सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते
प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते
....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !
काव्यरस
वाचने
1277
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर !!!
विस्तृत प्रतिसादाबद्दल..
In reply to सुंदर !!! by गबाळ्या