Skip to main content

शुभ्र सारे जीवघेणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 14/09/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा मी चालताना सावली सोडून गेली तापत्या सार्‍या उन्हांना हसत ओलांडून गेली वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली
काव्यरस

चंद्राचे मनोगत

लेखक कलम यांनी शुक्रवार, 14/09/2018 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला हसावे कशाला जगावे कशासाठी अन्याय हा पार्थवा असत्यास कवटाळुनी मी जगावे कुणाला वदू माझी ही वंचना निशेच्या कुशीतून जन्मास यावे मला बागडाया तमाचे रण कधी भेट नाही स्वतःच्या पित्याची संबोधती सूर्य नारायण नसावे मला का कधी स्वत्व माझे पित्याने दिले दान तेजः कण युगे लोटली आज आहे उभा मी निशेला करोनि स्व ला अर्पण सभोवताली अति क्षुद्र तारे स्व प्रकाशे आनंदात तेजाळती कधी सर्व एकत्र येऊनि मजला कटू बोल बोलुनी वेडावती जरी पृथ्वी लोकी अति मूल्य माझे स्वतःसाठी आहे अति गौण मी आकारे ही पूर्णत्व नाहीच मजला रवीच्या प्रकाशे सदा अर्ध मी नको ते अलंकार तेजः कणांचे जयावीन मी न माझा उरे नको ती स्तुती अन नको ती

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ६

लेखक आदित्य कोरडे यांनी शुक्रवार, 14/09/2018 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 https://www.misalpav.com/node/43170 https://www.misalpav.com/node/43224 मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रान्झाच्या खुनानंतर घटना कशा घडत गेल्या आणि सर्बियाला ऑस्ट्रियाने निर्वाणीचा इशारा देणारे पत्

भारलेल्या त्या क्षणांचे...

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 12/09/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
भग्न शिल्पातून भटकत कोणते हे भूत रात्री विव्हळले, "आरंभ विसरा, शेवटाची येथ खात्री भोगुनी उपभोग उरते शून्य केवळ मर्त्य गात्री क्षणिक येथे तेज, अंती घोर तम प्रत्येक नेत्री" चांदण्याच्या कवडशाने भग्न मूर्ती उजळली ध्वस्तता मिरवीत अंगी अंतरीचे बोलली,... "निर्मितीचा दिव्य प्याला प्राशुनी मज घडविले, आज जरी मी भंगले अन विजनी ऐसी विखुरले सर्जनाच्या अमृताने अजूनही मी भारले…. ....भारलेल्या त्या क्षणांचे तेज उरते शाश्वत तेच साऱ्या सर्जनाचे, निर्मितीचे इंगित "
काव्यरस

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 12/09/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.