सप्तपदीतलं वचन
सुरुवात कात्री शोधण्यापासून झाली होती, नेहमीच्या जागेवर मिळाली नाही, तिला विचारलं तर तिने आणून दिली. नेहमीची जागा बदलली होती तिने. नेलकटरचं पण तेच झालं. आणि मग लक्षात आलं खुप काही बदललयं. लग्न समारंभाचे धावपळीचे दिवस संपले आणि हळूहळू घर तिच्या सुरात गावू लागलं. आधी फक्त माझी सवय असलेल्या घरात ‘ती’ चा प्रवेश झाला होता. लग्नापुर्वी निदान वर्षभर तरी त्याच फ्लॅट मधे एकटा रहात होतो मी, त्यामुळे दैनंदिनी माझ्या मनाप्रमाणे चाले, मला हवं तेव्हा घरी पोहचणं असो, हवी तेव्हा बाथरूम टॉयलेट रिकामी असणं असो किंवा आणि काही, सब अपना राज.
स्पिती घाटी - भाग 2 (सोलन - शिमला -कुफ्रि)
स्पिती घाटी - भाग 2 (सोलन - शिमला -कुफ्रि)
आम्ही आमच्या roadtrip ला दिल्ली तुन सुरुवात केली, selfdrives.in ने पंन्नू कार कडून eco sport कार 9 दिवसासाठी भाड्याने घेतली. आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी कसोली घाटात रस्त्याचे काम सुरू असल्या कारणाने खूप ट्रॅफिक लागलं आणि त्यात आमचा पहिला दिवस संपला , अनपेक्षितपणे प्लॅन नसताना सोलन या गावात आम्हाला राहावं लागलं.
बालसाहित्य - काळा वाघ
काळा वाघ
------------------------------------------------------------------
क्रिकेट ची मॅच अगदी रंगात आली होती .
सिया अगदी मन लावून पाहत होती . विराटनं एक मस्त षट्कार मारला . ते पाहून सिया आनंदानं टाळ्या वाजवू लागली . टाळ्या वाजवतच ती ओरडली , " रिया "...
त्यावर अगदी एखाद्या दांडग्या कुत्र्याच्या आवाजात रिया ' भॉ .... ' करून भुंकली . तो आवाज ऐकून सिया दचकलीच . ही रिया ना .... वेडी ! मॅच आवडत नाही म्हणून असं भुंकायचं ?
तेवढ्यात तिच्या मानेला रियानं चाटलंसुद्धा . छे ! हे अति होतंय , सियाला वाटलं.
पृथ्वी उवाच
पृथ्वी उवाच....
तलखी ने कासावीस हा जीव,
दाह घेई सर्वांगाचा ठाव,
उदरात घुसमटे बीजांचा जीव,
निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव.
आक्रमू दे आकाश हे जलदांनी,
येऊ दे रे आभाळ हे भरूनी,
लखलखत्या विद्युल्लतानी,
रणसंगर होऊ दे ह्या गगनी.
घननीळ बरसता बेधुंद,
मेदिनीस कस्तुरी सुगंध,
जीवनामृत शोषितील ही रंध्र,
भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध
डोळ्यात आणोनि प्राण,
विनविती माझे पंचप्राण,
मेघराजा तुजला माझी आण,
दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण.
© श्रेया राजवाडे, जुन 2019
पावसा पावसा पड रे
पावसा पावसा पड रे
---------------------------------------------------
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पाऊस पडला संततधार
सगळं झालं हिरवंगार
रान सारे चिंब झाले
वाहू लागले नद्या नाले
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
काव्यरस
प्रतिशोध
सुलभा ब्रह्मे नी कुलूप उघडले अन वस्ती गृहाच्या खोलीत प्रवेश केला
बारावीला टॉपर असलेली सुलभा न पुण्याच्या बी जे मेडिकल मध्ये प्रवेश घेतला होता
डॉक्टर होण्याचं मुख्य कारण म्हणजे समाज सेवा हे तिचे सुप्त ध्येय होत
-
२ दिवसांनी प्युन आला अन तिला एक फॉर्म दिला त्यात तिला तिची माहिती जसे नाव पत्ता फोन नंबर इत्यादी भरायला सांगितला व एच ऑ डी साने सरांची त्यावर स्वाक्षरी घेण्यास सांगितले
-
ती ते कागदपत्रे घेऊन सरांच्या ऑफिस मध्ये आली -
सर मे आय कमं इन ?
या - तिने ती कागद पत्रे साराच्या जवळ दिली व आदबीने उभी राहिली वाट पाहात
सरांनी ती वाचली व तिच्या कडे बघितले
त्यांची नजर तिच्यावरून फिरत होती
स
पालक कॉर्न सूप by Namrata's CookBook :६
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पालक / पालकाचे देठ
गोड कणीस
१ चिरलेला कांदा
३ चिरलेल्या मिरच्या (आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करु शकता)
साय /दूध / अमूल फ्रेश क्रीम
तुप
मीठ
क्रमवार पाककृती:
१. सर्वप्रथम एक पातेल घ्या.त्यामध्ये पाणी घ्या , कणीस , चवीनुसार मीठ घालून ३ ते ४ उकळून घ्या
२. तोपर्यंत सूपची तयारी करु
३. कमी गॅस फ्लेमवर एक कढाई घ्या आणि त्यामध्ये तुप घ्या
४. तुप गरम होत आलेकी चिरलेली मिरची घ्या आणि १ मि. परतून घ्या
५. आता चिरलेला कांदा घालून २ मि. परतून घ्या
६.स्वीट कॉर्न तायार आहे ,त्यातील पाणी काढून घ्या
७. कांदा २ मि.
पावसा पावसा पडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
------------------------------------------------------
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
आम्हाला आहे खेळायचं
खेळताना तू येऊ नकोस
क्रिकेटचा खेळ आलाय रंगात
त्याच्यामधे खो घालू नकोस
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
मिसळपाव