मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक

ज्ञानोबाचे पैजार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला, याच्या डोळ्यात अंगार फुलला, “हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली. यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला. “गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला” त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला. हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला. ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते. आजूबाजूला सावधपाणे पहात त्यांनी पेटारा खाली ठेवला आणि तो म्हणाला “सगळे सुरक्षीत आहे महाराज... बाहेर या” पैजारबुवा,

वाचने 6485 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by mayu4u

ज्ञानोबाचे पैजार 08/02/2019 - 15:26
स्पर्धेत एक कथा आलरेडी पाडली आहे. नियमा प्रमाणे दुसरी टाकता येत नाही. मग साठलेली मळमळ अशी बाहेर काढली पैजारबुवा,

सिरुसेरि 09/02/2019 - 13:47
+१

ज्योति अळवणी 12/02/2019 - 17:05
खूप आवडली. स्पर्धे बाहेर असूनही मतदान करणार

ज्योति अळवणी 12/02/2019 - 17:06
खूप आवडली. स्पर्धे बाहेर असूनही मतदान करणार

स्वधर्म 13/02/2019 - 13:47
अावडली.