Skip to main content

[शशक' १९] - ग्लास

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 01/02/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली. "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली. "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" केशव विचारात गुंतला. "गौरी, काहीतरी गोडधोड कर.

बजेट ( आपलेही )

लेखक असहकार यांनी गुरुवार, 31/01/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बजेट ( आपलेही ) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आधी दोनेक महिन्यापासून देशभरात एका गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. ती म्हणजे यावर्षीचे बजेट काय असणार, कसे असणार? कोणत्या सवलती असतील, आयकर कितीने कमी होईल? कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, कशाच्या वाढतील? बजेटचा शेअरबाजारावर काय परिणाम होईल? वर्तमानपत्रापासून ते टीवीचॅनेल्सच्या चर्चांपर्यंत सगळीकडे एकच एक शब्द ऐकू येतो. बजेट. बजेट. बजेट. तर हा बजेट शब्द नेमका आहे तरी काय याचा फार थोडे लोक मागोवा घेतात. सरकारने सादर करायचा हिशोब, नवे कर लावायची घोषणा, की जमाखर्च मांडण्याची तयारी?

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

करायला गेलो आत्महत्या

लेखक खिलजि यांनी बुधवार, 30/01/2019 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ?

काही नाजूक स्वप्नं...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 30/01/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते.

वजनाचा काटा --भाग १०

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 30/01/2019 13:03 या दिवशी प्रकाशित केले.

वजनाचा काटा --भाग १०

झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय आता पर्यंतच्या एकंदर चर्चेवरून बऱ्याच जणांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे कि वजन कमी करणे हि अतिशय सोपी गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी आपले वजन अनेक वेळेस कमी केलेले आहे. दुर्दैवाने ते काही महिन्यात परत येतेच यामुळे काटा हलेना काटा चालेना (अशी कुणाची तरी सुंदर कविता मिपावर प्रसिद्ध झाली होती) हि स्थिती येते. म्हणजेच एकंदर वजनाचा काटा-- ९ भाग होऊन आपण जेथे आहात तेथेच आहोत.

टोळीगीत इ.स. २०५०?

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 29/01/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या पिढ्यांच्या अक्षम्य चुकांचे पातक अम्हाला रोज भोगायचे रोज बघायचे भेसूर रुपडे भकास पृथ्वीचे अभद्र कार्बनी पाऊल ठशांचे विटल्या फाटल्या ओझोन थराचे गटारगंगांचे विखारी धुराचे अवकाळी वृष्टीचे जखमी सृृृष्टीचे सिमेंटी जंगलांचे भेगाळ भूमीचे मरणपंथाच्या हरितवनांचे थांबा थांबा ऐका चीत्कार कुणाचे? पाण्याचा टँकर पळवून आणल्या मरणासन्नांच्या आमच्या टोळीचे!
काव्यरस

स्वप्नांची गोष्ट (गझल)

लेखक कहर यांनी सोमवार, 28/01/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क

हंपीला गवसणी भाग 2

लेखक kool.amol यांनी रविवार, 27/01/2019 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी हंपीला गवसणी घालणार हे आता नक्की झालं होतं. पण त्यापूर्वी आपण जिथे जाणार आहोत त्या जागेच वैशिष्ट्य काय, महत्व काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसा मी एक अभ्यासू आहे असा एक (गैर)समज खूप आधीपासून प्रचलित आहे. मी पण ही झाकली मूठ उघडण्याच्या फंदात कधीच पडलो नाही. असो. तर हंपी इथे नक्की काय आहे हे आंतरजालावर बरचसं वाचायला मिळेल. पण मला ते विस्कळीत स्वरूपात वाटलं. त्यामुळं UPSC करणाऱ्या एका मित्राकडून मी काही नोट्स मागवल्या. तिथून मात्र इतिहास समजला. तो खूपच रोमांचकारी आहे. त्यापूर्वी हंपीच्या भागाचा उल्लेख अगदी पुराणात देखील आहे. पार्वतीचा एक अवतार म्हणजे पंपा.