Skip to main content

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 01/05/2025 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग. प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही? हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या.

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 29/04/2025 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ, आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली. २०१५ – गुरदासपूर, ७ ठार, पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी ! २०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले, कडिनिंदा नी निर्बंध…. २०१६ – उरीत १९ जवान मारले, सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले! २०
काव्यरस

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 29/04/2025 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

यात्रा आणि सक्रिय सोहळे

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 28/04/2025 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं. कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही.

बाजाराचा कल

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 28/04/2025 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
"बाजाराचा कल" हे माझे सदर सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे थोडे दिवस स्थगित ठेवत आहे. मागच्या आठवड्याचे युयुत्सुनेट्चे भाकीत चुकले. पण इण्ट्रा-डे मध्ये युयुत्सुनेटने तगडा पर्फॉर्मन्स दिला. माझी काय चूक होत आहे, ती पण मला समजली आहे (असे सध्या तरी वाटत आहे).  मॉरल ऑफ द स्टोरी - १. बाजारात केव्हाही पैसे मिळवता येतात २. इंट्राडे करनेका तो खुदका ए०आय० लिखके करनेका|

फाईल बंद

लेखक रम्या यांनी शनिवार, 26/04/2025 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते. फौजदार फार तयारीने आले होते.

त्या पडद्याच्या पल्याड वसते

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/04/2025 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/04/2025 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 23/04/2025 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

मानवतेचं कलेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 23/04/2025 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......