हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!
हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!
हिमा दासने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पटकावलं आणि माझ्या बकेट लिस्ट मधील एका गोष्टीवर अर्धी टिक आली (अर्धीच म्हणतोय कारण पूर्ण ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतरच होईल. तसे अभिनव बिंद्राने सुवर्ण जिंकलेले पण ते पाहण्यात नव्हते आले फक्त वाचण्यात आले होते). तशी ही गोष्ट बुकेत लिस्ट वर अचानकच आली म्हणजे २०१६ मधील ऑलिम्पिक बघताना.
बरेचसे इंग्लिश शब्द/वाक्य आपण अगदी सहजगत्या त्या शब्द/वाक्यांमागच्या भावनेचा विचार न करता फेकत (पक्षी:वापरत) असतो जसे की सॉरी, थँक यू आणि असेच.. त्याच पठडीतले एक वाक्य म्हणजे "U make us feel proud/feeling proud".
मिसळपाव
