Skip to main content

ब्रह्मरन्ध्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/11/2018 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मरन्ध्र ************* आबा रिसबूड एकदम जिंदा दिल माणूस लोभस रुबाबदार व्यक्तिमत्व जय भवानी सहकारी पतपेढीत आबा चीफ रिकव्हरी ऑफिसर म्हणून कार्म करत होता आबा खूप हुशार ऑफिसर होता रिकव्हरी चे तंत्र -त्यातल्या खाचा खोचा -कायदे कोर्ट -पळवाटा यात आबा वाकबगार होता आबा रिकव्हरी ला गेला अन हात हलवत परत आला असे कधीच घडले नव्हते काही तरी वसुली झाल्या शिवाय आबा हालत नसे संचालक मंडळाचा आबा विश्वासू माणूस होता खर तर रिकव्हरी चे काम कटकटीचे -शिव्या शाप खाण्याचे धंदे आबांचे नित्य काम असे कर्जदाराचे भेदरलेले चेहरे पाहणे -जप्तीच्या नोटीसींनी झालेली लाचार अवस्था -उधार उसनवार करून जमवलेले पैसे - हे स

अतृप्त आत्मा -७

लेखक प्रमोद पानसे यांनी शुक्रवार, 16/11/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडे आकाशाची लाली पुर्ण ओसरली होती.हळुहळु सुर्य समुद्रात विरघळला .एक बारीक लाल रंगाची रेघ लाटांवर डचमळत विलीन झाली .आणी इकडे फट् आवाज करत कवटी फुटली.चला !चला !!

अतृप्त आत्मा -६

लेखक प्रमोद पानसे यांनी शुक्रवार, 16/11/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सुर्य मावळतीला आला होता.सर्व बांधाबांध होउन आमची पालखी स्मशानाकडे मार्गस्थ झाली होती.आमची काही ठराविक लोकप्रियता आक्रंदत आणी बाकी बघे आणी टगे फॉर्मलिटी म्हणुन पालखीत सामिल झालेले.मजल दरमजल करत पोहचलो एकदाचे मुक्कामी.आमच्या जाण्याने घरातही तसा काही फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला नव्हताच.सर्व वातावरण साधारण स्थिर होतं .आमच्या एकंदरीत वर्तणुकीचा परिणाम . त्यामुळे झाल्या गोष्टीचं दुःख न बाळगता आम्हीही सुर्यास्ता कडे डोळे लावुन बर्याच वेळानंतर पुन्हा एकदा मानवी रुपात परत येण्याची आणी राहिलेल्या इच्छापुर्ती करण्यासाठी आमच्याच अंत्यविधीची वाट बघत बसलो होतो. शंभ्याने ठरवुन ओली लाकडे आणुन नेहम

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

लेखक shantanu Paranjpe यांनी शुक्रवार, 16/11/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
Shivaji Maharaj रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!

अतृप्त आत्मा -५

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात आम्ही बाकीच्या कुणालाच दिसत नसताना हा डांबर गोळा आंम्हास कसाकाय बघु शकतोय ? या कल्पनेने आम्ही आश्चर्यचकित झालो होतो.पण चला कुणीतरी संपर्क साधतोय हेच खुप असं मानुन आम्ही द्रोणात तरंगत तीकडे निघालो. जवळ जाताच जाड्या खेकसला "काय राव ! केव्हाचा बोलावतोय .चला बसा पटकन बॉसने बोलवलय." "च्यायला ! बॉस ? कोण बॉस ?? त्या धसकटाला सांग जाउन आधी बोनस पाठव घरी मग बघु यायचं की नाही " आम्ही पण खेकसलो "अहो ! यावं लागेल आता तुम्हाला .तुम्ही मेलायत आणी यमदेवांनी बोलावणं धाडलय .मी दुत आहे त्यांचा .पोटावर नका मारु चला पटकन" च्यायला !

अतृप्त आत्मा -४

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गॕलरीतुन खाली बघितलं तर सर्व सक्रिय कार्यकर्ते आमची पालखी बांधत होते.

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

अतृप्त आत्मा -३

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता जयडी आमच्या गालावरुन हात फिरवतीये हे बघुन आमच्या बायडीचा मत्सर जागा झाला नसता तर आश्चर्य होतं.त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या अश्रुंआडुन ? आमच्या कलंत्राने ते सर्व हेरलच.आणी खस्सदिशी जयडीचा हात बाजुला करुन हि बया हात फिरवत हमसायला लागली. च्यामायला ! अगं बया जिवंत असताना नाही कधी फिरवलास आणी आत्ताच का गं सुचलं तुला ?

अतृप्त आत्मा -२

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्यावेळाने कंटाळुन सिलींगवरुन आमचं द्रोण घेउन खाली उतरलो .म्हणलं बघु तरी आपण कसे दिसतोय ते . कालच बाबल्याच्या सलुन वरुन उधारीत दाढी आणी फेशियल करुन घेतलेलं.गोखल्यांची जयडी माहेरपणाला आलेली .ती आधीपासुनच झलक द्यायची आम्हाला.म्हणजे बॕचलर असताना इथे रहायला आलेलो तेव्हापासुनच.

Cold Blooded - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 15/11/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली! "मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?" "येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली. "तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?" "येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती.