Skip to main content

कथा - माझा बहावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 06/04/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
कथा - माझा बहावा ------------------------------------------------------------------------------------------------------------- वसंत ऋतूपासून बहाव्याची झाडे फुलू लागली आहेत . त्या बहाव्यांना समर्पित . वसंतात फुलावा- मनाचा बहावा , त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा ! ------------------------------------------------------------------------------------------------------------- सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या लक्ष शुभेच्छा ! ------------------------------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------

खिंड बोगदा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 06/04/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
खिंड बोगदा या डोंगररांगा निघती माझ्या घराच्या पुढती किती बघावे उंचावूनी नच कोणत्या वाटा दिसती अनामिक भिती मनात असे वर जावे की खाली यावे प्रश्न मनी वसे केवळ एकच खिंड बोगदा लांबून दिसे कुणी खोदला एकदा जावे वाटते त्यातूनी वाट परतीची येई का तिथूनी? पाषणभेद ०६/०४/२०१९

काव्य कंड

लेखक प्रमोद पानसे यांनी शुक्रवार, 05/04/2019 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
भुभूक्षीता सम विषय छेडु यथातथा ती यमके जोडु कुंथुनी मग ते शिळकट पाडू अनाकलनीय नवकाव्य कंडु कवन जंते उदरी माझ्या विचार कल्पना असती ताज्या परी शब्दांसव मेळ ना साधे मळमळ मनात करती गमजा बहु प्रयत्नांती सिद्ध जाहलो झरझर लेखणी मी पाझरलो मळकट तावावरती शाई , फुटत फुटत मी काव्य प्रसवलो नवकवी कंडुदास

दाराआडचे घड्याळ

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 05/04/2019 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र

टिंग्डि टिडिडिडि

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल.

(दाराआडची मुंगी)

लेखक mrcoolguynice यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुंगी दाराआडून बघते आहे कोर्टहॉलच्या बाहेर किती बाहेर? कंपाउंडच्या बाहेर, सिग्नलपार जिथे एक हत्ती शोधतो आहे पुष्पगुच्छ मस्त.... करत असेल का तो ही तिचा विचार? येणार असेल का तो आज कोर्टहॉलमधे कंपाउंडच्या आत, सिग्नलच्या अलीकडे? मुंगीही कोर्टातून बाहेर येऊ शकत नाही... जाईल का ती ही हत्तीचा हात धरून, कंपाउंडच्या पलीकडे? आडोसा घेऊन असलेला चुलत खाप मुंगळा हातातली शास्त्रे लपवत, याची जाणीव नसलेली मुंगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... पुष्पगुच्छात भान हरवलेला हत्ती मॅरेज रजिस्ट्रारच्या कंपाउंडकडे येतच राहतो... येतच राहतो .....