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 20/11/2017 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
"आरक्षण - योग्य कि अयोग्य" या विषयावर चर्चेसाठी मला TV वर बोलावण्यात आलं होतं. चर्चेत प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून आरक्षणाविषयी मत मांडत होता. कोणी तात्विक आणि तर्कशुद्ध मत मांडून आरक्षण हे कसे वरवरचे मलम आहे आणि याने प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच कसे जाणार आहेत असे पटवून देऊ पाहत होता तर कोणी ऐतिहासिक दाखले देऊन आरक्षण हि कशी सामाजिक गरज आहे हे दाखवू पाहत होता. काही चाणाक्ष लोक आरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे असा दोन्ही पक्षांना नाराज न करणारा सावध पवित्रा घेत होते. चर्चेला उधाण आले होते पण निष्पन्न काहीच होत नव्हते. तेवढ्यात एकजण म्हणाला "लै तर्क लावू नका.

सीडीओ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 20/11/2017 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक अर्थकारणात (जिचे परिणाम अजूनही बर्‍याच प्रमाणात अस्तित्वात आहेत) गेली जागतिक मंदी हा एक मोठा अध्याय आहे. त्यात महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या "सीडीओ" या खलनायकाचा उल्लेख वारंवार येतो. पण त्याबद्दल सर्वसामान्य जनतेत "भारी पण अगम्य भूत" अशीच भावना आहे. आताही मिपावरच चाललेल्या "निश्चलनीकरण सर्वेक्षण" या लेखातील प्रतिसादांत सीडिओंचा उल्लेख आला. तेथे छोटा प्रतिसाद लिहू म्हणता म्हणता तो मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेला ! तेव्हा, तेथे विषयांतर करण्यापेक्षा वेगळा लेख लिहावे असे ठरवले.

गूढ अंधारातील जग -३

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 19/11/2017 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -३ पाणबुडीतील आयुष्य पाणबुडीत आयुष्य फार खडतर असतं. ते म्हणेज अक्षरशः तुम्ही एखाद्या यंत्राच्या आत मध्ये राहण्यासारखे असते जेथे हवा पाणी आणि जागा या तिन्ही गोष्टी दुर्मीळ असतात. कारण पाणबुडीचा आकार जितका लहान करता येईल तितका चांगला (तिला लपणे तितके जास्त सोपे होते) आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त अस्त्रे संवेदक(sensors) बॅटरी भरता येतील तितके भरले जाते. त्यातून या खडतर जागेत काम करताना लोकांच्या हातून काम बिनचूक होणे अत्यावश्यक असते अन्यथा सर्वच्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी रविवार, 19/11/2017 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग ! सध्याचा काळ गुलाबी थंडीचा..या काळात सर्वत्र आल्हादायक आणि शांत वातवरण असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीची पेरणी झाल्याने शेतकरी ही या काळात काहीसा 'थंड' असतो. नाही म्हणायला खरिपाचा शेतीमाल विक्री आणि कापसासारखं नगदी पीक घरात येण्याचा काळ असल्याने त्याच्याही हातात दोन पैसे खेळू लागलेले असतात. अर्थात, हे चित्र आता इतिहासजमा झाल्यासारखे असल्याने शेतकऱयांची झोप उडालेली आहे. डोक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि कवडीमोल भावात विकला जाणारा शेतीमाल पाहून गुलाबी थंडीतही शेतकऱयांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

Making of photo and status : ७. गोलुमोलु

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 19/11/2017 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला.

चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/11/2017 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे.