मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पृथ्वी उवाच

श्रेयासन्जय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पृथ्वी उवाच.... तलखी ने कासावीस हा जीव, दाह घेई सर्वांगाचा ठाव, उदरात घुसमटे बीजांचा जीव, निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव. आक्रमू दे आकाश हे जलदांनी, येऊ दे रे आभाळ हे भरूनी, लखलखत्या विद्युल्लतानी, रणसंगर होऊ दे ह्या गगनी. घननीळ बरसता बेधुंद, मेदिनीस कस्तुरी सुगंध, जीवनामृत शोषितील ही रंध्र, भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध डोळ्यात आणोनि प्राण, विनविती माझे पंचप्राण, मेघराजा तुजला माझी आण, दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण. © श्रेया राजवाडे, जुन 2019

वाचने 4656 वाचनखूण प्रतिक्रिया 9