

‘लॉक बॉक्स’
इथे अमेरिकेत एक नाविन्यपूर्ण गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे ‘लॉक बॉक्स’. ह्यात दरवाज्याची चावी ही त्याच दरवाज्याच्या हँडलला अडकवलेल्या एका मेटल बॉक्समध्ये ठेवलेली असते. हा मेटल बॉक्स देखील एका कॉम्बिनेशन नंबरने बंद केलेला असतो. ज्याला तो कॉम्बिनेशन नंबर माहित असतो तोच फक्त तो मेटल बॉक्स उघडून त्यातली चावी घेऊन दरवाजा उघडू शकतो.
आता ह्याचे फायदे बघुया. समजा घरी चारजण राहत असतील, नवरा, बायको, मुलगा आणि मुलगी. घराबाहेर पडताना कोणालाही चावी बरोबर घेऊन जावे लागत नाही. दरवाजा लॉक करून, चावी त्या पेटीत ठेवून, त्या पेटीवरचे कॉम्बीनेशन नंबर फिरवून ती पेटी लॉक करून निर्धास्त बाहेर पडू शकतात. ना चावी सांभाळायची कटकट ना प्रत्येकासाठी वेगळी चावी बनविण्याची जिकीर. घरी परतल्यावर कॉम्बिनेशन नंबर फिरवून चावी काढायची आणि घर उघडायचे.
ह्याचा दुसरा उपयोग घरी काम करायला येणाऱ्या कामगारांसाठी होतो. इथे कित्येक वेळा घरातील मंडळी ऑफिस किंवा शाळेत गेली असताना, घराची साफसफाई करणारी, पेस्ट कंट्रोल वगैरे करणारी मंडळी येतात. पूर्वी घराची चावी दाराबाहेरील कार्पेटखाली, दिव्याच्या स्वीचवर वगैरे ठराविक ठिकाणी ठेवली जायची. कामगार मंडळी येत, त्या विविक्षित ठिकाणाहून चावी घेत, घर उघडून काम करून, निघताना पुन्हा त्याच जागी चावी ठेऊन निघून जात. अशा लोकांसाठी देखील हे लॉक बॉक्स उपयुक्त ठरू लागले आहे.
ह्याचा तिसरा उपयोग म्हणजे, कित्येक वेळा हे लॉक बॉक्स, भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असलेल्या घरांना लावलेले असते. कॉम्बीनेशन लॉकचा नंबर, इस्टेट एजंटला माहित असतो. ज्यावेळी ते घर ग्राहकांना दाखवायचे असते त्यावेळी ते लॉक उघडून एजंट ते घर दाखवू शकतो. एकाच एजंटकडे एकाच वेळी अनेक घरे भाड्याने देण्यासाठी अथवा विकण्यासाठी असतात. अशा वेळी त्या एजंटला प्रत्येक घराची चावी बरोबर घेऊन फिरण्याची, सांभाळण्याची गरज भासत नाही व त्याचे काम खूपच सुकर होते. हो, त्याला त्या कॉम्बीनेशन लॉकचा नंबर माहित असणे गरजेचे असते.
हे लॉक बॉक्स, अंडर कंस्ट्रक्शन घरासाठी देखील फार उपयोगी ठरते. ज्यावेळी अशा घरात एकाच वेळी सुतार, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन वगैरे मंडळी काम करत असतात, त्या प्रत्येकाला कॉम्बीनेशन लॉकचा नंबर दिला जातो. ही सर्व मंडळी आपापल्या सवडीनुसार येऊन, घर उघडून काम करतात व काम आटोपल्यावर चावी त्या बॉक्समध्ये ठेवून निघून जातात. आपल्या नेहेमीच्या लॉक पद्धतीत जवळ चावी नसल्यामुळे, घरात प्रवेश करायला जो खोळंबा होतो तो ह्या सिस्टीममधे होत नाही व चावी हरवायची देखील भीती राहत नाही.
आणि हो, एकदा का काम आटोपले की त्या कॉम्बीनेशन लॉकचा नंबर पुन्हा बदलता येतोच त्यामुळे घरात कोणी अनधिकृतरीत्या प्रवेश करायची भीती पण राहत नाही.
सोबत फोटो जोडले आहेत.
प्रतिक्रिया
एक प्रश्न - फक्त कॉम्बिनेशन
हेच म्हणणार होतो?
In reply to एक प्रश्न - फक्त कॉम्बिनेशन by अत्रे
माझ्या मते ....
In reply to एक प्रश्न - फक्त कॉम्बिनेशन by अत्रे
स्वतंत्र खोक्याचा क्रमसंकेत
In reply to माझ्या मते .... by गामा पैलवान
संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा
In reply to स्वतंत्र खोक्याचा क्रमसंकेत by अत्रे
संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा
In reply to संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा by संजय पाटिल
बरोबर आहे
In reply to संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा by अत्रे
हो, खुपसे बरोबर
In reply to बरोबर आहे by रामपुरी
एक मत
In reply to माझ्या मते .... by गामा पैलवान
हाच विचार माझ्याही मनात आला.
In reply to एक प्रश्न - फक्त कॉम्बिनेशन by अत्रे
कल्पना चांगली आहे
परदेशी लोक्स एकंदरीतच
In reply to कल्पना चांगली आहे by धर्मराजमुटके
अगदी बरोबर
In reply to कल्पना चांगली आहे by धर्मराजमुटके
म्हणुन त्यांच्या सिनेमात
हे चौकटराजांच्या चालू
लॉकबॉक्सचा फोटो दिसतोय का ?
त्याचे कॉम्बिनेशन सांगा ना.
In reply to लॉकबॉक्सचा फोटो दिसतोय का ? by सौन्दर्य
URL लिंक सापडत नाही
तुम्हाला गूगल फोटोज म्हणायचंय
In reply to URL लिंक सापडत नाही by सौन्दर्य
खूप खूप आभार रुपी जी
In reply to तुम्हाला गूगल फोटोज म्हणायचंय by रुपी
मीही टेक्स्टच्या जागी एखादे
In reply to खूप खूप आभार रुपी जी by सौन्दर्य
सर्वात सोप्पी पध्दत!!!
In reply to तुम्हाला गूगल फोटोज म्हणायचंय by रुपी
(No subject)
धोका सारखाच आहे
एक आडु सवाल
प्रश्न चांगला आहे.
In reply to एक आडु सवाल by इरसाल
Stand-your-ground law पण लक्षात असू द्या.
In reply to प्रश्न चांगला आहे. by सौन्दर्य
Stand-your-ground law पण लक्षात असू द्या.
कबूल
आमचा अनुभव
म्हणजे थोडीफार अशीच