कार्यकर्ता
कार्यकर्ता
’कार्यकर्ता काय म्हनला? दिलं का?’
धापा टाकत हॉटेलात दाखल झालेल्या रमेशने सुरेशला विचारलं.
’आरं मग! मला देत नाई व्हय. आपली वटच तशी हाय.’ सुरेश म्हणाला आणि ’ ए! चा आनी दोन मिर्ची दी रे’ अशी हॉटेलवाल्या पोराला ऑर्डरही सोडली.
’कसं जमतं हो तुम्हाला?’
’ह्ये बग, तुला पटणार न्हाई, परत्येकाला काय ना काय तरी खाज असतीच. कुनाला सवताला बरं म्हून घ्यायची खाज, तर कुनाला दुसर्याला नाव ठिवायची खाज. आत्ता हाच कार्यकर्ता बग. ह्येला अडलं नडलं त्येला पैसं देयाची लई खाज. प्रवचनं ठोकायची खाज. हितं तत्वज्ञानं ऐकायची होस कुनाला हाय? पन गावतात ना पैसं. आपण खाजवत र्हायचं.
मिसळपाव