खेळ राजकारणी असा रंगला....
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून,
मूळ गीत - फड सांभाळ तुर्याला ग आला....
खेळ राजकारणी असा रंगला....
काका लागला काड्या घालायला || धृ ||
मूळ बारामतीचं बेणं....
हळूहळू यानं गिळलं पुणं....
धोका देण्यात अति प्रवीण....
घेतलं कडेवर जनता पार्टीला....
दिला धक्का वसंतदादांला....
बाईने हाकललं याच्या सरकारला....
परतून धरले राजीवच्या पायाला….
काका लागला काड्या घालायला || १ ||
पाळले कलानी आणि ठाकूर....
खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर....
पोरगी - पुतण्या आणले वर....
गोवारींवर काठ्या बरसल्या....
करुन विरोध गोर्या बाईला....
काढला पक्ष दुकान चालवायला....
परी सरकारी जोडीने नांदला….
काका लागला काड्या घाला
[शशक' १९] - सोंग
देवपूजा झाली. माईंनी देव्हाऱ्यात निरांजन ठेवला. वाटीतले कुंकू कपाळावर लावले. डोक्यावरून पदर घेवून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
सर्व आटोपून त्या इस्पितळात पोचल्या. मुलगा ICU बाहेर ताटकळत उभा होता. डॉक्टर नुकतेच भेटून गेल्याचे कळाले.
"काय रे, काय म्हटले डॉक्टर?" त्यांनी मुलाला विचारले.
"Tracheotomy Tube काढली कि जातील दोन तीन दिवसात." पोरगा चिंताग्रस्त होता. डोळ्यात पाणी तरळले होते.
"मग कधी काढायची?" अधिरपणा न लपवता माई म्हणाल्या.
तितक्यात कोणीतरी भेटायला आले. माई पुढे झाल्या.
अथपासून इथंपर्यंत नवर्याच्या आजारपणाची कॅसेट वाजवून माईंनी पदराने डोळे पुसले. दोन हुंदके दिले.
दरवळ (शतशब्दकथा)
“तुझा आवडता perfume कुठला?”
“मी नाही सांगणार, secret आहे.”
“दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!”
तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला.
ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला.
गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी
गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -
वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल .
मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .
[शशक' १९] - वेंधळा
नेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच?
त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत!
रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला.
गाडी स्टार्ट करुन ठेवावी का? एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड असेल. मागे एकाच्या गाडीत कार्बनमोनॉक्साइड पसरुन गुदमरुन गेला.
दिवस तुझे ते ऐकायचे....
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.
मिसळपाव