मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी कविता

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ही कविता 'सुसंगती सदा घडो सुजाण वाक्य कानी पडो ' ह्या कवितेच्या चालीवर म्हणता येते. दीपावली आजि असे घरोघरी दिवे लागले कंदील पणती माळा तयांचे तेज हे फाकले ||१ || धनत्रयोदशी धन्वंतरी पूजा महत्त्व कळे आयुर्वेदाचा देव हा आयुष्य आपणासी मिळे ||२ || नरकासुरासी संहारी श्रीक्रुष्ण जनांसी तारी दुष्टांचा मारक हरी सुजनतारक श्रीहरी ||३ || प्रभातकाळी उठुनिया लावू सर्वांगासी चंदन अभ्यंग स्नान करूसुगंधीउटणे तैल लेवून || ४ || लक्श्मीपूजा असे घरी धनवर्षा होऊ दे दारी हिशेब जुन्या चोपड्या तयांचे पूजन मी करी ||५ || प्रतिपदाबली पाताळी डोई वामन चरण विक्रम समवत्सर होई नववर्ष तू जाण ||६ || दिवाळी फराळ करू ताटामध्ये मिष्टान्न असे करंज्या शेव चिवडा चकल्या लाडू अनारसे || ७ || भाऊबीज ओवाळिती बहिणी आपुल्या बंधुला रक्षण करतो तुझे बहिणीला भ्राता वदला ||८ || दिवाळी सण सौख्याचा दारापुढे काढा रांगोळी शुभेच्छा देतो सर्वांना म्हणूया शुभ दीपावली || ९ || -- शब्दांकित (वैभव दातार )

वाचने 1734 वाचनखूण प्रतिक्रिया 0