Skip to main content

चिवताई आणि कावळ्याची गोष्ट : मराठी भाषेत ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 18/09/2018 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
(भाषा एका नदी सारखी आहे, सोबतीचे नदी, नाले समाहित करून सतत पुढे जाणारी- दिल्लीतली एक आई आपल्या बाळाला गोष्ट सांगत आहे) एक होती चिव. तिचे काय नाव होते, स्पैरो. एक होता काऊ त्याचे नाव होते क्रो. एकदा काय झाले. काऊचा बंगलो पाऊसात डेमज झाला. काऊ चिवताईच्या घरी गेला आणि दार वाजवले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". स्पैरो म्हणाली, "थांब मी आपल्या बाळाची मालीशी-मालीशी करते", प्लीज वेट. थोड्या वेळानी क्रो पुन्हा दार वाजविले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". "थांब मी आपल्या बाळाची न्हाई न्हाई करते", प्लीज वेट.

पीरनी बुशराच्या जाळ्यात पाकिस्तान!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 17/09/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
1 बंगाली बाबा रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्‍या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही... अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच.

वृद्धाश्रम

लेखक तृप्ति २३ यांनी सोमवार, 17/09/2018 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्धाश्रम आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं तीच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं ती निराश होती हतबल होती दाराकडे नजर रोखून वाट बघत होती काय चुकलं तिचं की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय सार काही मुलाला देऊन तिला मात्र अस जगावं लागतंय डोळ्यातले अश्रु ही तिचे काही वेळाने थांबून गेले पुण्य केलं की पाप हे तिला ही कळेनासे झाले म्हणुनच म्हणते की …….. नका रे मुलांनो वागु असे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणी नसे त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या उर्वरित आयुष्य त्यांना आनंदाने घालवु द्या ….. Trupti Sameer Tilloo Vrud

भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .

लेखक अभिजित - १ यांनी सोमवार, 17/09/2018 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
2019 मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.

काम हे काम असतं!

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 17/09/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला मी: हॅलो क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय. मी: ओके चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :( काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला. ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही. आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला! मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ?

टैम्पास

लेखक लौंगी मिरची यांनी रविवार, 16/09/2018 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारी उन्हाच्या झळया खात एकाच लाइनीत जवळ्जवळ आम्हि ६ जनी बसलो होतो . गावाला एकतर बसण्याची सोय नसते . रस्त्याच्या कडेला येणार्या जाणार्यांकडे बघत बसावच लागतं . पर्याय नसतो . माझ्या शेजारी माझी वहिनी तिच्या बाजुला काकु आणि तिच्या शेजारी तिचीच मावस बहिन . तिने तर दर दोन मिनिटाला पूढे सरकुन सरकुन पार रस्ता गाठत आणला , तरी आम्हि त्याच जागी . अवघडुन गेलो होतो पार , पण काकु काहि केल्या जागची हलेना , एकाच जागी बसुन ढिगारेच्या ढिगारे बनवले तिने . समोर शाडुची माती होती ना , मग काय बसल्या बसल्या टाइमपासच कि . आजुबाजुला आतापर्यंत भयाण गर्दी झालेली . उन्हामुळे पोटात कालवाकालव झाली होती .

लेले आनंदले

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 16/09/2018 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी.